या ब्लॉगवरील लिखाण बंद करण्यात येत आहे. इथून पुढे या ब्लॉगवर काहीही टाकले जाणार नाही. मी केलेल्या लिखाणावर ज्या लोकांनी टिप्पण्या टाकून मला आनंद दिला त्यांचा आणि टिप्पणी न टाकूनही मला तेवढाच आनंद देणार्या जगभरातील अज्ञात वाचकांचा मी आभारी आहे, तसेच ज्यांच्या ब्लॉगवर मी टिप्पण्या टाकल्या त्यांचाही मी आभारी आहे. ही पोस्ट टाकल्यानंतर दोन दिवसांनी हा ब्लॉग नष्ट करण्यात येईल. चलो. बाय!!
हे मी काल सकाळी लिहीलं होतं. मला आता ब्लॉग लिहीण्याची काही गरज राहिली नाही - म्हणून. मी ब्लॉग का लिहीत होतो? तर माझ्या डोक्यात साठलेला कचरा मला कुठेतरी टाकायचा होता - आणि मला तो महत्वाचा पण वाटत होता. त्यावर आलेल्या "मस्तच रे!" "भारी" अशा प्रतिक्रिया मला सुखावून जात होत्या. एकतर मी लिहीतो ते कचराछाप आहे हे मला पाच दिवसांपूर्वीपर्यंत माहीत नव्हतं. कारण मी अस्तित्वात नव्हतोच. त्यामुळे मी जे करतोय त्याबद्दल मला माझ्या आत ठामपणाही नव्हता. सगळा सावळा गोंधळ होता. काही दिवसांपूर्वी युजी मला भेटले; त्याच्या दोन-तीन पोस्ट मागे टाकलेल्या आहेतच. या माणसाने अक्षरश: मला होत्याचा नव्हता करून टाकले. रजनीश नावाच्या एका मूर्खानं केलेल्या कचर्यावर विसंबून राहून मी एन्लायटनमेंट्च्या मागे लागलो होतो. ध्यान करत होतो. चोवीस तास त्या मूर्खाचं बोलणं ऐकत होतो. तब्बल आठ वर्षे मी हे केलं. आजपासून अकरा महिन्यांपूर्वी तर मी नोकरीपण सोडून दिली आणि हे अकरा महिने माझ्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. कुठेतरी जातोय असं वाटत होतं; पण कुठंही जात नव्हतो. माझा तृतीय नेत्र उघडला; ध्यानात प्रकाश दिसू लागला; कुंडलीनी जागृत झाली होती - पण मला दुसर्या माणसासोबत बोलणं निरर्थक वाटत होतं, मला मित्र होते, पण त्यात काही अर्थ नव्हता. मी एक साठलेलं गटार झालो होतो आणि तसाच साठून राहून मी जागा होईल ही आशा वाटत होती. युजी या माणसाच्या फक्त आभासी सान्निध्यात येऊन सगळी घाण वाहून गेली. मी जे युजी, युजी करतोय तर कशावरून रजनीशांची जागा मी युजीं ना दिली नसेल? नाही. युजी कॅरीज नो प्लेस फॉर मी अॅज अ गुरू. रजनीशांनी माझ्या आत नसलेली जी आशा जागी केली होती, आणि ती तशीच अनंत काळ जागी राहू शकली असती ती युजींनी नष्ट केली. एक आशा क्या मिटी, पूरा आदमी ही मीट गया. आता जे लिहीणं बाहेर पडत आहे तो कुणीतरी नवाच माणूस लिहीत आहे. हा पूर्वी इथे कधीही नव्हता. ही मला एन्लायटनमेंट मिळाल्याची घोषणा आहे का? नो. एन्लायटनमेंट अस्तित्वात नाही. आशेला वाव नाही. जे शोधत आहेत त्यांना मी सांगतोय. आध्यात्मिक सिध्दीं विरूद्ध एका सर्वसामान्य माणसाची नजर यातला फरक दाखविणारी व्हिडीओ क्लिप मी इंग्रजी मजकूरासह या ब्लॉगवर टाकली. त्यावर आतापर्यंत एकही प्रतिक्रिया नाही. याला म्हणतात स्पेलबाऊंड. मी तो मजकूर असभ्य भाषेत लिहीला आहे. माझ्यासाठी आता सभ्य-असभ्य, फार काय भाषाच अस्तित्वात राहीली नाही. तर मुख्य प्रश्नावर येतो. तुम्हाला माझ्या लिखाणाचा हा कचरा हवाय का? हे वाचणार्या सगळ्यांना हा प्रश्न मी विचारत आहे. हो किंवा नाही एवढंच सांगा. विश्लेषण करत बसू नका. चार लोक हो म्हणाले आणि सहा नको म्हणाले, तर मी मायनॉरीटीत असलेल्याचं ऐकेन. नाऊ आय डोन्ट बिलीव्ह इन मेजॉरीटी. या महिन्यातील ३० तारखेपर्यंत दिलेल्या मतांचा विचार केला जाईल.
yaa..
उत्तर द्याहटवाowner - www.marathbar.blogspot.com
उत्तर द्याहटवाअहो काय करताय तुम्ही ह्या अशा सुरेख ब्लोगला पाहणाऱ्या खूप साऱ्या मराठी प्रेक्षकांना का निराश करता?
यशा
उत्तर द्याहटवाबंद वगैरे करू नकोस ब्लॉग...आपला कॉर्नर कशाला सोडायचा...तू तुझे विचार लिहितोयस ना...कुणाला पटोत न पटोत..तू लिहित राहा!
नको करूस.........
उत्तर द्याहटवाblog lihila ki Marathi blog vishwa var takayala visru naka mhanje zala
उत्तर द्याहटवा