७ मार्च, २०१०

शेरलॊक होमस





आर्थर कॊनन डॊयल या लेखकाच्या कल्पनेतुन जन्माला आलेले शेरलॊक होमस हे पात्र १५३ वर्षे होत आली तरी जगभरातील वाचकांच्या मनावर गारुड करुन आहे. ए. सी. डॊयलची पहिली डिटेक्टीव्ह कथा १८५७ साली सर्वप्रथम प्रसिद्ध झाली. होमससोबतच साथीदार डॊक्टर वॊटसन आणि २२१ बी, बेकर स्ट्रीट, लंडन हा पत्ता देखील अजरामर झाला. ए. सी. डॊयलचे हे पात्र (??) स्वत:ला जगातील पहीला कन्सल्टींग डिटेक्टीव्ह म्हणवुन घेते. स्कॊटलंड यार्ड देखील अनेकदा त्याच्या मदत घेताना दिसते. लंडन शहर आणि परीसरातील व्हिक्टोरीयन काळचे वातावरण, रस्त्यावरुन खड्खड करीत जाणा-या घोडागाडया, धुके, त्याकाळची रेल्वे हे सगळे अगदी जीवंत वाटते. इंग्रज लोक तपशीलाच्या बाबतीत अगदी पक्के आणि भरीस भर डिटेक्टीव्हची नजर त्यामुळे कथेत येणा-या प्रत्येक पात्राचे अगदी तपशीलवार वर्णन वाचायला मिळते.


ए. सी. डॊयलच्या डिटेक्टीव्ह कथा या, तुम्हाला अखेरपर्यंत खिळवुन ठेवतातच पण त्या व्हिक्टोरीयन इंग्लिश आणि रितीरिवाजांचा खजीनाच आहेत. शेरलॊक होमस फ़क्त त्याच्या नजरेच्या जोरावर समोरच्या व्यक्तीबद्दल काहीही माहीती नसताना अचुक माहीती सांगतो आणि ते त्याने कसे ओळखले याचे विश्लेषण करतो तेव्हा आपण चाटच पडतो. कारण आपण त्या द्रुष्टीकोनातुन विचारच केलेला नसतो. डॊक्टर वॊटसन आणि शेरलॊक २२१ बी, बेकर स्ट्रीट, लंडन च्या खोलीत बसलेल असतात, होमसच्या हातात नुकतीच आलेली तार असते आणि दारावरची घंटी वाजते, शेरलॊकने म्हट्ल्यानुसार भेटीला त्याचा होऊ घातलेला अशीलच आलेला असतो. तो घडलेल्या घटनेचे वर्णन करतो आणि घटना शेरलॊकला अपीलींग वाटली तर सुरु होतो एक अद्भुत शोध - ख-या गुन्हेगाराचा आणि गुढ उकलले जाते. (क्रमश:)

http://www.sherlock-holmes.co.uk/

२ टिप्पण्या: