आजच्या लोकसत्तामध्ये श्री. चि.मो. पंडित यांचा "तरूणाईला हवे प्रोत्साहन आणि आव्हान" हा लेख वाचला. त्यांनी प्रस्तावित केलेली योजना अत्यंत स्वागतार्ह आहे; शासनाने तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करावी अशी आहे. मित्रहो, वरील लेख जरूर वाचा आणि प्रस्ताव स्वीकारला जावा यासाठी आग्रह धरा. या लेखाकरिता लोकसत्ता आणि श्री. चि. मो. पंडित यांचे हार्दिक अभिनंदन!
१० जुलै, २०१०
३० जून, २०१०
प्राचार्य

काल प्राचार्य गेले. आयुष्यभर आपल्या मृदुल वाणीच्या सामर्थ्यानं मराठी भाषेत व्याख्यान करून अनेकांची आयुष्ये संस्कारित करणार्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल लिहीत असताना ऊर भरून येत आहे. आपण सर्वजण शब्दांचे सत्व हरवून बसलेल्या काळातून जात आहोत, कधी-कधी तर शब्दांना काही अर्थच आहे की नाही असा विचार मनात येतो. पण ज्याला शब्दशक्ती प्रसन्न होती आणि ज्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांना रत्नांचे तेज असे अशा या विभूतीने आपल्या मागे खूप मोठा वारसा ठेवला आहे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले ज्या काळात घडले, त्यांनी जे-जे उदात्त आणि उत्कट पाहिले ते-ते अवघ्या महाराष्ट्रानेही पाहावे, अभ्यासावे आणि जीवन संपन्न करून घ्यावे यासाठी प्राचार्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व्याख्याने केली. प्राचार्यांनी छत्रपती शिवराय, समर्थ रामदास, संत तुकाराम, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, आचार्य रजनीश अशा अनेक व्यक्तींच्या जीवन-चरित्रावर बोलणे केले. हे बोलणे करीत असताना कुठेही कुणाच्या विचारांतील परस्पर विसंगतीमुळे प्राचार्यांना कधीच त्या व्यक्तीबद्दल बोलताना अडचण येत नसे - कारण प्राचार्यांची भूमिका ही नेहमीच अभ्यासकाची असे.
ज्यांना छत्रपतींचा अभिमान आहे त्यांना रामदास रूचतीलच असे नाही आणि ज्यांना सावरकर आवडतात त्यांना गांधी कळतीलच असे नाही. पण आपला अभिनिवेश थोडा बाजूला ठेवून आपण हवे ते अभ्यासू शकतो हे प्राचार्यांनी शिकवले. प्राचार्य हे फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात तत्वज्ञान आणि तर्कशास्त्रासारखा विषय शिकवत असले, तरी त्यांच्या व्याख्यानात तर्क-कर्कश्शपणा औषधालाही सापडत नसे. कारण त्यांना एकच एक विचार श्रोत्यांच्या मनात ठसवायचा नसे, तर हे जीवन समृध्द आहे, ते जगण्यासारखे आहे, वाटा अनेक आहेत फक्त आपले कुतूहल जागे असायला हवे हा विचार ते श्रोत्यांना देऊ इच्छित. अगदी आपण नेहमी बोलतो त्या भाषेत, शब्दा-शब्दांचे नवनवीन पैलू आपल्या शुध्द उच्चारांतून उलगडून दाखवत, मध्येच श्रोत्यांना नर्मविनोदी चिमटे काढत सुखद लयीत प्राचार्य व्याख्यान रंगवित.
व्याख्यानात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, खंडन-मंडन असला निरर्थक बाष्कळपणा त्यांना करावा लागला नाही आणि व्याख्यानासाठी अमुक हाच विषय हवा असाही त्यांचा आग्रह नसे कारण त्यांचे वाचन समृध्द होते. हवा तो मुद्दा, हव्या त्या ठिकाणी आपोआप बाहेर पडतो - फक्त निर्हेतूकपणे वाचन वाढवा असे त्यांचे सांगणे असे.
प्राचार्यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत गांधी, जे. कृष्णमूर्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्व लोकांना जवळून पाहिले होते. त्यांच्यातील अद्भुताची चव चाखली होती, या सर्वांची व्याख्याने निष्काम भक्तीने ऐकली होती. हा सर्व समृद्ध वारसा महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांपर्यत गेला पाहिजे या विचाराने ते बोलत आणि त्यांची व्याख्याने ऐकताना हा भारलेपणा श्रोत्यांनादेखील स्पर्शून जात असे. सकाळमधून त्यांनी लिहीलेल्या जागर या सदराच्या जाहीर वाचनाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी वाचकांनी उस्फूर्तपणे केले, कारण त्यात संस्कार होता.
बीड शहरात श्री. सुरेश नवले यांनी आई महोत्सवात ओळीने त्यांची सात-आठ व्याख्याने आयोजीत केली होती. डॉ. आंबेडकर, म. फुले, म. गांधी, छ्त्रपती शिवाजी, संत तुकाराम यांच्यावरील ती व्याख्याने आज महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा ठरली आहेत.
मला त्यांची तीन-चार व्याख्याने ऐकण्याचा आनंद घेता आला, आणि त्यांच्याशी मनसोक्त संवादही साधता आला. औरंगाबादमध्ये संदीप राजेभोसले यांच्याकडे राहायला होतो. प्राचार्यांच्या व्याख्यानाची जाहिरात पेपरमध्ये आली होती. थोडेसे काम आहे असे सरांना सांगून मी प्राचार्यांच्या व्याख्यानाला गेलो. का कोण जाणे या माणसाच्या पायांना स्पर्श केलाच पाहिजे असे वाटले. व्याख्यान संपल्यावर मी तो केलाही आणि मिळालेल्या पाच-दहा मिनीटांत त्यांची मायादेखील अनुभवली. रविवार सकाळ मधून त्यांनी "देशोदेशीचे दार्शनिक" या सदरातून विविध दार्शनिकांवर लेखन केले होते; पण त्यात रजनीशांचा समावेश नव्हता. मी त्या काळी रजनीशवेडा होतो. त्याबद्दल
मी त्यांच्याशी बोलत होतो.
"महाराष्ट्राला अजून तुकारामच कळला नाही, रजनीश कळायला अजुन खूप उशीर आहे, मी रजनीशांना प्रत्यक्ष भेटलो आहे, नंतर त्यांच्यावर बोललोही आहे..." असे त्यांनी सांगितले.
आता त्यांचे रजनीशांवरील व्याख्यान शोधायचेच असा विचार घेऊन मी ऑफिसला परतलो, तर आमचे बॉस इकडे आमच्यावर फायरींगच्या मूडमध्ये आले होते.
"काम आहे असे सांगून जातोस आणि मुलींच्या मागे फिरतोस?" खरं सांग..कुठे गेला होतास?
मी त्यांच्याकडे नवीनच कामाला लागलो होतो, त्यांच्याकडेच राहायलाही होतो. या अनपेक्षीत हल्ल्याने

कावरा-बावरा झालो, रडू येऊ लागले. शेवटी त्यांनी जोक संपवला आणि सांगितले,
"मी पाहिले तुला प्राचार्यांच्या पाया पडताना, जा आत, तुझ्यासाठी दोन हजार रूपयांची पुस्तके आणलीत त्यांची...."
हे आमचे सर देखील त्यांचे फॅन होते. शाळेत शिकत असताना बीडपर्यंतच्या तिकीटासाठी स्वत:ची पुस्तके विकून त्यांनी प्राचार्यांची व्याख्याने ऐकली होती आणि रात्री झोपण्यासाठी बीडच्या बसस्टॅण्डचा आश्रय घेतला होता.
त्यानंतर प्राचार्यांचे भरपूर लिखाण वाचले, भरपूर कॅसेटस ऐकल्या आणि उत्तरोत्तर
प्राचा
र्यांच्या प्रेमात पडत गेलो.
आपण किमान दोन दिवस तरी त्यांना जवळून पाहिले पाहिजे, त्यांच्या गावी गेले पाहिजे असे मला वाटू लागले. पुस्तकावर त्यांचा लॅंडलाईन नंबर होताच. लावला.
प्राचार्यच फोनवर होते. त्यांनी कोण? कुठे भेटला होता? इत्यादी मायेने विचारपूस केली. मी फलटणला येणार आहे असे त्यांना सांगितले.
