१५ जुलै, २०१०

दर्दी

वाजेद अली शाहच्या जमान्यत असं घडलं. हा वाजेद अली लखनौचा राजा होता. ठार बेवडा, पण संगीत, चित्रकला, सौंदर्य यांचा प्रेमी. सर्व प्रकारचे नर्तक, संगीतकार, कवी यांना तो त्याच्या दरबारात बोलवी. एक संगीतकार नेहमीच त्याच्या दरबारात यायला नकार देत होता. खुद्द वाजेद अलीच त्याच्याकडे गेला - हा दुर्मिळ योग होता, कारण वाजेद अली कधीच कुणाकडे गेला नव्हता. त्याचं आमंत्रणच पुरेसं असे आणि मागाल तेवढी किंवा जास्तीत जास्त बिदागी तो देत असे. पण तरीही संगीतकार यायला तयार नव्हता. वाजेद अली त्याच्याकडे आल्यावर संगीतकार म्हणाला, "मी येईन जरूर, पण तुम्ही माझी एक अट पूर्ण करायला हवी. माझी फक्त एकच अट आहे, आणि ती म्हणजे: मी वाजवत असताना किंवा गात असताना कुणीही मान हलवायची नाही."
वाजेद अली शाह म्हणाला, "ही काही फार काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. जे कुणी ऎकायला येणार असतील त्यांना मी आधीच बजावून ठेवील की, तुमची मान जर हलली, तर तिथंच ती उडवण्यात येईल!!" तो होताच असला बावळट - त्यानं खरंच मान उडवली पण असती. त्यानं खरोखर तशी तयारी पण केली. त्यानं पूर्ण लखनौ शहरात दवंडी पिटवली, "मैफिलीत येणार्‍यांनी यावे, पण ती जोखमीची आहे हे पण लक्षात ठेवावे. नंग्या तलवारी घेऊन सैनिक उभे राहतील आणि जो कुणी मुंडी हलवील, दाद देईल त्याची मान उडवण्यात येईल!!" एकट्या लखनौमध्ये संगीताचे किमान दहा हजार दर्दी होते - पण फक्त शंभर लोक आले. जीव द्यायचा होता का? डास गुणगुण करतोय म्हणून किंवा इतर काही कारणाने तुम्ही मुंडी हलवाल... संगीतकार महान आहे म्हणूनही तुम्ही मान हलवायची नाही हे विसराल आणि सतत ते लक्षात ठेवणंही कठीण आहे. संगीत ऐकून तर सापदेखील डोलू लागतात, नाचू लागतात. अवघड होती ही गोष्ट. त्यामुळे लोकांनी येणे टाळले, पण शंभर लोक आलेच! हे संगीताचे खरे दर्दी होते, त्यांची जीवाची जोखीम घेतली - ही जोखीम घेण्यासारखी होतीच. आणि सैनिक नंग्या तलवारी घेऊन उभे होते. अजब मैफिल जमली होती!
संगीतकारानं वाजवायला सुरूवात केली आणि पहिल्या पंधरा मिनिटातच काही माना हलू लागल्या. कारण संगीत होतंच तसं जबरदस्त. वाजेद अली शहा खूपच काळजीत पडला कारण खरंच उडवायला जावं तर एकच डोकं हलत नव्हतं: बरीच डोकी हलू लागली, थोड्या वेळात आणखी काही हलली अशी हलणारी डोकी वाढतच गेली. मग तर तो खूपच काळजीत पडला: "ही सगळीच्या सगळी डोकी उडवावी लागणार?" आणि पूर्ण राजधानीतील हे अत्यंत दर्दी लोक होते! त्यांना तो ओळखत होता; ते खरे-खुरे संगीतप्रेमी होते.
अर्ध्या रात्री संगीतकारानं वाजवणं थांबवलं तोपर्यंत सर्वच्या सर्व शंभर लोकांच्या माना हलू लागल्या होत्या. वाजेद अलीनं संगीतकाराला विचारलं, "आता आपण काय म्हणाल? या सर्वांची डोकी उडवू का नको? माझे सैनिक तयारच आहेत, आणि मी तुम्हाला वचन दिलंय, म्हणून मी ते पूर्ण करायला तयार आहे."
संगीतकार हसू लागला आणि म्हणाला, "काळजी करू नका! मी अट फक्त एवढ्यासाठीच घातली की फक्त संगीताचे खरे दर्दीच यावेत. याच लोकांकरिता मला वाजवायचं आणि गायचं आहे. तुमचे सैनिक हटवा! मी फक्त वाट पाहात होतो: मान न डोलावता काही लोक बसून राहिले असते, तर त्यांना मैफिलीतून बाहेर जावं लागलं असतं. आता मी वाजवतो, कारण सगळीच्या सगळी शंभर डोकी हलली आहेत. अशाच मैफिलीसाठी मी जन्मभर वाट पाहात होतो. हे लोक पूर्णत: विसरूनच गेले, जीव जाणार आहे हे पण विसरून गेले - जीवन आणि मरणाचा प्रश्न होता हा."


(अनुवादीत)
Philosophia Ultima
(Talks on Mandukyo Upnishad by Osho)

१३ जुलै, २०१०

शॉक्स - शॉक्स

ज्याला त्रास झालाय (अ‍ॅग्रिव्ह्ड पार्टीच ना?) त्यानेच ज्याच्याकडून तो त्रास झालाय त्याच्याकडेच त्रासनिवारणार्थ पुन्हा एकदा स्वत:ला त्रास का करून घ्यायचा? अशावेळी काहीही आगापिछा न ठेवता स्वत:चा स्फोट होऊ द्यावा की नाही? जे समोर स्वच्छ दिसत असेल ते कुठलाही विचार न करता समोरच्याला सांगावं की सांगू नये? म्हणजे स्पष्ट बोलावं की बोलू नये? थोडक्यात फटकळपणा बरा की वाईट? मनात राग तुंबला असेल तर मला तरी तो राग तिथे तसाच आंबवत ठेवावा वाटत नाही. मग तो बाहेर पडल्यानंतर जे नुकसान होईल ते होईल. बर्‍याच वेळा नुकसान न होता लोकांनी नंतर सरळ वागून आश्चर्याचे झटके दिले आहेत.

किस्सा नं.१
आयडियावाल्यांनी मागच्या महिन्यात जीपीआरएस वापरले नसूनही साडेसातशे रूपयांचे बिल केले. ई-मेलने तक्रार केली तर कॉल सेंटरवर तक्रार करा असे उलट उत्तर. त्यांच्याकडे तक्रार करत बसण्यात काही मजा नसते. तस्मात तो विषयच सोडून दिला. परिणाम? फोन बंद आणि बिल कधी भरणार? कॅश की चेक? चे कॉल सुरू. दुसरीकडे फोन बंद असल्यामुळे कॉल करणारे नाराज, बर्‍याच वेळा नुकसानसुद्धा. शेवटी फोन सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.
तक्रार करायला जा, तर कॉलसेंटरवाल्या अजागळ लोकांपर्यंत जाईपर्यंत हे राम ! म्हणायची पाळी येते. आधी हे दाबा, नंतर ते दाबा, मग अत्यंत हिणकस पण गोड आवाजाची बाई "आमचे एक्झिक्युटीव्हज या क्षणी इतरांना सेवा देण्यात व्यस्त" असल्याचे सांगते. मग थोडावेळ संगीत आणि मग आयडिया में आपका स्वागत है और मै फलाणा/णी-बिस्ताना/नी आपकी क्या सेवा कर सकता हूं?
"आपने पिछले महिने ज्यादा बिल लगाया था वो कम करना है और नंबर फिरसे शुरू करना है"
"आपका नंबर?"
"**************"
"पूरा नाम?" (प्रिन्स ऑफ झांजीबार..!)
"************"
डेट ऑफ बर्थ? (बिफोर क्राईस्ट....आता काय सांगू तुला?)
"..........??"
इथे माझ्या कपाळावरची शीर तटतटून येते. पण मी सर्वात पहिला टॅंहां! कधी केला ती तारिख त्याला सांगतो.
"पप्पा की भी डेट ऑफ बर्थ चाहिये क्या?"
"नहीं, उसकी जरूरत नहीं"
"बताईये मै आपकी क्या सेवा कर सकता हूं?"
"आपने पिछले महिने ज्यादा बिल लगाया था वो कम करना है और नंबर फिरसे शुरू करना है. मैने पूरा का पूरा सोलासो रूपये का बिल भर दिया है."
"आपकी रिक्वेस्ट हमारे पास आ गयी है, पर आज सॅटर्डे होने की वजह से मंडे नौ बजकर पैंतालिस बजने के बाद ही आप का नंबर शुरू हो सकेगा, सर"
"क्यों? आज, अभी शुरू करने में क्या प्रॉब्लेम है?"
"जो शुरू करते है वो नहीं है सॅटर्डे है इसलिये"
"तो तु क्या उखाडने के लिये वहां बैठा है क्या?"
"असभ्य भाषा का इस्तेमाल ना करें सर, नहीं तो मुझे कॉल समाप्त करना होगा.."
"अरे? कॉल रेकॉर्ड हो रही है ना? डरो मत.."
"मै डर नहीं रहां हूं, पर असभ्य भाषा का इस्तेमाल ना करें"
"असभ्य भाषा के सिवाय चलता नहीं, सभ्य भाषा लोगों की समझ के बाहर है.."
"माफ करें सर, आपका नंबर तो मंडे को ही शुरू होगा"
"एक तो खालीपिली एक्झेसिव्ह बिल लगाया, फिर महिनेतक फोन बंद, नुकसान हुआ है वो क्या आदित्य बिर्ला का बाप देगा क्या??"
"आप असभ्य भाषा का इस्तेमाल कर रहे है, इसलिये कॉल काटी जा रही है.."
"तुम सब डाकू हो...सोफास्टिकेटेड डाकू...~!!"
आता एवढं झाल्यावर सोमवारीच काय पण डूख धरून हे लोक कधीच फोन सुरू करणार नाहीत असे वाटले. पण रविवारी रात्री सहज कार्ड टाकले, तर आश्चर्यम!! फोन सुरू झाला होता. त्या बिचार्‍याने उगाच शिव्या खाल्ल्या (चुकून हुकून हे वाचत असशील तर सॉरी रे बाबा!!). सॉरी म्हणायला फोन करावा तर नेमका माणूस पुन्हा हाती लागत नाही. नावेपण खरी असतात की खोटी रामजाणे.

