क्यूरेटिव्ह पिटीशन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्यूरेटिव्ह पिटीशन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४ जून, २०१०

बा हेरंबा



बा हेरंबा, तुझी पोस्ट फळली रे!! आणि सगळ्यांनी तुझ्या या पोस्टवर पोटतिडकीने दिलेल्या प्रतिक्रियादेखील फळल्या. कारण बातमी तशी आहे. भारताचे अ‍ॅटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी भोपाळ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले असून "क्यूरेटिव्ह पिटीशन" दाखल केले जाऊ शकते असे विधीमंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत सांगितले आहे. वीरप्पा हा माणूस चांगला वाटतो. फक्त आता क्यूरेटिव्ह पिटीशनवर निकाल द्यायला आणखी पंचवीस वर्षे लावू नयेत म्हणजे मिळवली ! जे विषारी वायूने गेले, त्यांना या क्यूरेटिव्हचे आता काय म्हणा. पण असो. आणि हो, काल सन्माननीय केतकर साहेबही याच मुद्यावरून माणूसकीचा संदर्भ सोडून आणि अतिशय जास्त प्रमाणात संपादकी होऊन उखडले होते. राजीव गांधीना लक्ष्य केले जात आहे, मिडीयाने भलतीच राळ उठविली आहे, पंचवीस वर्षे मिडीयाने काय केले (केतकरजींनी काय केले लेख लिहीण्याशिवाय?) इ.इ. एकीकडे " न्यायालयाने आणि भारतीय प्रशासकीय व्यवस्थेने युनियन कार्बाईड कंपनीच्या निर्घृणतेवर पांघरूण घातले आहे" असे म्हणायचे आणि याच व्यवस्थेची त्याकाळी धुरा सांभाळणार्‍या राजीव गांधी (आणि राहूल व सोनिया गांधी हे लक्ष आहे हे ध्वनित करून) ना पाठीशी घालायचे. चलता है!