१० मार्च, २०१०

खलील जिब्रान

"शासन म्हणजे तुमच्यात आणी माझ्यात झालेला करार असतो; मी आणि तुम्ही नेहमीच चुकीचे असतो."

"सर्व परिस्थितींमध्ये तुम्ही तुमच्या मित्राला समजुन घेतले नाहीत, तर तुम्ही त्याला कधीच समजुन घेऊ शकणार नाही."

"अनेक स्त्रिया पुरुषाचे ह्रदय उसने घेतात, पण थोड्याच ते सांभाळु शकतात."

"स्त्री तिचा चेहेरा स्मितहास्याखाली झाकू शकते."

"आपण नेहमीच "कालची" कर्जे फेडण्यासाठी "उद्या" कडुन कर्ज काढत असतो."

"तुम्ही कोणत्याही माणसाला तुम्हाला त्याच्याबद्दल जेवढे कळते त्यापेक्षा जास्त पारखु शकत नाही; आणि तुम्हाला कळते ते किती?"

"मी जीवनाला म्हणालो, "मला म्रुत्यूचा आवाज ऎकायचा आहे," आणि जीवनाने त्याचा आवाज चढवुन म्हटले "तु म्रुत्यूचाच आवाज ऎकतो आहेस."

"आपले सुख आणि दु:ख अनुभवण्या अगोदरच आपण ते निवडलेले असते."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा