चोवीस तारखेला गावात सरपंचपदाच्या निवडणुका होत्या. लहानपणी शाळेत असताना व्याकरण शिकवण्याच्या नावाखाली लहान-लहान पोट्ट्यांना यथेच्छ तिंबून काढणार्या मास्तरांना गावचा सरपंच व्हायचा किडा आला होता. मी त्यांचा कधीकाळचा विद्यार्थी आता त्यांचा मतदार झालो होतो. त्यानुसार त्यांचा फोन आलाच -
"बघ रे, मी पासष्ट वर्षांचा झालो आहे, सरपंच व्हायला उभा राहिलोय. चोवीस तारखेला नक्की ये. तिकीटाचे पैसे उद्यापर्यंत तुझ्याकडे येतील.."
"नक्की येतो सर, पैशांची काही गरज नाही. बरेच दिवस झाले मी पण गावाकडे आलो नाही. गेल्या निवडणुकीला आलो होतो. नक्की येतो."
"बर, बर... आल्यावर बोलूच"
मी गावाकडे सहसा जात नाही. जवळच्या मित्राचे लग्न असले, जवळचे कुणी आटोपले तरच गावाची भेट. गावचे लोक इथे येत असतात तेव्हा सगळ्यांच्या भेटी होतातच. पण आता मी गावाकडे जाऊन पाच वर्षे उलटली होती. आणि अख्खा पावसाळाभर कुठे बाहेर पडलो नव्हतो. लहानपणी माझ्यासोबतच गावातून जाणार्या गंगेत पोहलेल्या आणि आता टेक्नीशियन झालेल्या गांडदोस्ताला गाडी घेऊन गावाकडे जाण्यासाठी पटवले. दोन अडीचशे कि.मी. म्हणजे गाडीवर चार-साडेचार तासांचा प्रवास. म्हणून सूर्योदयापूर्वीच निघालो.
सकाळच्या वेळी सुटणारा गार वारा अंगाला झोंबू लागला होता. काही किलोमीटर मागे पडल्यावर रस्त्यात गगनराज सामोरे आले.
चार तासातच गावात पोहोचलो असतो पण मध्येच गावापासून तास-दीड तासाच्या अंतरावर राहाणार्या मित्राकडे थांबलो. हाही धंद्याने मास्तरच. शिवाय सोबत आलेल्या मित्राचा मामेभाऊ. स्वभावाने अतिचिकित्सक. सध्या त्याने घेतलेल्या नव्या प्लॉटवर घर बांधत होता. ते ही पाहायचे होते म्हणून त्याच्याकडे जाणे ड्यू होते. यानं आजच नेमकी अर्थविषक मार्गदर्शनाची कसलीतरी बैठक आयोजीत केली होती. आम्ही आयतेच त्याच्याकडे जाऊन पोचल्याने त्या मार्गदर्शन करणार्याच्या तोंडी देण्यासाठी दोन बकरे त्याला आयतेच मिळाले होते. खरं म्हणजे आम्ही त्याच्याकडं गेलो होतो ते त्यालाही गावाकडे सोबत घेऊन जायला. पण आता आलाच आहात तर तासाभरात ही बैठक आटोपून घेऊ आणि गावाकडे निघू म्हणाला. बैठका, सेमिनार्स, चर्चासत्रे, मार्गदर्शन वगैरे प्रकारांचा मला भारी राग येतो. म्हणून त्या मित्राला सरळ आम्ही थांबणार नाही असे सांगितले. पण ऐकेचना. तो मार्गदर्शनवाला पण औरंगाबादहूनच रेल्वेने येणार होता. त्याला घ्यायला जावे लागणारच होते. गेलो. स्टेशनवर जाऊन उकडलेले चणे, भजे आणि समोस्यांचा नाष्टा हाणला. शेवटी हो-नाही करीत थांबवेच लागले.
