विचार जागा झाला आणि मेंदूच्या या कप्प्यातून त्या कप्प्यात फिरू लागला; हे उचकलं; ते उचकलं. पण त्याला काही करमेना मग थोडंस डोकं खाजवलं. मेंदूत तो एकटाच होता. बोर झाला होता. कुणीतरी हवं होतं. मग त्यानं दुसरा एक मेंदू शेजारून जाताना पाहिला. त्यात त्याला दुसरा, त्याच्यापेक्षा वेगळा विचार दिसला. मग त्यानं त्याला हाक दिली. दोघांचं काही बोलणं झालं आणि अचानक ते दोन्ही विचार हमरी-तुमरीवर उतरू लागले. मग त्यापैकी कोणतातरी एक विचार म्हणाला, "अरे? आपले विचार जुळत नाहीत वाटते, असे नको व्हायला"
मग दुसरा म्हणाला, "ए बाबा, मला एक वेगळा विचार म्हणून जगायचं आहे - तुझ्यासोबत जुळलो तर खलास होईल ना मी?"
मग पहिला विचार म्हणे, "छे! असं काही नसतं, दुसर्या अनेक विचारांचं माझ्याशी खूप जुळतं; तरी ते शिल्लक राहातात. तु म्हणतोस ते काही खरं नाही."
मग दुसरा विचार म्हणे, "असं आहे काय? मग असं कर, तु माझ्याशी जुळून दाखव"
मग तो पहिला विचार त्या दुसर्या विचाराशी जुळू लागला. ते दोन्ही एक झाले; आणि दोन्हीही नष्ट झाले. पण ते दोन्ही विचार जुळून मरण्यापूर्वी त्यांची असंख्य अपत्ये जन्माला आली होती - ती अजूनही हमरी-तुमरीवर उतरतात. कधी जुळतात आणि मरतात. कधी अनमॅरीड राहून वेगळी जगतात. या अनमॅरीड विचारांना मात्र काही अपत्ये होत नाहीत - ज्या मेंदूत ते राहातात तो निकामी होईपर्यंतच असले विचार जगतात.
४ सप्टेंबर, २०१०
२ सप्टेंबर, २०१०
माझा दोस्त युजिनी
यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत. सुंदर पोरी-बिरी याच्याही अवती-भवती असतात; पण ते वेगळ्या कारणामुळं. पोरी त्याच्याभोवती अधून-मधून जमणार्या गर्दीचा एक भाग असतात. अशा थोडक्या वेळी पियक्कड लोकांच्या मैफिलीत मोकळ्या ढाकळ्या वातावरणात जशा गप्पा चालू असतात तसे वातावरण त्याच्या अवतीभवती असते. लोक न पीता ही धुंद झालेले असतात. बंगलोरपासून मर्सिडिझमध्ये बसून त्याच्याकडं नेहमी एक बाई येत असे. चांगली दिसायची, बोलायला पण मोकळी-ढाकळी होती. ती युजिनीसोबत जरा जास्तच जवळ गेलेली दिसायची. युजिनीच्या बंगल्यातील प्रशस्त लॉनवर विखरून विखरून टाकलेल्या खुर्च्यांत जवळ बसलो असताना एका रात्री धीर करून त्या बाईंना मी सहज विचारतोय असं भासवत एकदा विचारलं होतं -
व्हाट मेक्स यु व्हिजीट धीस मॅन सो फ्रिक्वेंट्ली?
ती हसर्या चेहेर्याची, चेहेर्यावरून सतत मलमली हसू खेळवत राहाणारी बाई बेधडक म्हणाली,
ओह! टू बी व्हेरी फ्रॅंक, ही नीड नॉट टू टेक मी टू बेड फॉर ऑरगॅजम; आय फील इट इन एअर अराऊंड हिम! आणि तिनं माझ्या डोक्यावर एक टप्पल मारली.
न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देऊनही तिनं माझी विकेट घेतली होती.
"देन व्हाय डोंट यू स्टे विथ हिम फॉरेव्हर...मे बी मॅरी हिम??"
दोन्ही हातांच्या मुठी बांधून खांद्याकडे खेचत, लगेच झटका मारून दोन्ही हात हवेत पसरत ती म्हणाली,
आय वॉंट टू डिअर, बट ही सेज ही डोंट नीड एनिवन स्टेअर अॅट हिम नाऊ अॅण्ड देन... सो आय हॅव टू कम हिअर फ्रिक्वेंट्ली... आणि चेहेर्यावरून खळखळून हसू ओघळले...
नो, नो, बट धीस इज नॉट आय वॉटेड यू टू आन्सर..मला नेमकं काय विचारावं ते कळत नव्हतं; मी लॉनवर जमलेल्या गर्दीकडे हताशपणे नजर टाकली - कुणीतरी बटाटा कलरचा अमेरिकन माणूस युजिनीसमोरच्या गर्दीत बसून गिटारवर गाणं म्हणत होता
ती तिकडे पाहात अचानक म्हणाली -
ही इज स्पेशल अॅण्ड एव्हरीबडी अराऊंड हिम बिकम्स स्पेशल व्हेन दे आर विथ हिम...दे आर नॉट सो व्हेन दे आर अलोन इन देअर वेल्दी सर्कल्स...
असा हा अवलिया माणूस मला दोस्त म्हणून लाभला होता. घरचा गर्भश्रीमंत नसला तरी, तो एखाद्या स्थलांतरप्रिय पक्ष्यासारखा प्रत्येक ऋतूत स्वत:च्या खर्चानं पृथ्वीगोलावर पसरलेल्या वेग-वेगळ्या देशात फिरू शकत असे. तिथल्या शहरांमध्ये त्याचे थोडके, पण "तो येतोय" कळलं की त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे, त्याच्यासोबत कुठेही फिरायला तयार असणारे दोस्त होते. मला त्याला अवधूत म्हणावं वाटे. तो गर्दी खेचणारी असामी असला तरी आमच्या लंगोटीयार दोस्त कंपनीतला कुणीही त्याच्या खांद्यावर थाप मारू शकत असे. नाती एवढी मोकळी असली तरी त्याच्याबाबत कोणतंच अंतिम विधान करता येणार नाही. आमच्या शहराशेजारच्या डोंगर उतारावर असलेल्या त्याच्या बंगल्यात तो वर्षातले दोन-तीन महिने राहायला येत असे. असाच तो यावर्षीही आला होता. आला होता की जावून आला होता, तो इथे राहात होता की विदेशात राहात होता हे सांगता येत नाही. कारण हा पक्षी कुठेलंच घरटं जास्त काळ वापरायचा नाही. सारखा फिरत राहायचा. यावेळी मात्र तो आमच्या लंगोटीयार कंपनीसोबत बराच काळ राहिला. दुसरे जास्त कुणी आले नव्हते.
