
गांधीचे व्हल्गरायझेशन: म.टा. आणि मिड डे चा हलकटपणा या ८ तारखेच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर लिहीत असताना ती लांबली आणि ही नवीन स्वतंत्र पोस्ट तयार झाली.
जेड अॅडम्सने नावाच्या इंग्लिश इतिहासकारानं नुकतच "गांधी, नेकेड एम्बिशन" नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वत:चे कामजीवन असमाधानकारक असेल तेव्हाच इतरांच्या कामजीवनात डोकावून पाहाण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि यासाठी एखाद्या देशाचा राष्ट्रपिता मिळाला तर जेड अॅडम्स सारख्या इतिहासकाराचे खिसेही भरले जातात.
ज्ञात आहे त्या माहितीनुसार गांधीनी त्यांची कामवासना गेलीय की नाही ते फक्त तपासून पाहाण्यासाठी त्यांच्या मनु आणि आभा या दोन भाच्यांसोबत नग्न झोपायला सुरूवात केली होती. नग्न झोपायला सुरूवात केली होती म्हणजे त्या पुढच्याही गोष्टी केल्या असतील असे मानण्याचे कारण नाही (७७ वर्षे या त्यांच्या वयाचा जरा विचार करा).
हा जेड अॅडम्स नावाचा हरामखोर माणूस नाही त्या गोष्टी उकरून काढुन स्वत:चे खिसे भरतोय.
आजही सेक्स सारख्या विषयाबाबत खुलेपणा राखला जात नाही (रस्त्याच्या कडेला उभं राहून गर्लफ्रेंडचे चुंबन घेणे आणि टि.व्ही.वर अर्धनग्न पोरींचा सुकाळ होणे वेगळे). गांधी त्या काळात त्यावर प्रयोग करीत होते आणि त्याबाबत खुलेपणे चर्चा करायला तयार होते हे सिंहह्रदयी पुरूषाचे लक्षण आहे. याबाबतीत ते नक्कीच राष्ट्रपिता मानता येतील.
जेड अॅडम्सने महर्षी महेश योगी आणि ओशो यांच्याच तराजूत गांधींना तोलले आहे. जगावर छाप पाडून गेलेल्या भारतीयांनी नेहमीच कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला. ज्याला स्वत:ला जाणून घ्यायचे आहे, सत्यापर्यंत जायचे आहे त्याला नेहमीच कामवासनेच्या अभ्यासाची आणि स्वत:वरील प्रयोगाची पायरी चढावी लागलेली आहे.
गांधींची हत्या झाली नसती तर निश्चितच गांधींनी पुढे स्वत:च्या कामजीवनावर लेखन केलं असतं.
जेड अॅडम्सच्या या पुस्तकामुळे सर्वच भारतीयांकडे "सेक्स मेनीअॅक" म्हणून पाहाण्याच्या दृष्टीकोनाला बळ मिळणार आहे.