३१ जुलै, २०१०

हम तो है सिर्फ आप के ऐलान किजीये

मुझपे भी रहम मेरे मेहरबान किजीए, ए मेहेरबान किजीए
मुश्किल हमारे दिल की भी आसान किजीए जरा आसान किजीए
गुलशन में चल रही है बहारों की छेडछाड, मैदान-ए-मोहब्बत में निकल आये शयसवार
तीर-ए-नजर का हम को भी कर लिजीए शिकार
हम तो है सिर्फ आप के...ऐलान किजीये जरा...ऐलान किजीये...
बेहोश दिल को दर्द के औसान बक्षिये, सोयी हुयी मौज को एक तुफान बक्षिये...
जीने के वास्ते कोई अरमान बक्षिये, वर्ना हमारी मौत का सामान किजीए, मौत का सामान किजीए

हे मराठे मध्येच तलवारी घेऊन तंबूत घुसले न पार बोर्‍या वाजला कव्वालीचा...
जरा कव्वाली पूर्ण होईपर्यंत दम निघत नव्हता का यांना...छे!!!

बातम्या

अरारा..हा ब्लॉग बंद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जगात काहीतरी घडणार आणि मला त्यावर काहीतरी म्हणावेसे वाटणार. आता या दोन बातम्याच बघा:

वारंवार शरीरसंबंध बलात्कार नाही - कोर्ट
राहुल महाजनने पत्नीला बेदम मारले
(सौजन्य: अर्थातच म.टा. असल्या पाणचट बातम्या आणखी कोण देणार!)
याच कोर्टाने (आणि न्यायाधिशांनीही) काही दिवसांपूर्वीच लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही असा निकाल दिला होता. आता आम्ही काय बुवा कायदा पाळणारी माणसं. मग दिली आम्ही पण आमच्या परिचयातील सगळ्या मुलींना लग्नाची वचनं ! (हॅट...काही घडलं नाही तसं....मुली हुशार आहेत कोर्टापेक्षा)
पण कोर्ट तरी काय करणार हो. मुळात शरीरसंबंध ही एवढी फालतू न क्षुल्लक गोष्ट आहे की त्यासाठी कोर्टात जायची गरज नाही. रात गई, बात गई. आणि कोर्टान जरी बलात्कार झालाय असा निकाल दिला तरी हे दोघं काय पुन्हा कधी शरीरसंबंध करू शकणार नाहीत का? तर आम्ही यातून एवढाच बोध घेतो की असल्या आलतू-फालतू गोष्टीसाठी कोर्टात जायचं नाही. काय एकमेकांची डोकी फोडायची ती घरातल्या घरात, किंवा बाहेरल्या बाहेर. कोर्टाला जणू काही कामधंदाच नाही मानवी पागलपणाचे खटले ऐकण्याशिवाय. मुळात आमचा प्रश्न असा आहे की, तुम्ही जर एवढ्या सहज आमिषाला बळी पडून शरीरसंबंध ठेऊ देता, आणि पुरूष पलटला तर कोर्टात जाता, तर याच कोर्टात काय पण प्रत्यक्ष ब्रम्हदेवाच्या कोर्टातही तुम्हाला न्याय मिळायचा नाही. कोर्ट बलात्कार झाला नाही असे म्हणत असल्याने आता स्त्री संघटनाही नाराज झाल्यात (आय अ‍ॅम सॉरी, मराठी भाषा अशीच आहे). आम्ही समजू शकतो. त्यांचा रेफरंस पॉईंट दुसरा आहे. या निकालामुळे आमच्यासारखे कामसू लोक लग्नाची वचनं देऊन मोकाट सुटणार नाहीत काय? खरंय. तर मायबहिणींनो, तुम्हाला एवढंच सांगतो की शब्द, वचन ही अत्यंत पोकळ गोष्ट आहे. प्रॉमीसेस आर मेड टू बी ब्रोकन ! अरे सांगा रे यांना कुणी पुस्तकं वाचायला! आणि पुन्हा हे एका पुरूषाला सांगावा लागतंय.