"अरे, आमच्या भागात एवढं उन पडत आहे, कशाला उगा परेशान व्हायचे प्रवासात? मी औरंगाबादला येतच असतो आणि मला तो भाग पुन्हा एकदा नीट पाहायचा आहे, तेव्हा येणारच आहे पावसाळ्यात तिकडे..तेव्हा आलो की खूप बोलू" असे सांगून माझी समज काढली.
नंतर मीच माझ्या व्यापात अडकलो. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी झाल्याचे वाचले होते.
प्राचार्यांची आठवण झाली की आता मात्र त्यांचे काहीही न ऐकता, त्यांना काहीही न सांगता फलटणला नक्की जायचेच असे नेहमी ठरवीत असे.
आता मात्र मी कधीच फलटणला जाऊ शकणार नाही.
छायाचित्रे - चैतन्य रूद्रभाटे, फलटण
समर्थ रामदासांवारील प्राचार्यांचे व्याख्यान इथे ऐकता येईल.
लेखन सूत्रे:
प्राचार्य शिवाजीराव भोसले
२६ जून, २०१०
दोन शेर
१
मैने तो यूं ही रेत पर फेरी थी उंगलीयां
देखा जो गौर से तेरी तस्वीर बन गयी
दिल उनसे गुफ्तगू के लिये बेकरार है
या रब तु जान डाल दे तस्वीर-ए-यार में
सुना है मेरी तस्वीर के टुकडे उसने
घर में ही छिपा रखें है - बाहर नही फेंके
२
कभी खामोशी भी कुछ कह जाती है
तड़पने के लिए सिर्फ़ यादें रह जाती है
क्या फर्क पड़ता है दिल हो या कोयला
जलने के बाद सिर्फ़ राख ही रह जाती है
शायर - __________________
२४ जून, २०१०
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ती

चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ती
ती: यू हॅड अॅश्यूअर्ड मी दॅट यू विल कॉल ऑर मॅसेज मी अगेन
तो: ओ.के. सॉरी.
ती: यू हॅड अॅश्यूअर्ड मी दॅट यू विल नॉट कॉल ऑर मॅसेज मी अगेन
तो: हेय..! आय कॅन कन्सीडर अॅण्ड अंडरस्टॅण्ड मिस्टेक्स, बट यू डोण्ट.
ती: आय डोण्ट वॉण्ट अदर्स टू स्टे अंडर रॉंग इम्प्रेशन
तो: फर्गेट ऑल इम्प्रेशन्स. आय अॅम अवे फ्रॉम ऑल नाऊ. अॅण्ड अगेन सॉरी फॉर धिस इरिटेशन
तो: सच अ पिटीफुल आय फिल फॉर मायसेल्फ व्हेनेव्हर आय राईट यू. डोण्ट नो व्हाय स्टील आय राईट
ती: दि सेम क्वेश्चन आय वॉण्ट टू आस्क यू. व्हाय??
तो: इट्स बियॉंड ऑल माय कंट्रोल्स, नॉलेज अॅण्ड अंडरस्टॅंडींग.
तो: थॅंक्स फॉर आस्कींग अॅटलीस्ट दॅट..
--------------------------------
एक दिवस उलटतो
------------------------
तो: आर यू अप?
ती: व्हॉटस युअर प्रॉब्लेम??
तो: हॅव यू लव्हड एनिबडी एव्हर? अॅण्ड डोण्ट गेट इरिटेटेड प्लिज..
ती: नो
तो: डोण्ट डू दॅट एव्हर. गेट मॅरिड डायरेक्टली. इट स्पॉईल्स अ लॉट
ती: आय डोण्ट नीड युअर अॅडव्हाईस अबाऊट हाऊ टू लिव्ह माय लाईफ
तो: ओ.के. आय अॅम टेलिंग यू अॅज इट वॉज यू हूम इट कम फ्रॉम...मे बी वन वे. वन वे ऑर आयदर, इट सक्स!
ती: इट केम फ्रॉम मी मीन्स व्हॉट?
तो: मीन्स इट रिफ्लेक्टेड फ्रॉम यू...आय सीन इट इन यू. मे बी इट वॉज नॉट रिअली युअर बिलॉंगींग. अॅण्ड सीन्स देन आय लॉस्ट इट फॉरेव्हर. इव्हन इफ़ यू कम नाऊ, आय सस्पेक्ट दि केस विल बी द सेम. सच अ मिरॅकल इट वॉज.
ती: व्हॉट आर यू टॉकींग अबाऊट?
