२० मे, २०१२

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह


गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे  ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी  सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. मंटोंबद्दल मराठी साहित्यिक राजन खान यांची लोकसत्ताने छापलेली ही मुलाखत वाचली, माझ्या जुन्या पेपरमध्ये आमचे  'न्यूजरूम इंचार्ज' असलेल्या, अजित वडनेरकर या भोपाली बाबूंचा मूळ हिंदीत लिहिलेला, पण अनुवादकाच्या शब्दकृपेकरुन अंमळ असह्य मराठीत अनुवादित केलेला हा लेख वाचला - असं बरंच काही  वाचलं (अर्थात ऑफिसची बॅण्डविड्थ जाळून ;-) ).
आणि सप्ताहांत होता जुन्या इंदूरमध्ये फिरत असताना एका जुन्यापुराण्या पुस्तकांच्या दुकानात मंटोंच्या आठ कथा असलेल्या  'गर्भ बीज' या  संग्रहावर अचानक नजर पडली तेव्हा वाटलं - हे खरोखर मस्त झालं ! मकबूल फिदा हुसेन यांनी बोधचिन्ह काढून दिलेल्या 'वाणी प्रकाशन' ने काढलेला हा संग्रह मस्त आहे. म्हणजे वाणी प्रकाशनचा लोगो मकबूल फिदा हुसेन यांनी काढलाय हे मला माहित नव्हतंच. पुस्तकाच्या लोगोखाली एक विशेष ओळ आहे : वाणी प्रकाशन का लोगो विख्यात चित्रकार मकबूल फिदा हुसेन की कूची से - म्हटलं बरंय च्यायला - लोगो मकबूल फिदा हुसेनने काढून दिला नसता आणि दुसर्‍याच अविख्यात चित्रकाराने काढला असता तर या लोकांनी त्याचं नाव लोगोखाली टाकलं असतं का? हा एक जोकच झाला. असो.
उर्दू-हिंदी शब्द देवनागरी लिपित कोणा जनाब मुशर्रफ आलम जौकींनी लिहिलेली प्रस्तावना वाचली तेव्हा वाटलं आज चार पाच  १२०/३०० पाने आणावी लागणार - मंटो या लेखकाचं एवढं खानदानी, रसरशीत उर्दू नुसते आवंढे गिळत वाचत पडण्यात काय मजा? पुरेशी रसनिष्पत्ती झाली तेव्हा वाचायला जी सुरुवात केली ती संग्रहातली आठवी कथा संपली तेव्हाच पुस्तक खाली ठेवलं  - आणि आज आत्ता हा निवांत पुस्तक परिचयः




है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे
कहते है की गालिब का है अंदाजे-बयां और