आणि ही दुसरी बातमी:-
राहुल महाजनने पत्नीला बेदम मारले.
आमचा शेजारीही त्याच्या बायकोला बेदम मारतो - ती पण त्याला जामून ठोकते. ही बातमी ज्यावेळपासून त्या दोघांनी ऐकलीय, त्यावेळपासून ते माझ्या घरातून हलायला तयार नाहीत. आमचंही नाव पेपरमध्ये छापून यायला पाहिजे म्हणे. आमच्या भांडणाची व्हिडीओ शुटींग करून घ्या आणि ती चॅनलवर दाखवा म्हणाला. त्याला हरप्रकारे समजावून सांगितले की बाबा त्याचं नाव छापून येतंय कारण तो एका स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आहे. त्यानं टिव्हीवरच, पार मंत्र्या-संत्र्यांच्या उपस्थितीत लग्न केलंय - म्हणून त्यांच्या मारामारीच्या बातम्या पण टिव्ही पेपरांतून येतात. तुम्ही जशी मारामारी केली की लग्नाला उपस्थित असलेले लोक तुमच्या घरी तुम्हाला समजावून सांगायला येतात (आणि पुन्हा घरी जाऊन बायकोला ठोकतात) ना, तसंच समज. काही केल्या मानेच ना. काहीतरी कराच म्हणे. मग काय खरडली ही नोंद आणि दिली दाखवून त्याला. तेव्हा कुठे आता त्यांच्या घरातून नेहमीसारखा प्लेटस, खुर्च्या फेकल्याचा आवाज येतोय. चला, मला त्यांना समजून सांगायला हवं.



३० जुलै, २०१०

उपसंहार

मराठी शब्दकोषाच्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ काहीही असो, हा शब्द या ब्लॉगसाठी संहारक ठरणार आहे. ब्लॉगच्या समाप्तीची पोस्ट टाकल्यापासून मृताच्या घरी जसे लोक जातात आणि अबोलपणे परततात तसे वाचक या ब्लॉगवर येऊन परत जाताना पाहून मजा वाटत होती. खरोखरचा मृत्यू येण्यापूर्वीची एक चुणूक ! युजी, आय टेल यू - एव्हरीबडी रॉटस लाईक ए गार्डन स्लग व्हेन ही ऑर शी डाईज, बट यू हॅड दॅट एक्स्ट्राऑर्डिनरी करेज टू स्टेट इट व्हेन यू वेअर अलाईव्ह. आणि म्हातारबा, तेच तुझं सौंदर्य आहे. मी नेहमीच वास्तवावर प्रेम केलं आहे; आणि कुणाही विचार करू शकणार्‍या जीवाचा जसा प्रश्न असू शकतो तसा
माझाही होता - माझं वास्तव काय? मी म्हणजे काय? आणि असे प्रश्न खरोखर
जेव्हा पडतात तेव्हा कुठल्याही पुस्तकी व्याख्या कामी पडत नाहीत.
असा प्रश्न माझ्यात निर्माण करण्याची भूमिका रजनीशांच्या साहित्यानं निभावली आणि हा प्रश्न उखडून फेकण्याची भूमिका यूजींच्या आभासी सहवासानं निभावली. युजी आणि रजनीश हे विचारांच्या (आणि शिकवणुकीच्याही (सॉरी युजी तुमची काहीच शिकवणूक नव्हती, तरीही हा शब्द वापरतोय) दृष्टीनं दोन ध्रुव असले तरी ते एकाच पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत - एकमेकांशी एवढ्या घट्टपणे जोडलेले तरीही एकमेकांपासून कितीतरी दूरवर. रजनीशांची भूमिका अखिल मानवजातीच्या संचितावर हक्क सांगणारी -
तर युजी अगदी दूरवर एकटेच अबोलपणे उभे. थोडक्यात रजनीश म्हणजे जगाच्या बाजारात ओरडून परमात्म्याचा प्रसाद विकणारे, प्रसादावरही प्राईस टॅग ठेवणारे तर युजी परमात्माही अस्तित्वात नाही आणि त्यामुळे त्याचा प्रसादही नाही असं निक्षून बजावणारे. तरीही दोघांच्याही हातून परमात्म्याच्या प्रसादाचे तेवढ्याच प्रमाणात वाटप झाले याचा मी साक्षीदार आहे. माझ्या ब्लॉगवरील रजनीशांवरची पोस्ट वाचलेल्या वाचकांना ही पोस्ट म्हणजे घूमजाव वाटू शकतो.
पण आहे हे असं आहे. रजनीश एवढे का बोलले? युजी गप्प का राहिले? तर परमात्मा हा चराचरात व्यापून आहे - ज्याने तो अनुभवला त्याच्यात तो आहेच आहे; पण ज्याला अजून अनुभवायला मिळाला नाही त्याच्यातही आहेच; फक्त त्याला त्याची जाणीव नाही; आणि ही जाणीव त्याच्यात येण्यासाठी त्याने शक्य त्या सार्‍या प्रयत्नांचा अवलंब करायला हवा. ध्यान करायला हवं, विपश्यना करायला हवी, सूफी व्हर्लींग करायला हवी - अगदी संभोगातूनही समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा अशी भूमिका असणा
रे रजनीश. तर हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत (युजींनी ते केले होते), ही बुध्दत्व विकण्याची मार्केटींग आहे, मला हा पवित्र धंदा करण्यात रस नाही, जग हे जसे असायला हवे, अगदी तसेच आहे, त्यात काडीचाही बदल करण्याची गरज नाही असे जन्मभर सांगत राहाणारे युजी. या दोघांमध्येही फार मजेशीर साम्यस्थळे आहेत. उदा. रजनीश आयुष्यभर रोज आहारात एकच-एक पदार्थ घेत असत. एकच पदार्थ रोज! त्यात काहीही बदल नाही. युजींचेही असेच. बुध्दपुरूषांच्या बाबत असे शक्य आहे कारण त्यांच्यात कोणताही अनुभव साठत नाही, चवीचाही नाही. क्षण उलटला की अनुभवही पुसून जातो आणि पुन्हा एकदा आरसा स्वच्छ होतो.

दोघांच्याही उपस्थितीत करिष्मा होता. दोघांकडेही लोकांची रिघ लागलेली असे. रजनीशांचा वावर अत्यंत यांत्रिक वाटणारा, ताठर, संथ तर युजींसोबतचे बोलणे म्हणजे लहान मुले आपल्या आजोंबासोबत बसून जेवढ्या सहज गप्पा मारू शकतात तेवढे सहज! रजनीश लोकांशी अंतर राखून बोलतील, "दर्शनाची" वेळ देतील, मी महत्वाचा आहे, माझा आदर राखायलाच हवा हे लोकांच्या मनात ठसवतील. हे वर्णन कल्प-कल्पांतापर्यंत चालू शकेल. हेच नेति नेति. हे थांबण अशक्य आहे. ब्लॉग थांबला, न थांबला तरी!

गुडबाय



मित्रहो,
माझ्या सवाल या पोस्टमध्ये ठरल्याप्रमाणे, मायनॉरिटीला प्राधान्य देऊन हा ब्लॉग बंद करण्यात येत आहे. पाचही प्रतिक्रिया होकारार्थी आल्या आहेत आणि ऑफकोर्स मी माझा व्हेटो वापरला आहे; जो नकारार्थी आहे - अल्टिमेटली मायनॉरिटी हॅज वन !
सो गुडबाय !

२८ जुलै, २०१०

सवाल-जवाब

मी पुढे ब्लॉग लिहीणार नाही कारण असलं काहीतरी माझ्या ऐकण्या-वाचण्यात येतं आणि मग आपण काही वेगळं लिहीण्याची गरजच राहात नाही. मी कविता करायचो, पण रामजोशींच्या लावण्या ऐकल्या आणि मी लेखणी खाली ठेवली. हटातटाने बटा, रंगवून जटा धरीशी का शिरी..मठाची उठाठेव का तरी...अबाबा.!! छे..छे..! आपण फक्त हे लोकांना दाखवू शकतो...त्या तोडीचं लिहू शकत नाही. हे सवाल-जवाब वाचून झाल्यानंतर ते युट्यूबवरही पहा. आणखी मजा येईल. हे सवाल-जवाब मात्र ग.दि. माडगूळकरांनी लिहीले असल्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जाणकार सांगतीलच.

सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती
जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग..

************

सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी..
जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं....