किस्सा नं.२
कुठल्यातरी मोठ्या वर्तमानपत्राच्या कार्यालयातील कँटीन. या पेपरमध्ये मी चार-पाच वर्षे काम करत होतो. कॅंटीनचे कॉंट्रॅक्ट एका राजस्थानी माणसाकडे. वेटर म्हणून त्याच्या अख्ख्या खानदानातली पिलावळ. असाच एकदा थकून-भागून कॅंटीनमध्ये कॉफी प्यायला (चहा पिण्यालायक नसतो म्हणून) गेलो. कॉफी दे म्हणून सांगून दहा मिनीटे झाली, वीस मिनीटे झाली, काही हालचाल नाही. भटारखान्यातून राजस्थानी बोलीतील गाणी जोर-जोरात ऐकू येत होती. पंचविसाव्या मिन्टाला उठलो - ज्या रजिस्टरमध्ये महिनाभराचा हिशेब लिहीलेला असतो त्यात माझे खाते शोधले. ती दोन-तीन पाने फाडून, चिंध्या काऊंटरवाल्यासमोर फेकल्या.
"इस महिने मेरा बील उपर भेजनेका नही.."
"क्या यार यसवंत, दे रहा था ना....मै साब को बोलूंगा"
"जिसको बोलना है बोल...."
शेवटी चार दिवसांनंतर अ‍ॅडमिन नावाच्या खात्यातून मला बोलावणे. कॅंटीनवाला आधीच येऊन बसलेला.
"काय कुलकर्णी, कायदा हातात घेतो का?" इति अ‍ॅडमिन मॅनेजर उर्फ प्रशासकिय व्यवस्थापक.
"काय झाले सर?"
"हिशेबाच्या रजिस्टरची पाने फाडण्याऐवजी आमच्याकडे एक तक्रार केली असतीस तर??"
"ये देखो साब" इथे कॅंटीनवाल्याने मी केलेल्या कागदाच्या चिंध्या पॉलीथीन बॅगमध्ये साहेबांच्या टेबलवर ठेवल्या.
"गेले चार दिवस मी वाट पाहात होतो सर, हा तक्रार करण्यासाठी सारख्या चकरा मारतोय. मी जी तक्रार करायची ती यांनी केली. मला यांच्यासारखे चार दिवस परेशान व्हायचे नव्हते."
मग आरोप-प्रत्यारोप, चर्चा, समजावणे.
"कितना हुवा है इसका बिल??"
"पता नहीं, सब फाड दिया ना..."
"हर महिने अ‍ॅवरेज कितना होता है?"
"देड हजार-सोलासो तक होता है"
"काय??? का रे कुलकर्णी, होतं का एवढं बील??"
"होत असेल सर, मी लिहीत नाही दररोज"
"ऐसा कैसे चलेगा? मेरा भी देढ हजार नहीं होता....चल पांचसो रूपये कम कर.."
मी बील फाडूनही पाचशे रूपयांनी साहेबांनी बील कमी केल्याच्या पराक्रमाबद्दल ऑफिसमध्ये लोकांनी फक्त जाहीर सत्कारच करायचा बाकी ठेवला. कारण कॅंटीनवाल्याच्या बेचव चहाने झालेले सगळ्यांचेच पित्त उफाळून आले होते.
आणि पुन्हा कधी कॅंटीनमध्ये गेलो तर, जाताक्षणीच
"वो, यसवंत को क्या चाहिये वो देखो..."