गालिब का अंदाजे - बयां और था, सब जानते है. लेकीन सच पूछें, तो यही बात मंटो पर भी लागू होती है. दुनिया में सुखनवरों की कमी नहीं है. एक से बढकर एक. लेकीन मंटो का अंदाजे-बयां शायद सब से अलग. मंटो इंसानी कमजोरियों से वाकिफ है. छोटी-सी उम्र में मर जाने बावजूद जो दुनिया मंटो ने अपने मुशाहिदे से देखी थी, वो शायद कम लोगों ने देखी थी. इंसानी मनोविज्ञान की जो पकड मंटो में थी, शायद अभी भी ये पकड बडे-बडे कथाकारों में नजर नहीं आयेगी. जैसे मंटो की 'पटाने' या 'फंसाने' के बारे में आम राय - 'निनावे प्रतिशत लडकियां मर्दानी-शराफत से नहीं काबू में आतीं. उन्हें बेढब बाते ज्यादा पसंद है.' या फिर 'काली औरतों के मुकाबले आप गोरी सुंदर महिलाओं को ज्यादा आसानी से 'फांस' सकते है.'
लेकीन प्रत्येक कहानी के साथ एक चीज 'कॉमन' है. मंटो शरीफ आदमी था. इसलिये जब भी, कहीं भी मंटो अपना चरित्र रचने की कोशिश करता है, हम एक बेहद शरीफ आदमी से रु-ब-रु होते हैं. क्या यह मंटो की कमी थी? जहां उसके चरित्र एक से बढकर एक आवार्गियां, शरारतें, बदमाशियां या 'हरामीपन' करते है, वहां मंटो का अपने चरित्र के बारे में यह शरीफाना रवैया कुछ ज्यादा 'हजम' नहीं होता. किसी तवायफ को वह बहन कह रहा है. वह अपनी लेखनी या 'स्क्रिप्ट राईटिंग' में व्यस्त रहता है और दुसरे कमरे में, बकौल इस्मत, लिहाफ में हाथी फुदक रहा है. लेकीन मंटो की शराफत यह... कि बस, सारा कुछ कहानी लिखने तक सिमित. लेकिन यही शरीफ मंटो जब अपने नायाब चरित्रों के कपडे उतारता है तो अक्ल हैरान रह जाती है. मंटो के बाद से आज तक शायद किसी भी भारतीय साहित्य में इकठ्ठे इतने चरित्र नहीं आयें होंगे, जितने मंटो ने रचे. हर कहानी में एक नया चरित्र. नया मनोविज्ञान, नयी औरत और मंटो की नई भाषा.. कभी-कभी मंटो मुझे चेखव, मोपासां जैसे रचनाकारों से भी मीलों आगे नजर आता है. क्योंकी कहानी कहने की जो कला या चरित्रों को कमाल के साथ तहरीर में उतारने का जो फन मंटो के पास था, वो शायद न चेखव में था, न मोपासां में. मंटो चरित्रों के मनोविज्ञान से गुजरते हुए जब कसाई की तरह बकरे (कहानी) की 'बोटी-बोटी' अलग करता है तो आंखे हैरान रह जाती है. शायद अपने चरित्र को इतनी इमानदारी से देखने और निभाने की कला विदेशी कथाकारों में भी नहीं. जरुरत इस बात की भी है कि मंटो का समूचा साहित्य अंग्रेजी में अनुवाद होकर विश्व-बाजार में पहुंचे, जहां उसका सही मूल्यांकन हो सके.
इस संगृह की कहानियां पाठकों को 'निर्ममता' ही हद तक रुलायेंगी, चौकायेंगी. इन कहानियों का अनुवाद नबी अहमद ने किया है.
- मुशर्रफ आलम जौकी
(प्रस्तावनेतून)

'बाबू गोपीनाथ', 'मेरा नाम राधा है', ' गर्भ-बीज', 'पीरन', 'खूरशीट, 'बासित', 'शारदा' या एकूण आठ कथा संग्रहात आहेत - त्यापैकी पहिल्या 'बाबू गोपीनाथ' या कथेत मंटोंनी बाबू गोपीनाथ हे जगावेगळे व्यक्तिचित्र रंगवले आहे. कथाकार मंटोंकडे  या बाबू गोपीनाथला घेऊन येणारे अब्दुर्रहीम सैंडो हे मंटोंचेच पात्र बाबू गोपीनाथ आणि मंटोंची एकमेकांना अशी ओळख करुन देते - 'मंटो साहब! बाबू गोपिनाथ से मिलिये. बाबू गोपीनाथ तुम हिन्दुस्तान के नंबर वन राईटर से हाथ मिला रहे हो. लिखता है तो धडन तख्ता हो जाता है. लोगों को ऐसी-ऐसी  'कंटिन्यूटली' मिलाता है की तबीयत साफ हो जाती है - हे मंटोंबद्दल. आणि बाबू गोपिनाथची ओळख म्हणजे - 'आप है बाबू गोपिनाथ. बडे खाना खराब. लाहोर से झक मारते-मारते बम्बई तशरीफ लाए है. साथ कश्मीर की एक कबूतरी है. नंबर वन बेवकूफ हो सकता है तो वो आप है. लोग उनको मस्का लगाकर रुपया बटोरते है. मै सिर्फ बाते कर के उन से हर रोज पोल्सन बटर के दो पैकेट वसूल करता हूं.'
  