***************

सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अविरत परक्यासी...खारट त्याचे चुंबन घेई....एका मुखाने शिवा दोन्हीसी...
जवाब: पतीत पावन त्रिभूवन जीवन मुनीजन बोलती स्वर्गधुनी...निंदू नको जरी सिंधूस मिळली...गंगा गंगाधर त्यजुनी...

*****************

सवाल: तुझीच दौलत परंतू दैवे भाळी तुझ्या नाही.. गं...तुझीच असूनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते पाही गं.... तुझ्याच पाशी जन्मभरी ते रम्य दोन पेले गं...सुधा, हलाहल आणि मदिरा यानी भरलेले गं....
जवाब: कवडी पांढरी, लोलक काळा- लाल जरा कोने गं...जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने..गं....शुभ्र पांढरे असते अमृत...हलाहलाचा रंगच काळा....सांग गुलाबी नेत्रकडांहून मद्याचा का रंग निराळा...जगवी अमृत, मारी हलाहल, मद्य झिंगवी कैफात...काढून बघ हे गुण तिनही असती तुझीया डोळ्यात...

***************

सवाल: सूर्य उगवता गगनामाजी जळी कमलिनी का फुलती, पूर्ण चंद्रमा नभात दिसता, सागरास का ये भरती...?
जबाब: सूर्य उगवता...कमल उमलते...सिंधू उसळतो चंद्रा बघुनी...शुध्द प्रिती हे एकच कारण ज्ञात्यांनो घ्या ह्रदयी भरूनी

*********************




२७ जुलै, २०१०

कॉन्फिडेन्शियल

CONFIDENTIAL

(Non-serious)

Date: 27 July 2010

My dear Prime Minister of India,

I am writing you this bewildering letter, but just hold on – and don’t get upset about it; because I know you have done that whole your life – getting upset & doing nothing! So I am writing you this letter not because you are the Prime Minister of this big country; but because an upset Prime Minister – which cost a lot to you first & then the country & thereafter the whole world at large.

Why you are upset is not a question to be explained – a Caption of sinking ship has to get upset. And coalmen (now a days you call them Members of Parliament) who have to fuel this ship are not at all interested to fuel the ship – but they try hard to throw you out from your chair! It’s a joke for you. You know very well, ship is going to sink at any time and nobody except you can handle it. But other fellows have some sort of excessive confidence within themselves so they feel they should throw you out!

You may get surprised that from where this boy came to know whole this secret, but aware, everybody in the country know it. Passengers in a sinking ship can easily figure out what a tragedy the Caption is facing! That’s why whole the newspapers, TV Channels go on hammering your delicate brain without stop & they suggest you what you should do. But I tell you they themselves are very upset. You know too. So you never hear them seriously.

What point I am making here writing you this confidential letter is, you just come to my city on official tour because here is raining beautifully & we will enjoy the rains & I will tell you the other part of secret while we enjoy hot coffee in some restaurant.

Don’t be hurry – nobody should know you are visiting me; otherwise whole the parliament will come behind you & I am warning you I don’t have a single penny to pay their coffee bill. I am keeping them unaware of this letter & if they read this they will not be in position to figure out what it is & some of them are already illiterate!

If you don’t come & ship suffers any rigorous losses furthermore, don’t blame that citizens in India never cared for you – I am caring for you.