असेच एकदा दुपारी साडेतीन-चार वाजता त्याच्या बंगल्याच्या लॉनवर बसलो होतो. त्याच्या सोबत असताना आपण काहीही बोललो, तरी ते थेट त्याला उद्देशून नसेल तर तो बिलकूल प्रतिसाद देत नाही - तसा तो आताही आपण होऊन बोलत नव्हता आणि आम्ही सर्वजण तो काय म्हणतो याची वाट पाहात होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा ते भयंकरच असते. एकदा त्याला त्याच्या तोंडावरच मी चिडून म्हणालो होतो, "तू मूर्ख आहेस!"
"इट इज नो मोअर अ न्यूज. टेल समथिंग न्यू, इफ यू हॅव!" माझ्याकडे न बघता तो शांतपणे उत्तरला. हे वाक्य पूर्ण झाल्यावर त्याच्या डोळ्यांचा फोकस क्षण-दोन क्षणांसाठी माझ्या डोळ्यांवर स्थिरावला. एखाद्या सिंहाच्या पिंजर्यात उतरून त्याच्यासमोर तावातावाने, "तु एक बंदिस्त जनावर आहेस" असे मोठ्ठ्याने ओरडावे आणि त्यानं भयानक गर्जना करून त्याचे ते दोन हिरवट डोळे आपल्यावर रोखावेत तसं मला जाणवून गेलं.
"म्हणजे, अगदी अस्संच काही म्हणायचं नाही मला..सॉरी!" घशात आलेला आवंढा गिळत मी म्हणालो.
"सॉरी? उलट मीच तुझा आभारी आहे, तु माझ्या हिताचंच विधान केलंस तुझ्या दृष्टीनं, पण ते माझ्या कक्षेत आलं तेव्हा गैरलागू झालं - तु कस्संही, काहीही म्हण, ते मला कसलीच इजा करू शकत नाही..करूनच घ्यायचाच असेल, तर त्यात माझा फायदा आहे!”
या अशाच चक्रावून टाकणार्या त्याच्या बोलण्यामुळं त्याला सतत भेटत राहावं, त्याला मुद्दाम डिवचावं आणि त्याची मुक्ताफळं ऐकावीत असं आमच्या सगळ्या भिडूंना वाटत राहातं. तो आमच्यासोबतच असा वागतो असं नाही, आयुष्यात कधीच न पाहिलेल्या माणसाला सुध्दा तो याच स्टाईलमध्ये बोलतो. एकदा मॉलमध्ये मॅनेजर असलेल्या आमच्या एका दोस्ताकडं तो आणि मी गेलो होतो. चहा पाजवायला म्हणून तो मित्र आम्हाला घेऊन "एक्झिट" असे लिहीलेल्या गेटमधून बाहेर पडला. गेटवर असलेल्या सिक्युरिटीवाल्यानं मॉलच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या आमच्या मॅनेजर मित्राची तलाशी घेतली. तसा नियम असेल त्यांचा.
"तु पृथ्वीवरचा सर्वात मोठा बिनविश्वासू माणूस आहेस - हेच काम करीत राहिलास अजून काही दिवस, तर बायकोची पण तलाशी घेशील झोपण्यापूर्वी" हा कडाडला.
तो फुकट पोलीसगिरीवाला सेक्युरिटी भूत पाहावं तसं त्याच्याकडं पाहात होता. काहीच बोलला नाही. मग न राहावून मी माझी अक्कल पाजळलीच -
"तु पण ना, त्याचा काय दोष आहे रे? त्याला जो नियम सांगितलाय तो पाळतोय तो" मी.
"आणि मी काय करतोय मग?"’ तो.
"काय करतोयस म्हणजे?" मी.
"मी पण नियमच पाळतोय, पण मला ते कुणी सांगितलेले नाहीत" तो.
"कसला नियम?"
"कॉलींग ए स्पेड, स्पेड!"
सांगत बसायचं म्हटले तर त्याचे अनेक किस्से आहेत. एकदा आम्ही असेच नेहमीसारखे त्याच्या आवडत्या वामा इंटरनॅशनल मध्ये बसलो (!) होतो. हे हॉटेल त्याला नुसतंच आवडतं. म्हणजे तो तिथं खातही नाही पीतही नाही. मला आवडू शकणारे आणि मी त्यांना आवडू शकेल असे लोक कुठेही असू शकतात त्यामुळे त्याचा वावर सगळीकडेच असे. शहराशेजारच्या अॅसिलममध्येही तो आला की दोन-चार वेळा जाऊन येत असे. तर सांगत काय होतो की आम्ही वामा इंटरनॅशनलमध्ये बसलो होतो. आजूबाजूच्या टेबलवर दबक्या आवाजातील गोष्टींसोबत ग्लास किणकिणत होते. भींतींवर विश्वामित्राच्या तपोभंगाचे दृश्य दाखणार्या पेंटींगवर एवढा झिरझिरीत मंद उजेड कुठून पडलाय हे मी शोधून काढायचा प्रयत्न करीत होतो आणि हुडहुडी सुटेल एवढे थंड वाटत असल्याने माझ्या अंगातले जर्किन जास्तच घट्ट करून घेत होतो. शेजारच्या टेबलावरचे युजिनी गॅंगशी आहे नाही म्हणावी अशी पुसटशी ओळख असणारे काही भिडूही रंगात आले होते. त्यांचं आवरत आलं होतं वाटतं, उठायच्या तयारीत होते. त्यातला एकजण यूजिनीकडे हात दाखवत वेटरला म्हणाला,
"आज टिप त्या साहेबांकडून घ्यायची"
युजिनीनं ते ऐकलं आणि वेटरला म्हणाला,
"तुझं नाव कधी छापून आलंय का पेपरमध्ये?"
"पेपरमध्ये नाव? नाही ब्वॉ..का?"
"उद्या येणार आहे मग, तु आज टीप द्यायची मला...लगेच उद्या सकाळच्या पेपरमध्ये बातमी "वेटरने दिली गिर्हाईकाला टीप"....नाहीतरी त्या मूर्ख पेपरवाल्यांना काही धंदा नसतो... बघ...चान्स घालवू नको.."
वेटरला काही कळलं नाही. तो बावळट चेहरा करून तिथेच उभा राहिला.
आमच्या शेजारच्या टेबलवरची गॅंग पेटली.
"रघू, आम्ही तुझ्या नेहमीच्या टीप पेक्षा हजार रूपये जास्त देतो, दे म्हणे तु त्यांना टीप..बघुतच..." असं म्हणून त्या लोकांनी खिशातून पैसे काढून रघूच्या हातात कोंबले. वेटर रघू भांबावला. तो मान खाली घालून चेहरा आणखी बावळट करून, गालातल्या गालात हसू लागला.
ती लोकं आरडा-ओरडा करू लागली.. "रघ्या, दे त्यांच्या हातात..बघू म्हणे खरंच "
"अरे दे की, त्यांनी दिलेच आहेत..तुला फक्त माझ्या हातावर ठेवायचे आहेत....तुझी टीपपण मिळतेय" असं म्हणून युजिनीनं हात पुढे केला.
त्या गॅंगचा आरडा-ओरडा ऐकून लोकांच्या नजरा आमच्या टेबलाकडे रोखल्या गेल्या आणि बारमधला तो नेहमीचा मंद आवाजात चालणारा गोंगाट अचानक शांत झाला.
रघ्याला काही कळेना. तो आणखीनच भांबावला. बारमधल्या एवढ्या सगळ्या लोकांनी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकाच वेळी, एवढ्या उत्कंठेनं नजरा लावल्या होत्या. तो त्या क्षणाला त्या वामाच्या बारमधला सर्वात महत्वाचा माणूस बनला होता; घायबरून गेला होता.
"साहेब लोकांना कशी टीप द्यायची...नको...हे घ्या.. " चाचरत-चाचरत त्यांच्या तोंडातून शब्द फुटले आणि तो त्या गॅंगने दिलेले पैसे परत करू लागला. पण आता मामला बिघडला होता. समोरची गॅंग जास्तच पेटली होती; रघू वेटर चांगलाच अडकला होता.
"दे म्हणतो ना आम्ही, बघ बरं रघ्या, आयुष्यात पुन्हा कधी टीप मिळायची नाही आमच्याकडून.."
" ...... "
रघू आळीपाळीनं नुसताच गर्दीकडं आणि आमच्या दोन गॅंगकडं बघू लागला. युजिनीनं ते हेरलं आणि त्यांच्या टेबलावरची रिकामी झालेली स्कॉच उचलली
"ठिक आहे...पैसे नको देऊ, ही बाटली टीप म्हणून मला दे म्हणे..."
"न्है हो साहेब..माफ करा.." रघू पक्का होता. ती उत्कंठीत झालेली गर्दी सोडून जाण्याच्या बेतात आला.
"रघूराम, तु जब मरेगा ना...गरीबी में मरेगा रे... लेकीन बहोत शांती से मरेगा तु...पाहा याच्याकडं - लोक पैसे मिळत नाहीत म्हणून गरिब राहात नाहीत...मनाची भुक्कड श्रीमंती आड येते...." युजिनीनं त्या दृश्याचा क्लोजिंग डायलॉग टाकला.
जाताना त्या गॅंगमधल्या प्रत्येकानं युजिनीसोबत शेकहॅंड केला. आमचं संपवून आम्हीही थोड्यावेळानं निघालो. रघुनंच सर्व्ह केलं. युजिनीनं काही घेतलं नव्हंत. त्यानं जाताना रघूच्या त्या जाड बिल-कम-टीप फाईलमध्ये स्वत:चे हजार रूपये सरकवले.
दुसर्या दिवशी त्या गॅंगमधले लोक आणि रघूही युजिनीच्या लॉनवरच्या लोकांमध्ये दिसत होते.

२१ ऑगस्ट, २०१०
शेरलॉक होम्सचे जग भाग ३ आणि ४
शेरलॉक होम्सचे जग भाग ३
शेरलॉक होम्सच्या कथा, मालिका जगात सगळीकडे उपलब्ध आहेत - कुणालाही त्या वाचता, पाहाता येऊ शकतात आणि त्यात रंगून जाता येते. शेरलॉक होम्सच्या समग्र कथांचा अनुवाद गजानन जहागिरदार यांनी केलेला आहे आणि जालावरच्या काही हौशी अनुवादकांनीही मस्त अनुवाद केले आहेत. ते इथे, इथे आणि या इथे आणि हे इथे एक वाचायला मिळतील. म्हणून मी शेरलॉक होम्सच्या कथा भाषांतरीत न करता शेरलॉक होम्सबद्दल, त्याच्या जगाबद्दल लिहू इच्छितो. हे रसग्रहण नाही हेही मागच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. बर्याच मायबोलीकरांनी मागच्या पोस्टला दिलेल्या प्रतिसादात डिटेलमध्ये लिहीयला सांगितले आहे. हे लिखाण होम्सने निर्माण केलेल्या पूर्वसंचितामुळे सगळ्यांना आवडले आहे. काही चतुर वाचकांना शेरलॉकबद्दल लिहीताना मला किती अक्कल पाजळता येईल याची उत्सुकता लागुन राहिली आहे (मला स्वत:ला सुध्दा!!) पण माझी अक्कल मला दिसत नसल्यानं ती किती आहे आणि पाजळताना कितीवेळ जळेल, मध्येच संपली तर काय? याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही. संपेल तेव्हा निश्चितच माझ्या अगोदर ते तुम्हाला कळेल ! शेरलॉक होम्स आणि त्याचे जग हे एका माणसाचे स्वप्न होते जे नंतरच्या बर्याच माणसांना पाहायला आवडते कारण ते सुंदर आहे. तो गूढ वाटणार्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो कारण ते गूढ काल्पनिक आहे आणि ते गूढ नसून सत्यच असल्याचा भास उत्पन्न करणारी जबरदस्त शैली सर ए. सी. डॉयलकडे होती. जिज्ञासूंना शेरलॉक होम्सच्या जन्माची कथा खुद्द सर आर्थर कॉनन डॉयलच्या तोंडून इथे ऐकायला मिळेल. शेरलॉक होम्स च्या निर्मात्याला वास्तविक गूढे किती उकलता आली असती हेही एक गूढच आहे. मला आता नेमका संदर्भ आठवत नाही, पण लोकमान्य ते महात्मा या सदानंद मोरे यांच्या ग्रंथात इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपली क्रांतीकारक मंडळी रचत असलेल्या कटांचा (अर्थातच साहेबाच्या नजरेतून), इंडिया हाऊसपासून जवळच असलेल्या २२१बी, बेकर स्ट्रीटला पत्ता नव्हता असा एक टोला हाणलेला पुसटसा आठवतो (मराठी लंडनर्स, थ्रो लाईट प्लीज!) . इथे सदानंद मोरेंचा नेमका रेफरंस पॉईंट काय आहे हे ज्यांच्याकडे लोकमान्य ते महात्माचे खंड आहेत त्यांनी सांगावे. होम्सच्या कथांचा सूत्रधार असणारा डॉक्टर वॉटसन हे पात्र दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सर डॉयल हे आहेत. तेच खरा शेरलॉक होम्सदेखील आहेत. पण तसा त्यांनी दावा केला असता तर आफत झाली असती (खर्या क्लाएंट्सची रांग लागली असती दारासमोर) कारण होम्सची कथामालिका स्ट्रॅण्डमधून प्रकाशित होत असताना लंडनवासियांमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. सर ए.सी. ना होम्स या पात्राच्या निर्मितीची प्रेरणा जोसेफ बेल या वैद्यकिय प्राध्यापकाकडून मिळाली जे त्यांच्या रूग्णांबद्दल फक्त त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या रोगाचे निदान करीत, त्याचे राष्ट्रीयत्व, व्यवसाय, पूर्वेतिहास सांगत.
