नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ।
असं कुठल्यातरी उपनिषदात सांगण्यात आलंय. म्हणजे माझा आत्मा मी कितीही प्रवचने ऐकली, कितीही बुध्दीला ताण दिला कुणाच्याही कितीही बाता ऐकल्या तरी तो मला मिळू शकत नाही. मला संस्कृत कळत नाही. आणि मी आत्मा काय आहे त्याचा हिशेबही इथं मांडत नाहीय. युट्यूबवर युजी कृष्णमूर्तींकडून वरचे वचन ऐकले; आणि युट्य़ूबवर पाहाता येतील तेवढ्या क्लिप्स पाहिल्या. हे युजी कृष्णमूर्ती (उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती) वेगळे आणि जे कृष्णमूर्ती (जिद्दू कृष्णमूर्ती) वेगळे. साध्या सोप्या शब्दांत यांची ओळख म्हणजे, तुम्ही जर यांना ऐकलंत तर तुमच्यासमोर फक्त एकच पर्याय शि
ल्लक राहातो: स्वत:ला दोरीच्या मदतीने कुठल्यातरी उंच झाडाला टांगून घेणे (दोरी मानेभोवती असणे आवश्यक). तुम्ही तेवढे संवेदनशील आणि कच्च्या दिलाचे असाल तर दुसरा पर्यायच शिल्लक राहात नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा पुढचा शोध जपूनच घ्या. एवढं सगळं असेल तर मी हा मजकूर लिहायला शिल्लक कसा? मी हे का लिहीतोय? कारणे तीन: १. मी शिल्लक आहे कारण मी कच्च्या दिलाचा नाही आणि २. मराठीत अजून कुठल्या ब्लॉगकारानं किंवा वेबसाईटवाल्यानं त्यांच्यावर काही लिहील्याचं बाबा गुगलनाथ दाखवत नाही. फक्त लोकसत्तानं त्यांच्या मृत्यूची काय ती बातमी छापलीय. अगदी परवा, २००७ मध्ये गेले ते. ३. मला हा माणूस आवडला.
मला रजनीशपण आवडले होते - पण रजनीश एवढा बोललाय, एवढा बो
ललाय की त्याचे बोलणे ऐकण्यातला आणि त्याचे बोलणे ऐकून-ऐकून माझ्याच बोलण्यातला इंट्रेस्ट निघून गेलाय! बट युजी इज अ डिफरंट मॅन. एन्लायटन्मेंट, ध्यान, धर्म, जीवन, साधना याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना युजींचा आपल्याला ऐकू येणारा सूर तद्दन नकाराचा, टोकाचा निराशावादी! थोडक्यात त्यांना स्पिरिच्युअल टेररीस्ट म्हणता येईल. युजी स्पष्टपणे सांगतात - माझ्या संदेशावर (तुम्हाला हाच शब्द वापरायचा असेल तर) कॉपीराईट नाही. तुम्ही त्याचा अर्थ लावा-गैर अर्थ लावा, विश्लेषण करा-गैर विश्लेषण करा, एवढंच काय तुम्ही स्वत:च त्याचे लेखक आहात असे म्हणा, त्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.
भारताच्या आतापर्यंतच्या धार्मिक, आध्यात्मिक संचिताच्या अगदी टोकाची, तीव्र विरोधाची युजींची भूमिका आहे.
एन्लायटन्मेंट्ला युजी कॅलामिटी (चक्रीवादळ, विनाश) म्हणतात. मारूतीच्या बेंबीत गार लागतंय, असे बेंबीत बोट घालून विंचू चावून घेणारे सगळेच म्हणतात. पण मी तुम्हाला सांगतो - हा विनाश आहे, एन्लायटनमेंटच्या मागे असणार्या लोकांच्या कल्पनेतही नसेल अशी ही गोष्ट आहे. ही कुणालाही नको असेल; पण तिच्याच मागे लोक पागल झाले आहेत असे युजी सांगतात.
युजींची वचने:-
बुध्दा वॉज ए बिग्गेस्ट बास्टर्ड !
जीसस सेड "आय अॅम दि वे" अॅण्ड ऑल दि फूल्स लॉस्ट देअर वे !
वेदकालीन लोकांनी सोमरस पिऊन बडबड केली आहे. अहं ब्रम्हास्मि !
गॉड अॅण्ड सेक्स गो टुगेदर. इफ गॉड गोज, सेक्स गोज टू!
मसिहा म्हणजे स्वत:च्या मागे गबाळ ठेऊन जाणारा माणूस.
गुरू सामाजिक भूमिका निभावतात, वेश्यासुध्दा तेच करतात!
जीसस, बुद्ध आणि कृष्ण यासारख्या मॉडेल्सकडे पाहून निसर्ग आणखी सुंदर मॉडेल्स बाहेर फेकू शकतो हेच आपण विसरलो आहोत.
मी तुम्हाला फक्त एवढीच खात्री देऊ शकतो की तुम्ही जोपर्यंत सुख शोधत राहाल, तोपर्यंत ते मिळूच शकणार नाही.
तुम्ही कल्पना खाता अन्न नव्हे, तुम्ही उपाध्या आणि लेबल्स पांघरता, कपडे घालत नाही.
निखळ सत्य म्हणजे, तुम्हाला काहीही अडचण नसताना तुम्ही अडचणी उभ्या करता. तुम्हाला प्रश्न पडत नाही तेव्हा तुम्ही जीवंत आहात हे तुम्ही मानतच नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रदुषणाने माणसे खंगून गेली आहेत, वातावरणाचे प्रदुषण किस झाड की पत्ती!