तो: दि लव्ह आय अॅम टॉकींग अबाऊट. सो नथिंग टू गेट स्केअर्ड ऑफ मी. जस्ट नो दॅट आय सीन समथिंग डिव्हाईन दॅट वॉज लव्ह्, इट्स लॉस्ट. नो ट्रेस कॅन बी फाऊंड एनिव्हेअर नाऊ.
तो: सो इटस लाईक पिलग्रिमेज फॉर मी टू व्हिजीट दॅट कॉलनी, सी दोज पीपल्स, यू अॅण्ड युअर पेरेण्टस. आय फील दॅट लाईट स्टील.
ती: व्हेन डीड यू सी मी?
तो: मेनी टाईम्स. यू वेअर इन दॅट स्पेक्टस शॉप..दॅट वॉज लॉंग अॅगो....देन मेनी टाईम्स विथ यूअर डॅड....यू हॅड बॉब कट देन. इव्हन वन्स कन्फ्रंण्टेड
युअर पेरेण्टस इन सम प्रोग्रॅम. युअर डॅड हॅड दॅट स्टर्न ग्लान्स.
-------------------------------------------------
पुढे काहीही उत्तर नाही
-------------------------------------------------
तो: आर यू इन दी सेम सिटी?
तो: व्हॉट हॅपण्ड? व्हाय आर यू सायलेंट सडन्ली?
ती: आय अॅम इन क्लास. प्लीज डोण्ट मॅसेज मी.
-----------------------------------------------
रात्री
-----------------------------------------------
तो: हाऊ कम देअर इजण्ट हॉलीडे फॉर यू?
ती: वी आर डॉक्टर्स. वी डोण्ट हॅव हॉलीडेज.
तो: ओह! आय थॉट यू आर जस्ट स्टूडंट ऑफ मेडीसीन. हाऊ मेनी इअर्स रीमेनींग टू बी ए डॉक?
ती: वन इअर. अॅण्ड प्लीज डोण्ट आस्क एनीमोर क्वेश्चन्स नाऊ.
तो: ओ.के. देन यू स्पीक...अॅण्ड आय प्रे यू प्लीज डोण्ट अपसेट युअर प्रेझेंट मूड. आय आस्क यू नथिंग मोर.
ती: व्हाय जस्ट यू डोण्ट फर्गेट मी?
तो: आय डिड इट फॉर फोर इअर्स.
ती: देन व्हाय अगेन?
तो:... प्लीज, आय अॅम नॉट सेम मॅड वन यू न्यू. मेनी थिंग्ज हॅव हॅपण्ड...अॅण्ड इट वॉज अटर्ली इंपॉसिबल फर्गेटींग यू... आय वॉज हेल्पलेस. परहॅप्स माय स्टार्स वेअर इन माय फेव्हर येस्टर्डे.
ती: फॉर व्हॉट दे वेअर इन युअर फेव्हर?
तो: टू मेक यू अॅटलीस्ट स्पीक.
तो: यू नो व्हाट आय डिड व्हेन यू वेंट अवे? आय केप्ट व्हिजीटींग दॅट कॉलनी व्हेअर वी मीट फर्स्ट, आय लॉईटर्ड अराऊंड युअर क्लास. आय केप्ट चेकींग नंबर प्लेटस ऑफ स्कूटीज...इव्हन इन ऑदर सिटीज टू !
ती: आय थिंक इटस बेटर इफ यू फर्गेट मी फॉरेव्हर
तो: यू नो व्हेरी वेल, इट हॅपन्स विथ नोबडी. अॅण्ड देअर इज नथिंग टू फर्गेट.
ती: यू आर स्पॉईलींग युअर लाईफ. आय अॅम नेव्हर गोईंग टू कम बॅक. आय अॅम गेटींग मॅरीड विदीन टू इअर्स.
तो: आय अॅम नॉट स्पॉईलींग आय नो.
तो: हॅव यू गॉट ए मॅच?
ती: या...
तो: हे..!! कॉंग्रॅटस..!! हाऊ अॅण्ड हू इज ही इफ मे आय नो? प्रॉबब्ली ए डॉक्टर!
ती: आय अॅम नॉट कंफर्टेबल डिस्कसींग इट.
तो: ओ.के. डोण्ट माईण्ड. अॅम हॅपी यू गॉट इट (नो रिजन टू बी, बट स्टील)
तो: विल एव्हर यू फील सीईंग मी?
