५ सप्टेंबर, २०१२

काकध्वनी


This has to be a person-to-person level; you can't do it in a large group. And this is not an interpretation of anybody's teaching; it does not throw new light on anybody's teaching or any spiritual text. I am not putting forth an intellectually constructed set of ideas. It is born out of my own spiritual experience - if I may use the term, for want of better or more adequate one - that has put an end to the experiencing structure once and for all.
❦❦❦
Actually, what I am saying here is something you bring out. That what is said here is your property, not mine. The limitations, the frontiers are all gone. It is all one. Whatever is happening for the whole of human consciousness. You don't have to do a thing. You don't have to start a foundation or society. It is not for you to preserve the teaching for posterity.
❦❦❦
I have no teaching. There is nothing to preserve. Teaching implies something that can be used to bring about change. There is no teaching here, just disjointed, disconnected sentences. What is there is only your interpretation, nothing else. For this reason there is not now, nor will there ever be, any kind of copyright for whatever I am saying. I have no claims on this.
❦❦❦
निष्पर्ण तरूच्या वरती
कावळा ध्यान ते धरतो
रणरणत्या तप्त दुपारी
निष्पर्ण तरू मोहरतो
भय व्याकूळ झळा पांघरती
निष्पर्ण तरूची छाया
एकाक्ष कावळा कधीचा
ध्यानस्थ उसासे भरतो
ओकून काहिली मित्र
चूपचाप लयाला गेला
अंधार पसरता अवघा
निष्पर्ण तरू घाबरला
अलक्ष्‍य काकध्वनी तो
सतत सुखाने उठतो
करकरीत शांतता भंगे
तडकत नभाशी जाते
निष्पर्ण तरूच्या वरती
काळोख्या नभांच्या मागे
ती शुभ्र कोर उगवते
त्या शीतल चांदण्यांसंगे
निष्पर्ण तरूच्या वरती
कावळा फड फड फड फडतो
दिगंत दिशाहीन उडतो
निष्पर्ण तरूच्या वरती...
------------------------------------------------------------------------
युजी कृष्‍णमूर्तीनी केलेलं एकूण बोलणं ऐकल्यानंतर युजींची प्रतिमा व त्यांना ऐकणारा यांच्या सरमिसळीतून काही शब्द बाहेर पडले ते म्हणजे ही कविता. ही कविता केलेली नाही, तरीही मला आतल्या आत जाणणारं काहीतरी मुद्दाम भकास प्रतिमांच्या वापरातून व्यक्त करण्‍याचा प्रयत्न आहे. भकास प्रतिमा यासाठी की युजींचं सगळं बोलणं 'नकार' केंद्रित आहे, त्यातून काही हाती लागतच असेल तर ते स्वत:ला गमावून बसल्यावर, एक-एक जुनी संकल्पना आणि आपल्यातील संकल्पना निर्माण करणारी यंत्रणा भग्न झाल्यानंतर. आधीच्या आपण जमवलेल्या, आपलं अस्तित्व सजवण्‍यासाठी इथेतिथे मांडलेल्या संकल्पनांच्या मूर्ती युजी एक-एक करुन फोडत जातात, मनाला त्याच्या उपजत स्वभावाप्रमाणे फुटणारी प्रत्येक पालवी जाळून टाकतात - तेव्हा‍ आपला निष्पर्ण वृक्ष उभा रहातो, सगळी हिरवळ झडून गेलेला - किर्रर्र उन्हात झाडाला आग लाऊन ते झाड अर्धमुर्धं जाळून टाकल्यानंतर जेव्हा तो मागे राहून जाणारा गंध येतो त्यावेळी युजींच्या रुपातील कावळा पिंडावर उतरतो. म्हणून पहिल्या चार ओळी.