निसर्ग अद्वितीय माणसे तयार करण्यात गुंतला आहे, तर संस्कृतीने एकच साचा शोधला
आहे आणि त्यात सर्वांनी स्वत:ला ठोकून बसवायचं!
तुम्ही जे पाहात आहात त्याबद्दलची अक्कल वापरूनच तुम्ही त्या गोष्टींकडे पाहात असता, त्यामुळे ती गोष्ट खरी कशी आहे ते कळणं कधीच शक्य नाही - कारण तुमची अक्कल नेहमीच मध्ये डोकावणार.
माझं बोलणं म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्यासारखं आहे.
तुमच्या अकलेवर उभा असलेला अनुभव हा आभास आहे.
तुम्हाला काही कळत नसूनही तुम्ही बडबड करता, जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही काहीच बोलू शकत नाही.
मी लोक जागरणाच्या पवित्र धंद्यात नाही - इथून तुमचे तोंड काळे करा (प्रश्न विचारायला आलेल्या लोकांना बोलताना).
ज्यादिवशी माणसाला जाणीव कळली त्या दिवशीपासूनच तो स्वत:ला तीसमारखां समजू लागला आणि तो तोडला जाऊन तिथंच त्यानं स्वत:च्या विनाशाची बीजं रूजवली.
माणूस मेल्यानंतर निसर्ग त्याच्या शरीरातील घटकांचा पुनर्वापर करतो; त्या अर्थानं माणूस अमर आहे.
गुरू हे छा-छू अनुभव देणार्या कल्याणकारी(??) संस्था आहेत. तो एक फायदेशीर धंदा आहे. वर्षात दोन अब्ज डॉलर्स कमवून दाखवा बरं दुसर्या धंद्यात!
अशी अगाध वचनं सांगणारे युजी त्यांच्याकडे आलेल्या लोकांना अक्षरश: रडवून सोडत. कंम्प्लिट डिस्पेअर, क्लिनीकल डेथ इज नीडेड! त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वत:भोवती कोणती संस्था उभी राहू दिली नाही. वेळ पडेल तेव्हा सगळ्या गुरूंना झोडपून काढले. सुरूवातीला गबाळ गुरूंना झोडपून ते रजनीशांसारखे महागुरू बनले नाहीत. ते त्यांनीच केलेल्या विधानाला पुढच्या विधानात खोडून काढत; आणि खांदे उडवून आ
हे हे असंच आहे असे सांगत. त्यांनी कितीही हाकलले तरी देश-विदेशातील लोक त्यांच्याकडे जात असत; आणि मार खात असत.
मी काही महिन्यांपूर्वी युजींना युट्य़ूबवर ऐकले, तेव्हा त्यांची आक्रस्ताळी शैली पाहून तात्काळ क्लिप बंद केली होती. जो एवढ्या मोठ्यानं ओरडतोय, एवढा कर्कश्श्य आहे त्याला काय माती कळलं असणार असे वाटले होते. आणि ते दिसतातही भयानक (तुम्ही आणखी भयानक माणसं पाहिली असतील तर ती गोष्ट वेगळी!). त्यांच्यावरच्या एका वेबसाईटवर तर चक्क लिहीलंय की या माणसाचा नुसता फोटो पाहिलात, काही शब्द वाचले तरी तो तुमच्यामध्ये व्हायरस सारखा घुसेल; आणि मेंदुतल्या सगळ्या रचना पोखरून काढील.
युजी हा माणूस खरंच उपयुक्त आहे की नाही, त्यांच्या बोलण्यामुळे आत्महत्त्या करून घ्यावी लागेल, तर वाचा कशाला? असा विचार मी करू शकत नाही. कारण माझा प्रश्न वेगळा आहे. ध्यानाच्या दुष्टचक्रातून मला बाहेर पडायचं आहे; आणि ते सोपं नाही. त्यासाठी अत्यंत टोकाची निराशा हवी आहे. निश्चितच, परिणाम मला माहीत नाहीत. रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही! काही दोस्त मिळाले तर उत्तमच.
सिनेनिर्माते महेश भट यांनी युजींचं चरित्र लिहीलंय. रजनीशांच्या गुरूगिरीला कदरून जाऊन (आणि कदाचित युजींना भेटल्यामुळे) महेश भट यांनी रजनीशांच्या माळेचे तुकडे करून ती संडासात फेकली. बेशर्त प्रेमाच्या बाता मारणार्या रजनीशांनी महेश भट यांना "मला सोडून जाऊ नकोस, वाटोळे करून टाकीन" अशी धमकी दिली होती. रजनीश हा असा मादरचोद देवमाणूस होता. मला खरंच रजनीशांबद्दल लिहीताना स्वत:ला आवरता येत नाही राव.
लिहीण्यासारखं पुष्कळ आहे - पण ड्राईव्ह टिकत नाही.
चलो. पुढचे आठ दिवस एवढं पुरेल. बाय!
भन्नाट लिहिलेयस.. तुही कधी नवी strategy काढणार का?
उत्तर द्याहटवाबाकी तुझा मी दोस्त
काढू..काढू..निघेल..
उत्तर द्याहटवाबाकी तु माझा दोस्त असल्याने तुला आधी सांगेन.