शेरलॉक होम्सचे जग भाग ४
अगदी सर्व प्रकारे हास्यास्पद ठरायला तयार राहुन पुन्हा एकदा मी हा भाग लिहायला घेतो आहे. सर आर्थर यांनी केलेले आध्यात्मविषयक लिखाण मी अद्यापपर्यंत वाचलेले नाही. पण त्यांना कसले तरी सायकिक एक्स्पेरियन्सेस होते, त्यांनी त्याबद्दल लिखाण केले आहे, व्याख्याने दिली आहेत आणि त्यांच्या हयातीत जागतिक साहित्य वर्तुळात त्याबद्दल बरेच प्रवाद निर्माण झाले असल्याचे जिज्ञासू वाचकांनी खुद्द त्यांच्याच तोंडून मी दुवा दिलेल्या यूट्यूबवरील चित्रफितीत ऐकले असेल. यासंदर्भात सर आर्थरचे लिखाण वाचले असेल त्या वाचकांनी कृपया प्रकाश टाकावा. ए स्टडी इन स्कार्लेट हे समग्र शेरलॉक होम्समधील प्रकरण वाचत असताना मी हा भाग लिहायला घेतला आहे. शेरलॉक होम्स आणि वॉटसन या व्यक्तीरेखा सर आर्थरच्याच सावल्या आहेत, त्या दंतकथा आहेत, त्यांचा चाहता वर्ग आहे - आणि या व्यक्तीरेखा या चाहत्यांसाठी खर्या आहेत. एकूणच शेरलॉक-वॉटसन-डॉयल आणि त्यांचे जग यातून तयार झालेल्या रसायनात सत्य आणि काल्पनिकता यांचा बेमालूम मिलाफ आहे, तो झिंग आणतो. मी सर डॉयलच्या या जगाकडे पाहात असताना ते एका कॅलिडोस्कोपचे रूप घेते - या कॅलिडोस्कोपचा केंद्रबिंदू कधी सर डॉयल असतात, कधी होम्स तर कधी वॉटसन.
लंडन विद्यापीठातून एम.डी.ची पदवी घेतलेल्या डॉक्टर वॉटसनला सहायक सर्जन म्हणून भारतात असलेल्या रेजिमेंटमध्ये रूजू होण्यासाठी मुंबईत पाठविण्यात येते. त्याच्या रेजीमेंटने तो भारतात येण्यापूर्वीच युध्दग्रस्त अफगाणिस्तानात म्हणजे कंदाहारला कूच केलेले असते. मैवंदच्या तुंबळ लढाईत त्याच्या खांद्यात गोळी घुसल्याने तो सैन्याच्या कामी बेकार ठरतो, त्याला पेशावरच्या इस्पितळात काहीकाळ ठेवून त्याचे आरोग्य न सुधारल्याने सैनिकी मेडिकल बोर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या आरोग्यात सुधारणा करून घेण्यासाठी लंडन पाठवते. आडव्या-तिडव्या पसरलेल्या इंग्लंडमध्ये कुणीही त्याचा नातेवाईक नाही - खिशात अकरा शिलींग आणि सहा पेन्स ही दिवसाकाठीची कमाई आणि खांद्यात जेझाईल बुलेटच्या वेदना यांच्यासोबत तो लंडनच्या रस्त्यांवरून निरर्थक भटकतोय - आणि सध्या त्याचा मुक्काम स्ट्रॅण्ड भागातील हॉटेलात आहे. पैसे संपत असल्याचे जाणवताच तो कमी खर्चिक भागात मुक्काम हलविण्याच्या तयारीत आहे किंवा त्याला हॉटेल सोडून स्वत:ची जागा शोधावी लागणार आहे.
लंडनमध्ये असाच निरर्थक हिंडत असताना स्टॅम्फर्ड नावाचा कुणीतरी जुना परिचित त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. लंडनच्या त्या अफाट, अनोळखी गर्दीत या स्टॅम्फर्डच्या तोंडावरील हसू डॉ. वॉटसनला सुखावून जाते. डॉ. वॉटसन बार्टसमध्ये शिकत असताना हा स्टॅम्फर्ड त्याच्या हाताखाली ड्रेसर असतो; तो काही त्याचा जीवाभावाचा दोस्त नसतो पण वॉटसनची जखमी मन:स्थिती स्टॅम्फर्डला मिठीच मारायला भाग पाडते - स्टॅम्फर्डलाही आनंद होतो. खुशीखुशी में वॉटसन साहेब उनके इस पुराने आदमी को खानेपर चलने की दावत देते है आणि बग्गीतून ते हॉटेलच्या दिशेने निघतात.
डॉ. वॉटसनची हालहवाल विचारताना स्टॅम्फर्डला कळते की त्याला राहायला स्वस्तातल्या जागेची गरज आहे. स्टॅम्फर्डला दिवसभरात घडलेल्या योगायोगाचे आश्चर्य वाटते कारण त्याचे आणखी दुसर्या माणसासोबत सुध्दा स्वस्तातल्या राहाण्याच्या जागेबद्दलच बोलणे झालेले असते. वॉटसन स्टॅम्फर्डला एकदम उसळून या दुसर्या माणसाबद्दल विचारतो. तो माणूस इस्पितळातील रासायनिक प्रयोगशाळेत कामात गुंतलेला आहे आणि सुंदर अशा खोल्यांचा सूट मिळूनही एकट्याला भाडे परवडत नसल्याने त्या घेता येत नसल्याबद्दल आज सकाळीच त्याने स्टॅम्फर्डसमोर नाराजी व्यक्त केलेली असते.
हे ऐकून डॉक्टर वॉटसन स्टॅम्फर्डला सांगतो की खरच त्या माणसाला सूट मध्ये कुणी पार्टनर हवा असेल, तर त्यासाठी वॉटसनच योग्य माणूस आहे. एकाकी राहाण्यापेक्षा त्याला एखाद्या पार्टनर सोबत राहाणे मस्त वाटते.
वाईनचा चषक ओठाला लावलेला असताना त्यातून विचित्रपणे डॉक्टर वॉटसनकडे पाहात स्टॅम्फर्ड उद्गारतो "तु अजून शेरलॉक होम्सला ओळखत नाहीस, ओळखत असतास तर कदाचित तो पार्टनर म्हणून तुला तो नको असता"
वॉटसनला काहीतरी भानगड असल्याचा वास येतो आणि स्टॅम्फर्डला तो तसे विचारतो. शेरलॉक होम्सबद्दल काही भानगड नाही, मी तसे म्हणालो नाही, पण तो विचित्र माणूस आहे - त्याला विज्ञानाच्या विशिष्ट शाखेत भलती उत्सुकता असल्याचे, आणि एवढे वगळता त्याची बाकी इतर काही भानगड नसल्याचे स्टॅम्फर्ड सांगतो. मग तो काय वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी आहे का ही डॉक्टर वॉटसनची पुन्हा एकदा पृच्छा. नाही, मला काहीच माहित नाही त्याचा नेमका इंट्रेस्ट काय आहे तो पण तो शरीररचना शास्त्रात निष्णात आहे तो प्रथम श्रेणीचा केमिस्ट आहे हे मी विश्वासपूर्वक सांगू शकतो, पण तो कोणत्याही औपचारिक वर्गाला बसत नाही. त्याचा अभ्यासविषय भलता विस्कळीत आणि जगावेगळा असल्याचे, त्याच्या जगावेगळ्या ज्ञानामुळे प्रोफेसरमंडळीही अचंबित होतात असे स्टॅम्फर्ड वॉटसनला सांगतो. तो नेमकी काय झक मारतोय हे तु त्याला कधीच विचारले नाहीस का हा वॉटसनचा पुढचा प्रश्न. नाही, तो नेमके काय आणि कशासाठी करतोय हे त्याच्या तोंडून वदवून घेणे सोपे नाही, पण तो चुकून-हुकून त्याच्या विचित्रपणाच्या झटक्याच्या अमलाखाली असेल तरच त्याबद्दल बडबडू शकतो असे स्टॅम्फर्डचे उत्तर.
मला या माणसाला भेटायला आवडेल, मला असाच अभ्यासू आणि झक्की माणूस पार्टनर म्हणून आवडेल कारण मला सतत बकबक करणारा आणि अतिउत्साही साथीदार नकोय, मी अफगाणिस्तानात अशाच वातावरणात राहून आलोय, माझी आणि शेरलॉकची कशी भेट घडू शकेल? वॉटसन.
तो प्रयोगशाळेत नक्की भेटतोच भेटतो - तो एकतर कित्येक आठवडे तिथे येत नाही किंवा तो सकाळपासून रात्रीपर्यंत तिथेच पडिक असतो, तुला जमणार असेल तर खाणं-पिणं झाले की आपण तिकडेच निघू - खाल्लेले अन्न आणि पिलेल्या वाईनमुळे स्टॅम्फर्डही रंगात आलेला असतो.
टांगा पलटी होण्यापूर्वी आपण त्याची भेट घेऊ असे वॉटसन बोलतो आणि इतर फालतू विषयाकडे ते वळतात जे कथेत दिलेले नाहीत.
हॉटेलपासून इस्पितळाच्या रस्त्यावर स्टॅम्फर्ड डॉक्टर वॉटसनला त्याच्या होऊ घातलेल्या पार्टनरबद्दल आणखी तपशील पुरवतो.
तुमचं जमल नाही तर नंतर मला फुकट दोष द्यायचा नाही, मी त्याला प्रयोगशाळेत चुकून-हुकून भेटलो तेव्हा मला त्याच्याबद्दल जे थोडेफार कळले ते तुला सांगितलेय, त्याच्यासोबत राहाण्याचा सुलेमानी किडा तुझ्या डोक्यात वळवळलाय, नंतर माझ्या डोक्यावर खापर फोडायचे नाही - स्टॅम्फर्ड.
तसे काही नाही, आमचे जमले नाही तर तिथेच मामला खतम करू, पण स्टॅम्फर्डा खरे सांग, तु या बाबतीत राहुन-राहुन तुझ्या काखा का वर करतोयस? आपण ज्याला भेटायला जात आहोत तो एखादा माथेफिरू तर नाही ना? जरा भडाभडा सांग - वॉटसन.
जो देखा-समझा जाता है वो हमेशा ही लफ्जों में बयॉं किया नही जा सकता मिस्टर वॉटसन, मेरी नजर में होम्स कुछ ज्यादाही पेचिदा चीज है - वो कभीकभी गर्मखूनी से, काफी सख्ती से पेश आता है. मी त्याला एकदा एका मित्राला आग्रहाने अफू खाऊ घालण्याच्या आवेशात पाहिले आहे, हा काही नशाबाजी करायचा आग्रह नव्हता, अफू खाल्ल्यावर माणसावर अगदी अचूक, तंतोतंत परिणाम काय होतो ते पाहाण्याच्या कुतूहलाचे भूत त्याच्यावर स्वार होते. आणि हे कुतूहल शांत करण्यासाठी, मला खात्री आहे - त्याने स्वत: विषदेखील प्यायला कमी केले नसते.
ही अपिअर्स टू हॅव ए पॅशन फॉर डेफिनीट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज. (त्याला कसलेतरी अंतिम आणि अचूक ज्ञान मिळवण्याची मस्ती आहे ) स्टॅम्फर्ड.
इथे स्टॅम्फर्ड आणि डॉक्टर वॉटसन या दोघांच्याही मुसक्या बांधून त्यांना माझ्या खोलीतील पुस्तकांच्या कपाटात कोंडतोय. एवढ्या एका वाक्याकरिता वरचा बेवकूफपणा करावा लागला.
दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑ऽऽऽऽऽट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज
शेरलॉक होम्स नावाचे हे पिल्लू त्याचा ओरिजीनल फादर सर आर्थर कॉनन डॉयलची ही आकांक्षा होती - डेफिनिट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज. बुध्दी, तर्क, विचारशक्तीच्या वाटा आडवाटांनी डेफिनिट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेजचा शोध घेणार्यांच्याच हातून दंतकथा निर्माण होतात. भारताच्या कोट्यवधी पिढ्या याच शोधात खलास झाल्या. कृष्ण, शंकराचार्य, गौतम बुध्द, महावीर, विवेकानंद, रजनीश/ओशो, जे. कृष्णमूर्ती, यु.जी. कृष्णमूर्ती या त्यातल्या काही ठळक दंतकथा आहेत. शेरलॉक होम्स आणि मंडळी हीदेखील एक कल्ट आहे, संप्रदाय आहे. त्यांचा मार्ग तथाकथित सायंटिफिक आहे - कारण स्पष्ट आहे. त्याची मुळे पश्चिमेत आहेत. पण पूर्व असो की पश्चिम दी पॅशन फॉर डेऽऽऽफिनी॑ऽऽऽऽऽट अॅण्ड एक्झॅक्ट नॉलेज अगदी सारखी असते. ही पॅशन जगातल्या इतर कुठल्याही संसर्गजन्य गोष्टीपेक्षा लक्षावधीपट संसर्गजन्य असते. हा संसर्ग झालेल्या लोकांनाच सांप्रदायिक म्हणतात. इथे फरक फक्त एवढाच आहे की शेरलॉक सारख्या लिजंड्ससमोर खून, चोर्या, घोटाळे यासारखी ढोबळ वाटणारी गूढे ठेवली जातात तर आपल्या भारतीय मंडळींसमोर "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले जास्त वैयक्तिक गुढ प्रश्न विचारले जातात. मानवी जीवनाच्या सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल असल्या विभाजनामुळे मानव जातीचा प्रवास दोन विरूध्द दिशांना होत असलेला दिसत असला तरी त्यांचा संगम एकाच बिंदूत होत असतो. वर उल्लेखिलेल्या भारतीय लिजंडसना "आत्मा म्हणजे काय?", "देव आहे का?", "स्वर्ग आहे का?", "सिध्दी आहेत का? कशा मिळवता येतील?" असले प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी ज्ञानापासून मुक्त व्हावे लागेल अशी उत्तरे दिलेली आहेत - ती भारतीय पटलाचा विचार करता ठिक आहेत. सर डॉयलने केलेली शेरलॉक या पात्राची शुध्द तार्किक मांडणी पाहाता त्याने जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा आग्रह धरायला हवा. पण तो म्हणतो - "I consider that a man's brain originally is like a little empty attic, and you have to stock it with such furniture as you choose. A fool takes in all the lumber of every sort that he comes across, so that the knowledge which might be useful to him gets crowded out, or at best is jumbled up with a lot of other things so that he has a difficulty in laying his hands upon it. Now the skilful workman is very careful indeed as to what he takes into his brain-attic. He will have nothing but the tools which may help him in doing his work, but of these he has a large assortment, and all in the most perfect order. It is a mistake to think that that little room has elastic walls and can distend to any extent. Depend upon it there comes a time when for every addition of knowledge you forget something that you knew before. It is of the highest importance, therefore, not to have useless facts elbowing out the useful ones."
शेरलॉक उकलीत असलेली कोडी भौतिक स्वरूपाची असल्याने भौतिक कोडी सोडविण्यासाठी मेंदूरूपी खोलीत किमान आवश्यक फर्निचर ठेवायला त्याची ना नाही. फक्त आवश्यक तेवढीच आणि तितकीच साधने त्याला लागतात. कोपर्निकसने मांडलेला सौरमालेचा आराखडा जाणून घेणे त्याच्या लेखी बेकार गोष्ट आहे. तो म्हणतो -
You say that we go round the sun. If we went round the moon it would not make a pennyworth of difference to me or to my work.
क्रमश:
टीप: भाग ३ मधील काही वाक्ये मायबोलीवरील हे लेखन आवडलेल्या वाचकांना उद्देशून आहेत
लेखन सूत्रे:
शंकराचार्य,
शेरलॉक होम्स,
सर आर्थर कॉनन डॉयल
१९ ऑगस्ट, २०१०
शेरलॉक होम्सचे जग: भाग २
मागच्या पोस्टमधील शेवटचा परिच्छेद वाचुन मी इथं शेरलॉक होम्सच्या डिटेक्टीव्ह कथांचे रसग्रहण लिहीत आहे असा समज होण्याची शक्यता आहे. लिखाण पुढे जाईल तसं अगदीच आवश्यकता असेल तेव्हा ते घडेलच; पण रसग्रहण करून देण्यावर माझा विश्वास नाही. रसग्रहण म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या रसातून दुसर्याला कनेक्शन देण्यासारखे वाटते; तो रस कितपत दुसर्यापर्यंत जातो देवजाणे. कदाचित यामुळेच रसग्रहण छाप पुस्तके निरस वाटतात. माझा इंटरेस्ट आहे तो सर ए.सी. डॉयल (अंशत:) शेरलॉक, त्याच्या भोवतीचे जग, त्याकाळची इंग्लिश भाषा, काही प्रमाणात इंग्रजांचे रितीरिवाज यांची उचक-पाचक करणे यात. कारण शेरलॉकच्या सर्व गूढकथा याच जगात उगवल्या होत्या. शेरलॉक हे एक पात्र आहे - त्यात ओतलेला ए.सी. डॉयलचा मेंदू महत्वाचा आहे - यातून निष्कर्ष वगैरे देखील काही काढायचा नाही - मी फक्त शेरलॉक होम्सच्या गूढरम्य रानातून येढा करायला निघालो आहे. येढा करणे म्हणजे सहज शिवारातून आजूबाजूचे पीक-पाणी, पक्षी, झाडे-वेली पाहात-पाहात एक चक्कर टाकणे. तशी ही चक्कर आहे. थोडक्यात शेरलॉकचे जग हे निमित्त आहे आणि मी इथं माझी अक्कल पाजळतोय.