बापजाद्याची दहा लाख रुपयांची दौलत गाठीशी आहे म्हणून श्रीमंत असलेला हा बाबू गोपीनाथ लाहोरमधल्या कंजूस बनियाचा मुलगा आहे - तो त्याचे अंगवस्त्र लाहोरहून सोबत घेऊन मुंबईत आला आहे. याचा मूळ स्वभाव 'पीर का मजार' आणि 'रंडी का कोठा' या दोन जागी मन रमणारा आहे. बाबू गोपीनाथच्या 'दिल को सुकून' देणार्‍या या दोनच जागा आहेत, तो म्हणतो - 'मुझे उनसे (पीर का मजार आणि रंडी का कोठा) कुछ मुहब्बत सी हो गई है. मै उनके बिना नहीं रह सकता. मैने सोच रखा है कि जब मेरी दौलत बिल्कुल खत्म हो जायेगी तो किसी तकिये में जा बैठूंगा. रंडी का कोठा और पीर का मजार. ये दो जगहें हैं जहां मेरे दिल को सुकून मिलता है. रंडी का कोठा तो छूट जायेगा. इसलिये की जेब खाली होनेवाली है. लेकीन हिन्दुस्तान में हजारों पीर है. किसी एक की मजार में चला जाऊंगा.'
हा बाबू गोपीनाथ जेव्हा पूर्ण वाचून संपला तेव्हा 'प्रेमाची परमावधी' काय असते हे मंटोंच्या लेखणीतून उतरलेल्या या बाबू गोपीनाथने मला शिकवलं. हा बाबू गोपीनाथ, त्याने जिच्यावर (जीनत ) प्रेम केलं तिची, स्वत: च्या उधळ्या, बेवकूफ, नालायक स्वभावामुळे कंगाल, फकीर झाल्यानंतर परवड होऊ नये यासाठी तिला एक चांगला आश्रयदाता स्वतः शोधून देण्यासाठी मुंबईपर्यंत आला आहे.
 या बाबू गोपीनाथबद्दल शब्दांत काहीही लिहिलं तरी ते फिकं ठरेल. हा बाबू गोपीनाथ नाहीच, बाबू गोपीनाथच्या पात्रातून 'प्रेम' हे मूल्य in all its extremities वाहात आलेलं  आहे - त्याबद्दल काहीच लिहिता येणारं नाही, ते  स्वतः जगण्याची गोष्ट आहे.

'मेरा नाम राधा है' या कथेत 'राधा' या फिल्मी दुनियेतील अदाकाराचं 'राजकिशोर' या त्याकाळच्या सुपरस्टार, विवाहित, गांधीवादी, दानशूर, फिल्मी दुनियेत असूनही 'लंगोट का पक्का' असलेल्या या नटावर प्रेम जडलं आहे. ही राधा सादिकची ( स्वतः मंटोच ! दुसरं कोण) सुद्धा   मैत्रिण आहे. पण व्यक्तिगत मंटोंना का कोण जाणे, नजरेत न आलेल्या गोष्टीमुळं हा राजकिशोर उगाच आवडत नाही. ही नवागत अभिनेत्री राधा मात्र त्याच्यावर प्रेम करते, ती राजकिशोरला 'तु मला बहिण मानू नकोस' असं सगळ्या पब्लिक समोर म्हणते. राजकिशोरवर फिदा असलेली ही राधा आजारी पडते तेव्हा राजकिशोर त्याच्या बायकोला घेऊन राधाकडे येऊन तिच्याकडून राखी बांधून घेतो, पण परत जाताना त्याची पिशवी राधाकडेच विसरते. राखी बांधून झाल्यानंतर ती विसरलेली पिशवी घेण्यासाठी परत आल्यानंतर राजकिशोरला राखी बांधून झाल्यानंतरही त्याच्या 'लंगोट का पक्का' असण्याची सत्वपरिक्षा घेते, आणि त्या दोघात जे घडतं ते मंटोंनी 'कंटिन्यूटली';-) कसं रंगवलंय ते स्वतः वाचून पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही.