युजींना ऐकत, वाचत रहाण्‍यातून जुन्या स्वभावाप्रमाणे मनात कसल्याही संकल्पना मांडून पहाण्याचीही भीती वाटू लागते आणि दरक्षणी वाटत रहाते म्हणून भय व्याकूळ झळा झाड अर्धवट जळून गेल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं असेल त्यावर निष्पर्ण तरुची छाया पांघरतात. काहिली ओकणारा 'मित्र' हे युजीच, कारण There is no difference in my talking & grunting of a pig or barking of a dog.. This is a Dog Barking, All doctors should be shot on site & at site, Every cell in human organism is selfish to its core, As long as you seek happiness, so long you will remain unhappy, You don't eat food, you put ideas in your stomach - eat anything - eat mud, saw dust, don't ask what is right food हे उदाहरणादाखल आणि असेच असंख्‍य निखारे वाक्यावाक्यातून फेकणारे युजी त्यांचं डोकं फिरलंय म्हणून असं बोलत नव्हते - हेच जळजळीत सत्य आहे. पण ते आपल्यात भिनल्यानंतर आपण तोच जुना माणूस राहू शकत नाही. हाडांच्या, पेशींच्या आतपर्यंत ते घुसत जातं - This is mutation. युजी कितीही दाहक बोलत असले तरी त्यांनी उगाच कुठलंतरी थोतांड उभं करुन हंगामा माजवला नाही. ऐकायचंय तर निमुटपणे जसं सांगतोय तसं ऐका नाहीतर उठा आणि निघा, पुन्हा परत येऊसुद्धा नका - हे conviction त्यांच्याकडं होतं. एक प्रश्न विचारल्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाच जाणार आहे, तिसराही, चौथाही आणि पाचवाही.. हजारावासुद्धा. जीवनाच्या सर्व अंगांमध्‍ये हे का घडतं आणि सततच घडत रहातं तर 'विचार' ही शेंडाबुडखा नसलेली process आहे, ती अखंड चालूच रहाणार आहे, पण ही प्रोसेस ज्या यंत्रणेत चालते त्या मानवी शरीरालाही तिच्यासोबत फरफटत नेते. विचार नेहमी कसल्यातरी 'अनंतत्वाच्या' दिशेने हवेत फेटा उडावा तसा सतत जात असतो - हे 'अनंतत्व' एक भास आहे, जो मरेपर्यंत थांबत नाही. ज्ञान असं वेगळं अस्तित्त्वात नसतंच, ज्यापर्यंत आपण कधीतरी का होईना पोहोचू शकू, फक्त तशी आशा असते so we live in hope & die in hope. या सगळ्या नकारार्थी भडीमारात कधीतरी आपण एकाक्ष होतो, युजींच्या मूळ आशयावर केंद्रीत होतो म्हणून एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतो. पुढच्या तीन चार कडव्यांत 'नकारात्मकतेतूनही' दिसू शकणार्‍या कोर, चांदणे वगैरे प्रतिमांतून as it is reality मध्‍ये उतरल्याचा संकेत केला आहे; पण ही कोर, चांदणं मनानं हार स्वीकारल्यानंतर पर्याय नाही म्हणून स्वत:चीच काढलेली कोरडी समज नाही, तो तरु निष्पर्ण झाला तरी मरत नाही, तो तसाच उभा असतो. सगळ्या पातळ्यांवरील सगळी उचकपाचक संपल्यानंतर 'फोकस' किंवा आपल्या अवधानाला 'शरीर' या पैलूच्या अगदी तळाशी, गुदमरा होईल इतपत खोलवर (पण फक्त शरीर म्हणजे शरीरच, पुन्हा इथे मंतव्यांना संधी नाही) घुसावं लागतं आणि तिथे तळ गाठला की शरीराच्या प्रत्येक पेशीचा प्रॅक्टीकली, व्हिजीब्ली स्फोट व्हायला लागतो This is starting of mutation process (in fact reason behind expression of these odd words is I am at the moment going through it & anybody over here interested in these affairs can have chance to see all these things in the making because I don't know how I will be after whole this thing completes its natural course.. Its speeding day by day & I am literally collapsing now & then when there is scope for this thing to happen in my daily routine ). या कडव्यांतील आशय मनात उमटून मनाचा वापर 'साऊंडिंग बोर्ड' प्रमाणे प्रतिध्‍वनित व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. तो व्यक्तीपरत्वे वेगळा असेल, हे ओघानं आलंच. या सगळ्या पार्श्वभूमीवर वर लिहिलेल्या इंग्रजी अवतरणांची संगती कदाचित लागेल. पुढे काय होतं? तर ते फक्त कावळा जसा उतरला आणि बसला तसाच, उडताना पंख फडफड करतो आणि सहज दिगंताच्या दिशेने झेप घेतो..There remains just simply living as it is.
मला हे नीट मांडता आलेलं नाही, पण असोच.

( पूर्वप्रकाशित, मिपा )