नियोजीत वेळी सुरू झालेली पंधरा-वीस लोकांची, तासभरच होणार असलेली ती बैठक भली लांबली. दोन तास उलटले. सोबतचा गाडीवाला मित्र चूळबुळ करू लागला. मलाही ताण झाला होता. तीन तास गाडीवर बसून-बसून हाडे दुखू लागली होती आणि वर त्या मार्गदर्शनवाल्याची बडबड. शेवटी दोघेही त्या बैठकीतून उठुन बाहेर पडलो आणि गाडीला कीक मारली. दीड वाजत आला होता. मतदान केंद्रावर जाऊन निवडणुकीवाल्या मास्तरांचा उध्दार करायचा आणि सगळ्यांच्या भेटी घ्यायच्या, बोलायचे, गावच्या गंगेत पोहायचे आणि परत निघायचे असा कार्यक्रम ठरला होता. तो तसाच पार पडला. सगळे भेटलो. बसलो. बोललो. मतदानही करून आलो. तो बैठकवाला मित्रही आता गावात येऊन पोचला होता. मग सगळ्या मित्रांचा अड्डा जमला. चेष्टा-मस्करी, उणीदुणी, शिव्या यांना उत आला. सहा वाजत आले होते.
आमच्या गावाहुन वाहात जाणार्या गोदावरीमध्ये पेशवेकालीन गणपती मंदीर आहे. त्यात मला काही इंट्रेस्ट नव्हता. पण समोरच वाहाणार्या गंगेत पोहून आता बरीच वर्षे उलटली होती. मग मंदीराकडेच पोहायला जायचे ठरले. मस्त अर्धा-एक तास पाण्यात उड्या मारल्या, पोहलो आणि परत घराकडे निघालो. आता परत फिरायचे वेध लागले होते. चहापाणी आटोपून गाडीवर टांग मारली. मध्ये रात्री त्या बैठकवाल्या मित्राकडे अंग टाकायचे आणि सकाळी लवकर उठून परतीचे प्रयाण करायचे आणि तीन-साडेतीन तासांत औरंगाबाद गाठायचे ठरले.
सगळे सोबतच निघालो आणि रात्री मुक्कामी येऊन पोहोचलो. अंग ठणकू लागले होते. सोबतच्या मित्राचे तर जास्तच ठणकू लागले होते आणि मॅक्डोनल्ड नं.१ पोटात गेल्याशिवाय ते राहाणार नव्हते. आमचा मास्तर दोस्त आसाराम बापूचा चेला. पिणार तर नाहीच, पण पिणार्यांना पाजवणारही नाही अशी त्याची प्रतिज्ञा. ती त्यानं आमच्या समोर पुन्हा एकदा म्हणून दाखवली. शाकाहारात काय हवे ते, हव्या त्या हॉटेलमध्ये खाऊ म्हणून बसला.
त्याचे बौध्दीक घ्यायची खुमखुमी मला आली. पिणार नाही हे ठीक आहे, पण पाजवणार नाही असे त्याच्याकडे आलेल्या मामेभावाला म्हणणे मला पटले नाही. मी स्वत: धुतल्या तांदळासारखा नसलो तरी, कुणा दुसर्याकडून कधीच पीत नाही. आजही पिणार नव्हतो. पण सोबत आणलेल्या पाचसातशे रूपयांतून पेट्रोल, सिगारेट्स, खादाडी यातून आता दीड-पावणे दोनशेच रूपये उरले होते. तेवढ्यात आमच्या दोस्ताचा घसाही ओला झाला नसता. म्हणून मास्तरला कापू असे आम्ही ठरवले तर मास्तर जो पाजवायचा तो सोडून भलताच डोस आम्हाला पाजवून मोकळा झाला. शेवटी माझ्याकडे शिल्लक असलेल्या पैशांतून कसा का होईना पण मित्राचा घसा ओला करायला म्हणून पुन्हा स्टेशनजवळच्या एका बार मध्ये शिरलो. मास्तर महोदयही सोबत होतेच. टेबलवर चालत असते तशीच चर्चा करीत, चकण्यात आलेले पापड, शेंगदाणेफुटाणे खात असताना माझा फोन वाजला. मैत्रिण होती.