किस्सा नं.३
"आर यू ट्रान्सलेटर??" पन्नास वर्षे वयाची एक वरिष्ट इंग्रजी संपादिका.
"येस मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू?"
"यू नीड टू ब्रश-अप यूअर लॅंग्वेज स्किल्स, ऑदरवाईज डोंट ट्रान्सलेट फॉर अस फ्रॉम टुमारो..."
मी ग्रुप मधल्या इंग्रजी पेपरसाठीही भाषांतर करायचो. ही बाई केरलाईट. आता हिच्या आणि माझ्या लॅंग्वेज स्कील्समध्ये फरक असणारच. आणि मी माझी लॅंग्वेज स्कील काय ट्रान्सलेट करण्यासाठी वापरतोय तर - युनानी दवासाज, सेक्स शक्ती वाढवा, घर भाड्याने देणे आहे, चंदा फ्रेंडशिप क्लब.
"आय जस्ट कान्ट रिड दोज अ‍ॅडस, इटस एव्हरीडे इरिटेशन, सो यू डोंट ट्रान्सलेट"
"आय कान्ट स्टॉप ऑन युवर सजेशन मॅम, व्हाय डोंट यू कंप्लेन टू अ‍ॅड मॅनेजर ऑर जनरल मॅनेजर? इफ दे डिरेक्ट मी, इटस ओके देन."
"बट आय अ‍ॅम सेईंग यू...."
"सॉरी मॅम, यु आर नॉट माय इमिजिएट बॉस"
दुसर्‍या दिवशी जीएमच्या केबीन मधून आमंत्रण. गेलो. सोबत आमचे लोण्याहून मऊ जाहिरात व्यवस्थापक.
जीएम सरदारजी, केबीन थंड, वातावरण गरम.
"क्यों, बहोत खूश नजर आ रहे हो? क्या बात है?" सरदारजी कम जीएम
"मै हमेशा ही खूश रहता हूं सर..."
"यू मिसबिहेव्हड विथ ***** मॅम? एक्सप्लेन अस"
आता यांना काय एक्सप्लेन करायचे? एवढे तपशील डोक्यात ठेऊन पुन्हा समोरच्या माणसाला "मीच कसा बरोबर आहे हे" कन्व्हिंस कसे करायचे?? म्हटले देऊ एक रिअ‍ॅलिटी उदाहरण.
"सर, सपोज समबडी कम्स टूमॉरो इन यूअर केबीन अ‍ॅण्ड सजेस्टस यू नॉट टू सिट हिअर फ्रॉम नेक्स्ट डे, हाऊ यू विल रिअ‍ॅक्ट?? थिस इस ओन्ली हायपोथिकेशन..."
"गेट आऊट फ्रॉम माय केबिन.." सरदारजी.
"बुरा लगा ना? मैने कल उनको सिर्फ इनके या आपके पास जाने के लिये कहा था...आप ऐसे रिअ‍ॅक्ट हो रहे है जैसे सच में कोई आपको कह रहा हो. अ‍ॅम जस्ट एक्सप्लेनिंग दि पेन हॅपण्ड टू मी बाय हर रिमार्क्स.."
लगेच राजीनामा लेखन. प्रशासन विभागात सादरीकरण. जीएम ला शॉक दिल्याबद्दल अ‍ॅडमिन मॅनेजरकडून अभिनंदन. सोडून जाऊ नको, तुला काही नोकरी सोडायला सांगितले नाहिय. फक्त बाहेर जायला सांगितलेय इत्यादि इत्यादि.
शेवटी मूर्ख आणि सदा झोपेत असलेल्या जगात किती दिवस राहायचे याचाही कधीतरी विचार करावाच लागतो.
हा शेवटचा किस्सा भरकटला. सव्वातीन वाजले सकाळचे. आता टाकतोच.
चला - बाय.