'गर्भ- बीज' या कथेत मंटोंनी पुन्हा एकदा 'बाबू गोपीनाथ, आणि ' मेरा नाम राधा है' मधल्या 'सादिक' च्याच भाव-भावना, त्यांच्या जगण्याचा in their all extremities असा काही आडवातिडवा पट उभा केला आहे की 'बाबू गोपीनाथ', 'सादिक' हे सगळं मंटोंच्याच लेखन गर्भातून उद्भवलेलं बीज आहे, ती वेगळी माणसं नाहीत, पण केवळ 'मंटो या लेखकाची कल्पना' असं म्हणावं एवढीही लेचीपेची दिसतील अशी मंटोंनी रंगवलेली नाहीत. गर्भ बीज या कथेत सादिक या मंटोंच्याच पात्राने मंटोंशी संवाद साधला आहे आणि आणखी बरीच पात्रे त्यात उभी केली आहेत, ज्यांना मी तरी 'कंटिन्यूटली' पाहू शकलेलो नाही, एखाद्या गोष्टीचं बीज समजलं असेल तर, फार तपशीलात शिरून समजून घेण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी या कथेबद्दल इथं तपशीलवार लिहू शकत नाही.

'पीरन' या कथेत मंटोंनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील मजेदार संबंधाचा पट उभा केला आहे. बृजमोहन मंटोंकडून पैसे उसने घेऊन दर रविवारी पीरनला भेटायला जातो. हा बृजमोहन पीरनचा प्रियकर असला तरी पीरनच्या मते 'निकम्मा' आहे, आणि बृजमोहनच्या मते पीरन 'मनहूस' आहे - कारण बृजमोहनने कितीही चांगली नोकरी मिळवली आणि पुढच्या रविवारी पीरनची भेट घेतली रे घेतली की सोमवारी त्याला कामावरून काढून टाकण्यात येतं. हे असं अनेकदा झाल्यानं बृजमोहन पीरनला 'मनहूस औरत' म्हणतो, पण तो तिच्या भेटीला जाणं टाळू शकत नाही. बृजमोहनला एक चांगल्या पगाराची   नोकरी मिळते तेव्हा अचानक पीरनचं पत्र येऊन धडकतं की 'रविवारी भेटायला ये, फार महत्वाचं काम आहे.' ह्या बलेची भेट घेतल्यानंतर नेहमीच नोकरी जाण्याच्या ' सिलसिल्यामुळं' बृजमोहन कावतो आणि पीरनची टाळताच न येणारी भेट घेतल्यानंतर नोकरी जाणारच, त्यापेक्षा स्वतःच राजीनामा द्यावा हे ठरवून पीरनची भेट घेऊन आल्यानंतर त्याच्या सेठकडे स्वतः होऊन राजीनामा सोपवतो त्यानंतर काय होतं हे वाचण्यासारखं आहे. मंटोंची नेहमीची खास ब्रॅण्डेड आतिषबाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाक्यावाक्यात झालेली आहेच हे वेगळे सांगणे नको.

'खूरशीट' या कथेत खूरशीट आणि सरदार जोरावरसिंगमधील प्रणयसंबंधांचा पट आहे. ही कथा बहुतेक मंटोंच्या दिल्लीतील वास्तव्यात घडलेली असावी. या कथेत मंटोंचा नेहमीचा दारूगोळा, शैलीचा नंगानाच नेहमीप्रमाणे असला तरी extreme म्हणता येईल असं मला काही आढळलं नाही - मला ही आपली नेहमीसारखीच एक साधी कथा वाटली. एक विवाहित बाई, तिचा नवरा, खुरशीटचं गायन आवडतं म्हणून तिच्या गाण्यावर  (आणि खूरशीटवरही हे ओघानं आलंच ;-) )  फिदा असणारा त्याचा एक सरदार दोस्त - शेवटी खूरशीट आणि हा सरदार लग्न करुन मुंबईत हनिमूनला येऊन मुंबईत स्थलांतरित झालेल्या मंटो पती- पत्नीला 'ताजमहल' हॉटेलमध्ये भेटायला बोलावतो. आणि ती दिल्लीची विवाहीत खूरशीटच सरदाराची आता बायको झाल्याचं मंटो पती-पत्नींना कळतं तेव्हा खूरशीट आणि सरदार जोरावरची 'रुख्सत' (निरोप) न घेताही मंटो पती-पत्नी ताजमधील खोलीबाहेर पडतात. This is not Manto!

'बासित' या कथेत लग्नाला राजी नसणारा, पण आईच्या आग्रहामुळे एकदाचे चिडून लग्न उरकून टाकणारा एक बासित रंगवला आहे. बासित लग्नाला तयार होतो तर तिकडे त्याची होणारी सासू लग्न थोडे पुढे ढकलण्याच्या मनःस्थितीत असते. शेवटी बासीतची आई अल्टीमेटम देते तेव्हा बासित आणि सईदा यांचं लग्न होतं. बासितची नई दुल्हन सईदा मात्र लग्न होऊन आल्यानंतर सतत कुठल्यातरी गोष्टीला घाबरलेली असते. बासित तिला मोकळेपणाने सगळ्या गोष्टी विचारतो पण ती काहीही स्पष्ट सांगत नाही. शेवटी सईदा बाथरूम मध्ये गेलेली असताना नालीतून रक्ताचा ओघळ बाहेर येताना दिसतो. बासितला लग्नासाठी बाध्य करुन सईदाशी लग्न लाऊन दिलेल्या बासीतच्या आईला थेट सईदाचं अर्भक पडलेलं दिसतं आणि ती खलास होते - बासितला समजदार व्हावे लागते. अर्थात कथा मुळातून वाचण्यासारखीच.

'शारदा' या कथेत नजीर हे रंडीबाज पात्र आणि त्याची शारदा या परिस्थितीनं नाडलेल्या, विवाहित पण नवर्‍यानं टाकलेल्या बाईची कुंटणखान्यावर भेट होते. ही शारदा तिच्या 'शकुंतला' या कुंटणखान्यापर्यंत पोहोचलेल्या तिच्या बहिणीला परत घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. ही शकुंतलाच कुंटणखान्यावर नजीरला 'पेश' केलेली असते पण ती या प्रकारात अगदी आश्रमहरिणी असते.  नजीर तिला काही करु शकत नाही. पण बहिणीला कुंटणखान्यातून परत न्यायला आलेल्या, विवाहित तरीही पती सोडून गेलेल्या शारदाचं   आणि नजीरचं भलतं म्हणजे भलतंच जमतं. पण पुढे शारदा तिच्या शकुंतला या बहिणीला त्या नरकातून काढून रीतीप्रमाणे विवाह वगैर लाऊन देण्यासाठी परत जयपूरला घेऊन जाते. नजीर शारदाच्या मनातून जात नाही. ती जयपूरवरून त्याला पत्रे पाठवते.      फाळणीच्या वेळी नजीरची बायको पाकिस्तानात पुढे निघून जाते तेव्हा नजीर आणि शारदाचा एकत्र रहाण्याचा मार्ग मोकळा होतो. ते महिनाभर एकत्र रहातातही. पण नजीरच्या मनावर त्या कुंटणखान्यात दर्शन झालेल्या शारदाचं चित्र पक्कं आहे - तो तिला या आत्ताच्या घरी सोबत रहाणार्‍या शारदाला बायकोच्या स्थानी  पाहू शकत नाही - कंटाळतो. पण नजीरच्या प्रेमात पूरेपूर रंगलेली शारदा मात्र नजीरच्या बायकोचीच भूमिका निभावत रहाते. आणि नजीर खरोखर कंटाळल्याचं तिच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या आवडत्या सिगारेटचा ब्रॅण्ड टेबलावर ठेऊन, नजीरकडून दमडीही न घेता, शब्दाचाही निरोप न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जाते...


❖❖❖


कथासंग्रह संपला पण या आठ कथांतून अंगावर आलेल्या मंटोनं मात्र झपाटलंय. कथांचं सोडा, मंटोबद्दलच खूप लिहावं वाटतंय, पण पुन्हा कधीतरी..