"यू इडीयट, व्हेअर आर यू? माय टो इज इन्जुअर्ड बॅड्ली अॅण्ड दॅट डॉक्टर सेज आय हॅव टू लूज माय टो नेल फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ..ओऽऽ गॉड..हाऊ हॉरिबल इट विल लुक.. प्लीज कम टू मीऽऽ.. " रडत-रडत मैत्रिण मलाही शिव्या घालत होती. ही मैत्रिण म्हणजे नुसतीच मैत्रिण. मुंबईची. आजपर्यंत प्रत्यक्षात कधीच न भेटलेली. आठ-दहा महिन्यांपासून एकमेकांना रोज याहू चॅटवरून ओळखत होतो.
"लूक डिअर डोण्ट क्राय, व्हीच हॉस्पिटल आर यू इन नाऊ? आय वील बी देअर अप टू मॉर्निंग..व्हेअर आर युवर मॉम अॅण्ड डॅड?"
"आय जस्ट केम होम फ्रॉम हॉस्पिटल.. एव्हरीबडी इज बिझी विथ देमसेल्व्हज..नोबडी इज विथ मी.." रडू आणखीच वाढले.
"लूक, अॅट दी मोमेण्ट फॉर्च्युनेटली आय अॅम निअरबाय स्टेशन..आय वील लीव्ह फॉर बॉम्बे.. डोण्ट वरी...वी वील मीट इन दी मॉर्निंग.."
"ओके..आय वील बी वेटींग..."
सोबतचे मित्र कान टवकारून आमचे बोलणे ऐकत होते.
"तु मुंबईला निघणार की काय आता?" मास्तर मित्र
"आत्ता हो म्हणालो ना, जाणारच मग.." मी
"पण तुझ्याकडं तर पैसे नाहीत, आहेत ते आत्ता बिल द्यायला लागतील, मी दारूचं बील देणार नाहीय.." मास्तर मित्र
"ओके" मी
"देवगिरी एक्स्प्रेस यायला फक्त दहा मिनीटे उरलीत..." मास्तर
"हो. चला पट्कन. तिकीट काढून ठेऊ.. गाडी यायची तेव्हा येईल.. " मी.
"पाचशे रूपये पुरतील का तुला?" मास्तर.
"कशाला? तिकीट निघतंय ना आहे त्या पैशांत.. पैसे नकोत मला.." मी
"अरे पण तिथं काय करशील पैशांची गरज पडली तर?" मास्तर
"असले प्रश्न मला पडत नाहीत - आत्ता मला फक्त इथून निघायचंय..." मी
"तुझ्याकडे किती रूपये आहेत? साठ? हे शंभर रूपये घे." मास्तर
"ठीक आहे - थॅंक्यू.." मी
च्यायला ही पैसा ही भलती बेक्कार गोष्ट आहे. लोक आयुष्य जगतच नाहीत. पैसा आयुष्य जगतो. एखाद्याकडे सगळे असून पैसा नसेल तर तो जगण्यासाठी बिलकुलच नालायक ठरतो.
पटकन स्टेशनकडे जाऊन तिकीट काढून घेतले. गाडी यायला पाच मिनीटे होती.
"ठीक आहे..बाय बाय.." मी त्या दोघांचाही राम-राम घेतला..
"एटीएम कार्ड आहे ना सोबत? उद्या पैसे लागले तर फोन करून सांग.. म्हणजे हा किंवा मी जमा करतो तुझ्या खात्यावर.."
"तशी काही गरज पडणार नाही.."
"बरं..आम्ही जातो आता...भूक लागलीय.."
"ओके..बाय.."
ते दोघंही निघुन गेले. मी प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत शिरलो. गाडी चांगलीच अर्धा-पाऊण तास उशीरा आली. तोपर्यंत मैत्रिणीकडून कसं यायचंय, कुठं यायचंय वगैरे तपशील घेतले. सोबत पैसे नाहीत हेही सांगितले. तिने "मनी इज नॉट इश्यू डिअर बट आय अॅम फिलींग बॅड दॅट वी वील नॉट बी एबल टू रोम अराऊंड.." वगैरे सांगितले.