Yours Faithful,

Sd/-

Yashwant Kulkarni

CC: All Indians including NRI’s

२५ जुलै, २०१०

सवाल

या ब्लॉगवरील लिखाण बंद करण्यात येत आहे. इथून पुढे या ब्लॉगवर काहीही टाकले जाणार नाही. मी केलेल्या लिखाणावर ज्या लोकांनी टिप्पण्या टाकून मला आनंद दिला त्यांचा आणि टिप्पणी न टाकूनही मला तेवढाच आनंद देणार्‍या जगभरातील अज्ञात वाचकांचा मी आभारी आहे, तसेच ज्यांच्या ब्लॉगवर मी टिप्पण्या टाकल्या त्यांचाही मी आभारी आहे. ही पोस्ट टाकल्यानंतर दोन दिवसांनी हा ब्लॉग नष्ट करण्यात येईल. चलो. बाय!!
हे मी काल सकाळी लिहीलं होतं. मला आता ब्लॉग लिहीण्याची काही गरज राहिली नाही - म्हणून. मी ब्लॉग का लिहीत होतो? तर माझ्या डोक्यात साठलेला कचरा मला कुठेतरी टाकायचा होता - आणि मला तो महत्वाचा पण वाटत होता. त्यावर आलेल्या "मस्तच रे!" "भारी" अशा प्रतिक्रिया मला सुखावून जात होत्या. एकतर मी लिहीतो ते कचराछाप आहे हे मला पाच दिवसांपूर्वीपर्यंत माहीत नव्हतं. कारण मी अस्तित्वात नव्हतोच. त्यामुळे मी जे करतोय त्याबद्दल मला माझ्या आत ठामपणाही नव्हता. सगळा सावळा गोंधळ होता. काही दिवसांपूर्वी युजी मला भेटले; त्याच्या दोन-तीन पोस्ट मागे टाकलेल्या आहेतच. या माणसाने अक्षरश: मला होत्याचा नव्हता करून टाकले. रजनीश नावाच्या एका मूर्खानं केलेल्या कचर्‍यावर विसंबून राहून मी एन्लायटनमेंट्च्या मागे लागलो होतो. ध्यान करत होतो. चोवीस तास त्या मूर्खाचं बोलणं ऐकत होतो. तब्बल आठ वर्षे मी हे केलं. आजपासून अकरा महिन्यांपूर्वी तर मी नोकरीपण सोडून दिली आणि हे अकरा महिने माझ्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. कुठेतरी जातोय असं वाटत होतं; पण कुठंही जात नव्हतो. माझा तृतीय नेत्र उघडला; ध्यानात प्रकाश दिसू लागला; कुंडलीनी जागृत झाली होती - पण मला दुसर्‍या माणसासोबत बोलणं निरर्थक वाटत होतं, मला मित्र होते, पण त्यात काही अर्थ नव्हता. मी एक साठलेलं गटार झालो होतो आणि तसाच साठून राहून मी जागा होईल ही आशा वाटत होती. युजी या माणसाच्या फक्त आभासी सान्निध्यात येऊन सगळी घाण वाहून गेली. मी जे युजी, युजी करतोय तर कशावरून रजनीशांची जागा मी युजीं ना दिली नसेल? नाही. युजी कॅरीज नो प्लेस फॉर मी अ‍ॅज अ गुरू. रजनीशांनी माझ्या आत नसलेली जी आशा जागी केली होती, आणि ती तशीच अनंत काळ जागी राहू शकली असती ती युजींनी नष्ट केली. एक आशा क्या मिटी, पूरा आदमी ही मीट गया. आता जे लिहीणं बाहेर पडत आहे तो कुणीतरी नवाच माणूस लिहीत आहे. हा पूर्वी इथे कधीही नव्हता. ही मला एन्लायटनमेंट मिळाल्याची घोषणा आहे का? नो. एन्लायटनमेंट अस्तित्वात नाही. आशेला वाव नाही. जे शोधत आहेत त्यांना मी सांगतोय. आध्यात्मिक सिध्दीं विरूद्ध एका सर्वसामान्य माणसाची नजर यातला फरक दाखविणारी व्हिडीओ क्लिप मी इंग्रजी मजकूरासह या ब्लॉगवर टाकली. त्यावर आतापर्यंत एकही प्रतिक्रिया नाही. याला म्हणतात स्पेलबाऊंड. मी तो मजकूर असभ्य भाषेत लिहीला आहे. माझ्यासाठी आता सभ्य-असभ्य, फार काय भाषाच अस्तित्वात राहीली नाही. तर मुख्य प्रश्नावर येतो. तुम्हाला माझ्या लिखाणाचा हा कचरा हवाय का? हे वाचणार्‍या सगळ्यांना हा प्रश्न मी विचारत आहे. हो किंवा नाही एवढंच सांगा. विश्लेषण करत बसू नका. चार लोक हो म्हणाले आणि सहा नको म्हणाले, तर मी मायनॉरीटीत असलेल्याचं ऐकेन. नाऊ आय डोन्ट बिलीव्ह इन मेजॉरीटी. या महिन्यातील ३० तारखेपर्यंत दिलेल्या मतांचा विचार केला जाईल.