ती: नो. आय थिंक यू शूड अल्सो फिल दि सेम.
तो: आय अप्रिशिएट यूअर वील पॉवर अॅण्ड इव्हन एन्व्ही..इन माय केस यू आर अल्वेज पॅरलल विथ मी इव्हन इफ़ यू डोण्ट स्पीक मी, गो गेट मॅरीड ऑर गो अब्रॉड.
ती: आय हॅव ए नाईट ड्यूटी. आय हॅव टू गो.
तो: व्वॉव!! व्हाट ए गुड जॉब! गेट रेडी! वी वील स्पीक लेटर इफ यू फील कंफर्टेबल.
---------------------------------
रात्री उशीरा
---------------------------------------
तो: होप, आय अॅम नॉट डिस्टर्बींग ए ड्यूटी डॉक्टर
तो: बिजी??
ती: व्हाय डू यू वॉंट टू टॉक टू मी?
तो: बिकॉज इटस फ्रीईंग मी फ्रॉम दि बर्डन. इटस ब्यूटिफूल. वी विल नॉट टॉक इफ यू आर बॉदर्ड. रिअली यू आर काईंड इनफ टू स्पीक टू मी अगेन. आय कॅन सी यूअर इंटेंन्शन - इटस सम काईंड ऑफ कंपॅशन. आय अॅम फिलींग रिच. यू हॅव नॉट स्टार्टेड स्पिकींग. इट हॅपण्ड. इट कॅन स्टॉप. आर यू फिलींग बॉदर्ड?
ती: व्हाय आय शूड बी बॉदर्ड? आय डोण्ट हॅव एनी रॉंग इंटेन्शन्स. बट इट डजण्ड मीन दॅट वी आर फ्रेण्डस अॅण्ड धीस वील कंटिन्यू लाईक धीस.
तो: आय अश्यूअर यू वी आर नॉट फ्रेण्डस, वी वील नॉट बी फ्रेण्डस ऑर एनिथिंग लाईक दॅट. इटस गुड यू सेड इट - नाऊ फर्गेट यू आर स्पिकींग टू मी, आय वील फर्गेट आय अॅम स्पीकींग टू यू, अॅण्ड लेट दि कन्व्हर्शेशन गो ऑन..
ती: व्हाट कन्व्हर्शेशन?
तो: व्हाटेव्हर इट कम्स आऊट आऊट ऑफ ब्ल्यू...
तो: हाऊ इज दि ड्यूटी टायमींग? इज इट एक्सायटींग ऑर ट्रबलसम? अॅण्ड टेल मी व्हाटेव्हर यू आर कंफर्टेबल विथ... आय अॅम एक्सायटेड टू नो.
ती: इटस गुड. गिव्हज अस प्रॅक्टीस ऑफ हॅण्डलिंग इमर्जन्सीज. बट इट्स व्हेरी हेक्टीक.
तो: स्पार्क्ड सम ग्लिम्प्सेस फ्रॉम हॉलीवूड. मे नॉट बी सो स्टेट ऑफ आर्ट, बट चॅलेंजींग दो ! इट वील बी सो हॉट देअर...हाऊ यू मॅनेज?
ती: वी हॅव कुलर्स हेअर...अॅण्ड एसी इन सिनिअर टिचर्स रूम
तो: व्हॉट अबाऊट डिसेक्शन ऑफ ह्यूमन बॉडी अॅण्ड ऑल दॅट? डिड यू डू दॅट? वेअर यू फ्रायटण्ड??? माय अंकल इज ए डॉक्टर. आय वॉज हिज फर्स्ट बडींग कंपाऊंडर इन अर्ली डेज. आय कॅन इंजेक्ट, सर्च व्हेन अॅण्ड ड्रेस दि वूण्ड.
ती: डिसेक्शन वॉज इन फर्स्ट इअर. नाऊ वी असिस्ट सर्जरीज.
तो: येस. यू यूस्ड टू से यू आर गोईंग टू बी ए सर्जन लॅटरऑन.
ती: हू टोल्ड यू दॅट?
तो: यू!!! हॅव यू फरगॉटन? आय सेड, आय वील स्मोक, स्मोक, स्मोक अॅण्ड वील गेट अॅडमिटेड इन युअर हॉस्पिटल. यू सेड यू आर गोईंग टू बी ए सर्जन सो यू वील नॉट ट्रीट मी. दॅट वॉज ए डिफरण्ट गर्ल इन यू.
ती: नो. आय डोण्ट रिमेंम्बर.
तो: इट वॉज डिफरण्ट गर्ल इन यू.
ती: आय थिंक वी शूड स्टॉप नाऊ.
तो: वी स्टॉप? आय अॅम अलोन स्पिकींग. आय स्लीप इन दि मॉर्निंग. व्हेन यू गो बॅक टू होस्टेल?
ती: ओ.के. यू शूड स्टॉप नाऊ.
पुढे लिहू का?
बा हेरंबा
बा हेरंबा, तुझी पोस्ट फळली रे!! आणि सगळ्यांनी तुझ्या या पोस्टवर पोटतिडकीने दिलेल्या प्रतिक्रियादेखील फळल्या. कारण बातमी तशी आहे. भारताचे अॅटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी भोपाळ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले असून "क्यूरेटिव्ह पिटीशन" दाखल केले जाऊ शकते असे विधीमंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत सांगितले आहे. वीरप्पा हा माणूस चांगला वाटतो. फक्त आता क्यूरेटिव्ह पिटीशनवर निकाल द्यायला आणखी पंचवीस वर्षे लावू नयेत म्हणजे मिळवली ! जे विषारी वायूने गेले, त्यांना या क्यूरेटिव्हचे आता काय म्हणा. पण असो. आणि हो, काल सन्माननीय केतकर साहेबही याच मुद्यावरून माणूसकीचा संदर्भ सोडून आणि अतिशय जास्त प्रमाणात संपादकी होऊन उखडले होते. राजीव गांधीना लक्ष्य केले जात आहे, मिडीयाने भलतीच राळ उठविली आहे, पंचवीस वर्षे मिडीयाने काय केले (केतकरजींनी काय केले लेख लिहीण्याशिवाय?) इ.इ. एकीकडे " न्यायालयाने आणि भारतीय प्रशासकीय व्यवस्थेने युनियन कार्बाईड कंपनीच्या निर्घृणतेवर पांघरूण घातले आहे" असे म्हणायचे आणि याच व्यवस्थेची त्याकाळी धुरा सांभाळणार्या राजीव गांधी (आणि राहूल व सोनिया गांधी हे लक्ष आहे हे ध्वनित करून) ना पाठीशी घालायचे. चलता है!
लेखन सूत्रे:
क्यूरेटिव्ह पिटीशन,
निकाल चुकीचा,
भोपाळ
२३ जून, २०१०
हम सब बहुत सुखी हैं
हम सब बहुत सुखी हैं
लेकीन सुख की कोई बात नहीं,
हम सब बहुत दुखी हैं
लेकीन दुख का कारण ज्ञात नहीं
प्रेमालाप - मग्न ये जोडे
चट्टानों की छाहों में,
जैसे कोई सत्य खोजता हो
झूठी अफवाहों में,
कुछ खोखले रिक्त शब्दों का
फिर-फिर दोहराया जाना
नकली विश्वासों के हाथों
बार-बार धोखा खाना,
तन के भोग कक्ष में कैदी
शापग्रस्त प्यासी रूहें,
इनपर कभी किसी बादल का
होता दृष्टी निपात नहीं
हम सब बहुत सुखी हैं
लेकीन सुख की कोई बात नहीं,
हम सब बहुत दुखी हैं
लेकीन दुख का कारण ज्ञात नहीं
- अनामिक
योगीयों का लिबास लगते है
योगीयों का लिबास लगते है,
लोग कितने उदास लगते हैं
दर्द की ओस में धुले चेहरे
मकबरों पर की घास लगते है
सुबह का सूरज किधर निकलेगा
मैकदे में कयास लगते है
आप भी जिंदगी से अजिज है
आप भी देवदास लगते है
हाय, पलके लहुलुहान हुयी
ख्वाब टुटे गिलास लगते है
आप उस शख्स तक नहीं पहुंचे
हां, मगर आसपास लगते है
जिस्म आंधी है आरजूओं की
लोग उडती कपास लगते है
पास में आईने नहीं रखते
सुख सभी सूरदास लगते है
कत्ल करके किसीका भागे हो
लोग यूं बदहवाश लगते है
योगीयों का लिबास लगते है,
लोक कितने उदास लगते हैं
- अनामिक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)