जनरलच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सेकंड क्लास स्लीपरच्या पॅसेजमध्ये तरी उभं राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण सेकंड क्लासचा डबा फार लांब होता. कुठल्यातरी स्टेशनवर उतरून त्यात जावे लागणार होतेच. कारण गर्दीत चिंबून जायला झाले होते. गाडीवर दिवसभर बसून-बसून आता शरीराचा प्रत्येक अवयव ठणकत होता. अजून आठ-नऊ तास तरी रेल्वेतच राहावे लागणार होते. मैत्रिणीचे एसएमएस सुरू झाले.
"आर यू सिरीयस्ली कमींग??"
"येस. आय हॅव लेफ्ट अॅण्ड नाऊ इन क्राऊडेड ट्रेन.."
"हम्म्म...मौके के पे चौका मारतोयस ना तु...लूक, वी वील नॉट बी एबल टू एन्जॉय बिकॉज आय कान्ट वॉक... वी वील टुगेदर जस्ट फॉर दी डे विदाऊट गोईंग एनिव्हेअर लाईक जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया ऑर एनिथिंग लाईक दॅट.. "
"मौके पे चौका? जा गं... कशाला बेबी डॉलसारखं रडत होतीस मग फोनवर... माय सिटी इज जस्ट ऑन दी वे...टेल मी.. आय वील कॅन्सल अॅण्ड गेट डाऊन देअर.."
"नो. नो. इफ यू गेट डाऊन नाऊ, आय वील नॉट स्पीक फॉर दी रेस्ट ऑफ लाईफ..यू हॅव टू कम इन एनी कण्डीशन..."
"दॅट्स व्हाट आय अॅम डुईंग.."
"ओके. लूक, फ्रॉम सीएसटी यू टेक हार्बर लाईन लोकल...इट वील बी ऑन प्लॅटफॉर्म नंबर टू.. देन यू गेट डाऊन अॅट बेलापूर सीबीडी...आय वील बी फ्री अप टू एलेव्हन..."
"व्हॉट आय वील डू अप टू एलेव्हन? बट ओके. आय वील बी रोमींग अराऊंड सीबीडी...गेट फ्री अॅज सून अॅज यू कॅन.."
"येस्स. गिव्ह मी युवर अपडेट्स... आय वील नॉट बी एबल टू स्पीक ऑर एसएमएस यू...माय प्रॅक्टीकल्स आर गोईंग ऑन..."
अशीच मग जालना, औरंगाबाद, मनमाड स्टेशन्स मागे पडली. नाशिक रोड की नाशिक स्टेशनवर शेवटी प्लॅटफॉर्मवर उतरलोच आणि सेकंड क्लासच्या डब्याकडे जाऊ लागलो. कुणीतरी कंबरेला रिव्हॉल्व्हर आणि हातात बॅटरी, वॉकीटॉकी असलेला खाकीवाला अंगावर धावला.
"क्या है? रिझर्व्हेशन है क्या?"
"रिझर्व्हेशन तो नहीं है, पर उधर जनरल में पैर भी रखने के लिये जगह नहीं है.."
"वो कुछ भी हो, अंदर नहीं जानेका.."
"झक मारने के लिये टिकट बेचते क्या फिर? जितने लोग बैठ सकते उतनेही टिकट बेचने के ना.."
"चल तु अंदर चल, बताता तुझे.."
रेल्वेने हॉर्न देऊन गती पकडली होती. मी सेकंड क्लासच्या डब्यात शिरलो होतो आणि रेसुबवाला कुणालातरी बोलावत होता -
"देखो, ये जेम्स बॉण्ड क्या कह रहा है..झक मारने के लिये टिकट बेचते क्या... अरे मुंह मे थोडी तो मिठास रखा करो.."
