६ एप्रिल, २०१०

राजसाहेबांना दिलेले पत्र


माझ्या मागच्या पोस्टला प्रतिसाद देताना श्री. विनोदकुमार शिरसाट यांनी मी राज ठाकरे यांना दिलेल्या पत्राबाबत विचारणा केली आहे. ते पत्र इथे जसेच्या तसे टाकत आहे.

१२ टिप्पण्या:

  1. मला तर अगदी "खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या वाला मावळा डोळ्यासमोर उभा राहिला..."

    उत्तर द्याहटवा
  2. शिरीषराव,
    या वरच्या टिप्पणीचा पत्ता चुकला काय हो?
    मला काही लक्षात येत नाहीय बुवा!

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद यशवंत,

    तुम्ही केलेली विनंती चांगली आहे याबद्दल वादच नाही पण तिची कश्या पद्धतीने अंबलबजावणी करायची हा प्रश्न आहे.खर म्हणजे हि जबाबदारी त्या त्या वार्ड मधील शाखा प्रमुखाची आहे आणि सामान्य जनतेला ते रिचेबल असले पाहिजेत. प्रत्येक ऑफिस मध्ये पूर्ण वेळ कार्य करणारा कार्यकर्ता मिळायला हवा (तो देखील काही पैसे न घेता ). तुमच काय मत आहे?

    विनोद शिरसाठ

    उत्तर द्याहटवा
  4. तुम्हाला खरं सांगतो विनोदजी कार्यकर्त्यांना नेत्यांनी काम सोपवलं ना तर ते नक्कीच करतील. एरव्ही कार्यकर्ते काय करीत असतात? काही विशेष करीत नाहीत हे त्याचं उत्तर आहे.
    जे कार्यकर्ते पक्षाने दिलेले कामच करू शकत नाहीत ते कसले कार्यकर्ते?
    कार्यकर्त्याला पक्षाने डेली बेसिसवर चालणारे काम सोपविले, त्यावर पक्षाने देखरेख ठेवली, कार्यकर्त्याचे मूल्यांकन केले तर या गोष्टी लोकांना काय दिसणार नाहीत? लोक मनापासुन प्रतिसाद देणार नाहीत? आणि राजकिय पक्षाला दुसरे काय हवे असते?

    उत्तर द्याहटवा
  5. आता सध्याच्या परिस्थितीत ठाकरे साहेबांच्या करिष्म्यावर तुमचे बारा लोक विधानसभेत गेलेच ना?
    हा कार्यक्रम महाराष्ट्रभर (यात खेडीपाडी, तालुके, अगदी कानाकोपरा आला) जर राबवला गेला असता (नुसता जाहीर केला असता तरी), तर नक्कीच लोकांनी म.न.से.ची आमदार संख्या वाढविली असती.
    आता सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्याला काय पाहुन पदे दिली जातात? त्यानं कोणत्या-कोणत्या आंदोलनात भाग घेतला आहे, तो पक्षाशी किती एकनिष्ट आहे, लोकांचा त्याला किती पाठिंबा आहे? हेच पाहाता ना?

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम. पत्राला उत्तर किंवा काही पोचपावती मिळाली का?

    उत्तर द्याहटवा
  7. हेरंब, त्याची कथा मागच्या पोस्टमध्ये साग्रसंगित लिहीली आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. पत्रातील तुमचे विचार पटले....पण सध्या कोणत्या राजकीय पक्षाकडे सामान्य जनतेसाठी काम करण्याची इच्छा शक्ती आहे. म.न.से. कडून अपेक्षा अजूनही आहेत, कधी पूर्ण होतील त्या ते रामजाणे घनश्यामबापू!!! :)

    उत्तर द्याहटवा
  9. म.न.से.सुद्धा सेनेसारखाच शब्दबंबाळ भाषणबाजी क्षुल्लक मुद्यांसाठी राडेबाजीत जाणार, फक्त पाहात राहा तुम्ही..!

    उत्तर द्याहटवा
  10. ओह, आधीची तपशीलवार पोस्ट आत्ता वाचली. खरंच काय झालं ते रामजाणे घनश्यामबापू!

    उत्तर द्याहटवा