मागच्या पोस्टमध्ये शेवटच्या परिच्छेदात जी शब्दांची जमवाजमव केली आहे ती फक्त त्याकाळच्या सुसंघटीत, सूत्रबध्द आणि फुल्ली नेटवर्क्ड इंग्लिश जगताची एक किंचीतशी झलक आहे. ए.सी. डॉयलने मांडलेले ते पुस्तकी जग वाचताना दुवे कसे फटाफट जुळतात - ए. सी. डॉयलने मांडलेले जग ही त्याकाळच्या इंग्लिश जगताची एक सुंदरशी झलक आहे. हे इंग्लिश लोकच मुळात सुव्यवस्थित, कायदेकानू करणारे आणि केलेल्या कायद्याला सार्थकी लावणारे, शिस्त बाळगणारे. काहीवेळा अतिरेक होतो; पण शिस्त मस्त असते. बोअर झालं. अर्थातच एक किस्सा सांगावा लागणार. टायटॅनिक चित्रपटात जहाज बुडताना लिओ डी’कॅप्रिओला सेलरमध्ये नेऊन पाईपला बांधलेले असते. केट विन्स्लेट त्याला शोधत येते. त्याला हातकडी घालून पाईपला अडकवलेला असतो. केट कुर्हाड शोधून आणते आणि हातकडी तोडायला धावते. तो तिला आधी लाकडी टेबलावर कुर्हाड सरळ मारण्याची प्रॅक्टीस करायला लावतो. दोन-तीनदाच. तिकडे जहाज फुटलेय. माणसं मेलीत. यांच्याही गळ्यापर्यंत पाणी येतेय आणि हा बाबा तिला म्हणतोय कुर्हाड आधी सरळ मारायला शिक, मग हातकडी तोड. ती तसे करते आणि हातकडी तोडते. हे भारतात होणे शक्य नाही! भारतीय माणूस म्हणाला असता - हाण कसाही धडाका, हात तोड! पण लवकर सोडव ! भारतीय (आणि त्यातल्या त्यात मल्लू - मगधीरा!!!) हिरो-बीरो असता तर तो बुडते जहाज घेऊनही आकाशात उडाला असता हा भाग अलाहिदा !
तर पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो. शेरलॉकच्या कथांतून आपल्या मनाची पकड घेणारे सुसंघटीत, सूत्रबद्ध आणि फुल्ली नेटवर्क्ड जग ही ए.सी. डॉयलची काल्पनिक निर्मिती आहे; पण त्याची ही काल्पनिक निर्मिती हिंदी सिनेमासारखी बेफाट नाही. ती तर्काच्या कसोटीवर खरी उतरूनही सत्य शोधल्यानंतर तर्काला चारीमुंड्या चीत करणारी आहे. शेरलॉकचीच वाक्ये घेतो:-
It was easier to know it than to explain why I know it. If you were asked to prove that two and two made four, you might find some difficulty, and yet you are quite sure of the fact.
(मला कसे समजते हे विश्लेषण करीत बसण्यापेक्षा ते समजण्याची प्रक्रिया सुगम असते. तुम्हाला दोन आणि दोन चारच का होतात हे सिध्द करायला सांगितले तर अवघड होईल, पण दोन आणि दोन चारच होतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्यदेखील असते - ए.सी. डॉयलच्या कथांचाच नव्हे तर जगातील सर्व गुढातिगुढांचा (यात तथाकथित भारतीय आध्यात्मिक गुढे देखील आली) डोलारा या सूत्रावर उभा आहे - बाकी जे आहे तो सगळा रंगीत, निव्वळ चटकदार तपशील आहे - आणि एका ठराविक मर्यादेनंतर तपशील कितीही रंगीबेरंगी, चटकदार असो तो रंगहीन होतो; निरस होतो )
I never guess. It is a shocking habit — destructive to the logical faculty.
(मी कधीच अंदाज लावत नाही. ती बेकार सवय आहे - ती सरळ सत्यापर्यंत घेऊन जाणार्या तर्काच्या मार्गावरून कल्पनांच्या जंगलात घेऊन जाते)
डिटेक्टीव्ह कथांचे सोडा, आपले रोजचे दैनंदिन आयुष्य नुसते अंदाज लावत बसण्यात, आणि आपणच गेस केलेल्या गोष्टींभोवती गोल-गोल फिरण्यात उलटते. कल्पना काहीतरी वेगळीच असते आणि रिअॅलिटी अगदीच वेगळी - आपण रिअॅलिटीपासून कोसो दूर - कल्पनांच्या जंगलात वाट चुकलेलो असतो. पुढं मग आपण निर्माण केलेली कल्पना खोटी ठरली की आदळआपट, आपली कल्पनाच कशी खरी आहे हे सिध्द करण्याचा अतोनात आटापिटा - आणि वेळोवेळी सत्यतेच्या आसूडाचे फटके खाणे. एकतर सत्यतेला सिध्द होण्याची काही गरज नसते - जो माणूस सत्यतेला सिध्द करू पाहातो तो अर्थातच भटकलेला असतो - मुळात माणूस सत्यता सिध्द करीत नसतो तर तो स्वत:ला सिध्द करीत असतो. त्यामुळे सत्य स्वयंसिध्दच असते, ते तसेच राहाते आणि माणसे उलटतात - संपून जातात. उदा. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा एसएमएस आला आहे- "अरे झोपला आहेस का?" आता मी झोपलेलो असेन तर उत्तर देणार नाही आणि ती समजून जाईल की मी झोपलो आहे - हा साधा तर्क आहे, सत्यतेपर्यंत घेऊन जाणारा आहे. पण इथेच जर कल्पना मध्ये तडमडली तर "झोपलाच असेल कशावरून? मुद्दाम उत्तर देत नसेल तर? " की झाली बेजारी सुरू तिकडं. आता मी झोपलेला नसून इथे ही पोस्ट टाईप करतोय ही रिअॅलिटी आहे. उत्तर आलेले नाही त्याअर्थी झोपला आहे हे समजणे तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर आहे. हे विश्लेषण मनोरंजक नाही. थांबतो.
शेरलॉक होम्सचे जग: भाग १

चुकांच्या दुरूस्त्या: १. सर ए.सी. डॉयलची पहिली डिटेक्टीव्ह कथा १८८७ साली प्रसिध्द झाली. त्याचा जन्मच १८५९ चा आहे; तो काय १८५७ मध्ये कथा लिहीणार. माझी नजरचूक.
२. सर ए.सी. ने पहिली डिटेक्टीव्ह कथा लिहीली तेव्हा रेल्वे धावायला लागून पंच्याऐंशी वर्षे झाली होती.
अजूनही काही असतील तर कृपया दाखवा; दुरूस्त करू.
छायाचित्रे: मायाजालातून साभार.
लेखन सूत्रे:
आर्थर कॉनन डॉयल,
इंग्लंड,
ऑब्झर्व्हर,
टाईम्स,
मॉर्निंग पोस्ट,
शेरलॉक होम्स
१६ ऑगस्ट, २०१०
वन्स अपॉन ए टाईंब इन मंबई !!
छ्या! छ्या! छ्या !! ह्यापरता कुनीबी एक ब्लॉगर धरून त्याला ड्वायलाग खरडायला लावले अस्ते तर जास्त बर झालं अस्त का न्हाई? जुर्म के रास्ते कितने भी मखमली क्यूं ना हो सर, खतम तो जेल के कंबल में ही होते है - आता हा बोलून झाला तर लगीच दुसरा कशाला मारायचा? पन न्हाई - गाडी चाहे कितनी भी तेज हो सर - उसे रोकने के लिये बस एक कील काफी है (रजत अरोरा (हा लेखक न संवादलेखक आहे) - तु फक्त काही दिवस मिसळपाव न मराठी ब्लॉगविश्वला भेट दे - हव्या तेवढ्या वस्ताद ड्वायलॉग रायटरकडून तुला शिकता येईल) (मराठी माणसा! जागा हो!! फक्त ब्लॉग लिहून गार होऊ नको )
मायला हितं बसल्या-बसल्या हाजी मस्तान न दाऊद ईब्राहिमची लागन ती खबर मिळती. आन हाजी मस्तानन दाऊदभाईवर बेतलेला हा शिणमा पार दोघाईंचीबी आबरू घालवतो. क्या दाऊदभाय, तुमारा लक्ष नाय आजकाल फिल्मिंडस्ट्रीपर. अल्कैदा के कैद में भौत बुरे फंसे तुम!
बरं झालं घरीच बसून पाह्यला. हिंदी शिणमात जान राह्यली नाय ये बच्चा-बच्चा जानता है. पन हे लोक अशा नामचीन (पक्षी:सर्कार इत्यादी, इत्यादी) लोकांयचे नावं घेऊन शिणमा तयार करतात मंग आमचा सुलेमानी किडा जागा व्हतो - की बुवा नवं काही दाखवलंय का? एक ते येडं अजय देवगण (दुवा में याद किया रे बाबा तेरेकू!! क्या यार, इतना शिनमा बनाया, तुझे एकबार भी मुस्सलमानी सलाम करते नही आया! सलाम ऐसे करताय जैसे खैरात मांग रहा हो! ) न दुसरा हा (पिसाट या शब्दा अदुगर आनी एक शब्द टाकावा वाटतुया, पन नगं - समजून घ्या ) पिसाट इम्रान हाश्मी. त्याबद्दल नाही हो - आसनं का पिसाट. पन या पिसाटाला पाह्यला दुसरे पिसाट व्हतात ते पाहुन आमाला हसावं का रडावं ते कळत न्हाय. आता तिकडं शिणमात हा बाबा कुण्या कळीला कुसकरत असंल तर इकडं त्याला पाहाणार्यांचा लगीच त्याच्या शरीरात परकाया प्रवेश हुतो आन हे बेणे एकमेकांना टाळ्या देऊ लागतात! काय अजब दुनियाय! च्यायला काही दिसानंतर हे पोट्टे नुस्ते बघे होऊन बसणार! श्या:!!! नकुच त्याच्याबद्दल ! र्हाता र्हायल्या हिरोन्या - त्यातली जी अजय देवगणसोबत असते ती (फफेद फमीज - तोतरी आहे ती! शिनमात नाही - खरी-खुरी तोतरीय! ) आन दुसरी तर पाक लालबत्तीतूनच आणल्यासारखी दिसतीय! (आमी काय हवं ते लिहू - या धंद्यात येण्यापूर्वी धा दा इच्यार करायचा हुता!)
"अॅगनेल के कान में भी उसी ने मूता होगा"
"ये घोडों पे पैसे लगाते लगाते गधों पे कब से पैसे लगाने लगे"
हे दोनच ड्वायलॉग आवडले आपल्याला (पैकी एकात नाना पाटेकर आठवला न दुसर्यात जानी राजकुमार!) - हे बी कुणातरी चंद्रू नावाच्या एक्स्ट्राच्या तोंडी आहेत !
मी पैज लावायला तयार आहे हे चंद्रू चे डायलॉग रजत अरोरानं लिहीले नाहीत!!
बास्स! कथा कशीय, नाट्य कसं आहे, प्रेक्षक बाहेर पडताना त्यांच्यावर काय परिणाम होतो (म्हणजे सुन्न होतो, मुका होतो की बहिरा होतो- हे एक सांगावं लागतं शिणमाबद्दल लिहीताना) - तर प्रेक्षकाला या शिणमात असं काहीही होत नाही - मला फक्त दर तीन पाणचट ड्वायलागला एक याप्रमाणं मोठ्ठ्या जांभया आल्या !
खरं म्हणजे बालाजी टेलीफिल्म्स आणि शोभा कपूर/एकता कपूर एवढं वाचुनच ग्रंथ बंद करायला पायजे होता - पण आमच्या एका मित्रानं टॉरंट डाऊनलोड नावाची नवी विद्या शिकवली. आता तिचं प्रात्यक्षिक करावं लागणार. कोणता डाऊनलोड करू म्हणून विचारलं तर तो म्हणे "वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई". मला काय - प्रात्यक्षिकच करायचं होत. नव्या विद्येचा वापर करून बीयेशेनेलच्या मदतीनं हा शिणमा खेचला.
आमचा भोळाभाबडा मित्र मला "पायरसी करू नको बरं का, धाड पडेल बरं का, मी जबाबदार नाय हां" असं बजावत होता. च्यायला असला शिणमा आपण तर फुकटबी पाहाणार नाही - आन तुम्ही बी पाहू ने म्हनून हे खरडलं.

Dialogoues,
Ekta Kapoor,
Imran Hashmi,
Once Upon A Time In Mumbai
१४ ऑगस्ट, २०१०
दोन चारोळ्या
॥ १ ॥
एक तरूण ब्रम्हचारी खेळत असे क्रिकेट
नॉट आऊट! धावा हजार! सगळे बोलर झाले बेजार
अखेर एका पोरीने घेतली त्याची विकेट
॥ २ ॥
एक होती नटी तिची सिंहासारखी कटी
राजवाड्यासारखा चांगला होता तिचा बंगला
पण त्याच्या दरवाजाला होत्या अनेक फटी
- मंगेश पाडगावकर

चारोळ्या,
मंगेश पाडगावकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)