"मै आपको नहीं कह रहा था... रेलवे को कह रहा था.."
"कुछ भी केस बना के मै तुझे कहीं भी भेज सकता अब"
"ओके"
"क्या ओके.. जरा अच्छे से बात करना सिखो.." वगैरे बोलून त्याचा ताव जिरला. मग नंतर वॉकी-टॉकीवरून रेल्वेच्या ड्रायव्हरशी त्याचे बोलणे सुरू झाले. "देढ घंटा लेट हो चुका है.. क्रॉसिंग के लिये मत रूको..इ.इ." थोड्यावेळाने इस जॉब में कितना टेन्शन होता है, किधर रहते तुम अशा गप्पा करू लागला. मी आपला मांडी ठोकून डोळे मिटून बसलो. थोड्या वेळाने बर्थवरच झोपी गेलो.
आठ वाजता जाग आली ती शेजारून जाणार्या लोकल्सचे हॉर्न आणि सुईंऽऽऽ..सुईंऽऽऽ आवाजानं. रेल्वेमधील गर्दी ओसरली होती. थोड्यावेळाने सीएसटी आले. उतरलो आणि हार्बर लाईनचे सीबीडीपर्यंत तिकीट काढले. फोर्ट भागात जाऊन मस्त चहा, सिगारेट मारून आलो. तिकीट पाहिले तर त्यावर "एक घण्टे के भीतर प्रयोग करें" लिहीले होते. मग पटकन हार्बर लाईनच्या एका लोकलमध्ये शिरलो. लोकल कसली ती? एका स्टेशनहुन दुसर्या स्टेशनपर्यंत अविश्रांत मागे पुढे होत असणारी अजस्र यंत्रेच ती. मुंबई या शहराला फुटलेले लोखंडी हात. मस्जिद, सॅण्डहर्स्ट रोड, मानखुर्द वगैरे स्टेशने झाल्यावर पाऊण तासाने बेलापूर सीबीडी आले. ती इमारत फार मस्त आहे.
नऊ वाजत आले होते. पण आता करायचे काय? आसपास कुणी ओळखीचे नव्हतेच. मित्र होता तो सानपाड्याला. मग पुन्हा एकदा चहा, सिगारेट मारली. पैसेही संपत आले होते. शेवटी सीबीडी भाग काय भानगड आहे ते पाहाण्यासाठी एक चक्कर मारून आलो. पण आधीच ठणकत असलेल्या शरीरावर उगाच आणखी भार टाकावा वाटेना. सीबीडीसमोरच्या चौकात बसून राहिलो. सीबीडीतून नुसते लोकांच्या गर्दीचे लॉट वर लॉट (लाटांवर लाटा) बाहेर पडत होते आणि रस्त्याने कुठेतरी वाहात जात होते. काल सोडून आलेल्या मित्रांना, मुंबईतील इतर मित्रांना, घरी थोडी फोनाफोनी करीत अकरा वाजेपर्यंत टाईमपास केला.
बरोबर अकरा वाजता मैत्रिणीचा कॉल आला -
"रिक्षात बस आणि सेक्टर ********* मधल्या ********* कॉलेजमध्ये ये..."
रिक्षात बसून ते सेक्टर गाठले. उंचच उंच इमारती. कशाचा काही पत्ता नाही. काही कळत नाही.
थोड्यावेळाने ती रिक्षासमोर आली. मग मुंबईस्टाईल हॅण्डशेक. तिलाही रिक्षात घेतले. तिच्या पायाच्या बोटाला बॅण्डेज बांधले होते आणि तिला नीट चालताही येत नव्हते. मी तिला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहात होतो आणि मला ती. तसाही आठ-दहा तासांच्या प्रवासानं माझा अवतार पाहाण्यासारखाच झाला होता. बट चलता है.
"आय अॅम व्हेरी सॉरी आय मेड यू वेट... वी वील लन्च निअरबाय...कम..हिअर इज दॅट हॉटेल..गेट डाऊन.."
"आय अॅम एक्झॉस्टेड..यू पे हिम नाऊ.." मी
"येस.. कीप धीस फॉर यू टू.. " रिक्षाचे बील देऊन मलाही ती पैसे देऊ लागली.
"नो.नो. वी वील सी लेटर..." मी
"ओके." ती.
जवळच्याच मोठ्या इमारतीत एका गाळ्यात चालणार्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो.
"डीड यू रिमूव्ह दॅट नेल फ्रॉम टो ?? रिमूव्ह दॅट बॅण्डेज..आय वॉण्ट टू सी दी इन्ज्युरी.. "
"डू यू फील आय हॅव नो इन्ज्युरी देअर, अॅण्ड ओन्ली टू ब्रिंग यू टू मुंबई आय अॅम प्लेईंग धीस गेम? डॉक्टर सेड वी वील सी, इफ इट गेट्स हील्ड इट्स ओके. इफ नॉट, देन वी वील हॅव टू रिमुव्ह इट.." असं म्हणून ती मला चापट्या मारू लागली.
"हा:हा:हा:...डोण्ट वरी, इव्हन इफ यू कट यूवर नोज, दे कॅन रिप्लेस इट वीथ न्यूअर वन..दे कॅन डू एनिथिंग यू वॉंट..." हा:हा:हा:
"हा:हा:हा: बट नेल्स आर नॉट अव्हायलेबल फॉर सर्जरीज अॅण्ड आय वूड नॉट लाईक टू लूज माय ओन..हाऊ हॉरिबल इट वील बी..ए टो विदाऊट नेल.."
"डोण्ट वरी, इट वील गेट अॅटोमॅटीकली हील्ड..यू वील नॉट लूज इट.."
तेवढ्यात तिचे मित्र-मैत्रिणी आल्या. मग ओळख करून-देणे-घेणे झाले.
"धीस इज यश. ही इज हिअर टू सी मी फॉर दि फर्स्ट टाईम.."
"नाईस टू मीट यू.."
"सीम्स सो.."
तेवढ्यात दिलेली खाण्याची ऑर्डर आली. सूप, फ्राईड राईस (यक्क्क!!!), कॉफी.
मी आपला रानटी माणूस. टेबल मॅनर्स आपल्या गावीही नाही. पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लाऊन पाणी पिले आणि खाली ठेवला तर मैत्रिणीने तिथेच क्लास घ्यायला सुरूवात केली. आपण काय आजन्म विद्यार्थी. शिकव म्हटले बाई तुला पाहिजे ते.
"हे बघ, असा ग्लास उचलून पाणी पिताना ते ओठांवर दिसू द्यायचे नाही..हळूच ओझरता तोंडाला लावायचा..नकळत पाणी आत घ्यायचे आणि हळूच ठेवायचा"
"ओक्के..बघ..असं का?"
"जमलं..जमलं.."
"चलो, आता सगळंच तुझ्याकडून शिकून घेतो.."
"येस..वी वील गो टू जावेद हबीब टूडे..यू हॅव ग्रोन युवर हेअर्स टू मच, लूक अॅट युवर ड्रेस...धीस इज एम्बॅरेसींग..व्हॉट काईंड ऑफ कॉम्बिनेशन इज इट? "
"हे..आय अॅम ऑल दी वे अप, विदाऊट बाथ फॉर लास्ट ट्वेंटी एट अवर्स ..बिफोर दॅट आय वॉज ट्रॅव्हलींग ऑन टू व्हीलर इन सम कंट्रीसाईड डस्ट.."
"ओके.ओके. सॉरी. आय मेड यू कम हिअर इन सच कण्डीशन. आय अॅम फीलींग सॉरी."
"हम्म.. नथिंग टू से सॉरी अबाऊट..आय हॅव गॉट ए टीचर हु पेज माय एव्हरी बील फॉर दी डे..."
"फिनीश धीस सूप अॅण्ड फ्राईड राईस.."
"ओन्ली सूप, दॅट राईज इज डिस्गस्टींग..टेस्टेड फर्स्ट टाईम इन लाईफ.."
"ओ! आय सेड यू टू ऑर्डर सम्थिंग..अॅण्ड व्हाट इज धीस? व्हाय युवर हॅण्ड इज शीव्हरींग?"
"दॅट्स अॅन इफेक्ट ऑफ स्मोकींग कॉन्स्टंट्ली... सम काईंण्ड ऑफ डिसॉर्डर इज इन दी मेकींग इन माय बॉडी.."
"बिफोर कमिंग टू मी, यू स्मोक ना? दॅट्स व्हाय स्मेल इज देअर.. स्टॉप स्मोकींग..."
"हे...व्हाट डू यू एक्स्पेक्ट मी टू डू व्हेन आय वॉज वेटींग देअर फॉर टू अवर्स?"
"सी, आफ्टर फिनीशींग लन्च, वी वील गो टू कॅफे कॉफी डे बाय रिक्शा...यू इट समथिंग ऑफ यूवर चॉईस देअर.."
"लूक, आय अॅम फर्स्ट टाईम एक्स्पोज्ड टू दी लाईफ इन मुंबई...आय वील कीप यू एम्बॅरेसींग ऑल दी टाईम व्हेरेव्हर वी गो..आय डोन्ट नो ए थींग अबाऊट एनीथींग.."
"डोण्ट वरी..बी अॅज यू आर...इव्हन आय डोन्ट गीव्ह ए डॅम टु व्हाट अदर्स से अबाऊट मी..एव्हरीथिंग इज वेल अॅण्ड फाईन.."
"हम्म्म..."
मग लंच, कॉफी वगैरे करून बाहेर पडलो. रिक्षा पकडून लगेच कॅफे कॉफी डे गाठले. चकचकीतपणा. आरामदायक सोफे. ए.सी. तत्पर वेट्रेसेस. मग यू ऑर्डर, नो, नो यू ऑर्डर झाले. शेवटी तिने तिच्या आवडीचे सीझल डॅझल ब्राऊनी आणि मी माझ्यासाठी एक्स्प्रेसो मागवली.
"दॅट एक्स्प्रेसो इज व्हेरी बिटर..आय वुड लाईक टू व्हीडीओ टेप यूवर एक्स्प्रेशन्स आफ्टर यू ड्रींक इट.. "
"आय वॉन्ट टू नो व्हॉट दॅट एक्स्प्रेसो इज ऑल अबाऊट.."
"डोण्ट टेक इट, इट इज व्हेरी बिटर..एव्हरी न्यू पर्सन टेस्टींग इट लिव्हज इट हाफवे.. "
"आय वील नॉट... दॅट चॉकलेट यू गेव्ह मी, आय वील ईट इट आफ्टर एक्स्प्रेसो.."
"सी टू यूवर राईट साईड..यू वील नो व्हॉट कॅफे कॉफी डे इज ऑल अबाऊट... डोण्ट एम्बॅरेस देम..सी अॅज इफ यू आर नॉट सीईंग परपजफुली.."
काय आहे म्हणून बघु लागलो तर उजव्या बाजूच्या टेबलवर एक जोडपे एकमेकांना बाहुपाशात घेऊन कॉफीपान करीत होते.
"हे..शी सेन्स्ड इट व्हेन आय सीन देम.."
"व्हॉट?"
"शी, दॅट गर्ल बिकेम अवेअर अबाऊट यू आर सेईंग मी टू लूक अॅट देम...आय सीन इट इन हर आईज.."
"हा:हा:हा: नो इश्यूज.."
मग ती ब्राऊनी, एक्स्प्रेसो वगैरे झाल्यावर माझे डोळे आपोआप झाकू लागले होते. आता शरीराने असहकार पुकारला होता. पूर्ण आराम हवा होता. तो मला मिळणार नव्हता.
"यू नो हिअर दे प्रोव्हाईड दॅट हुक्का अॅण्ड टकीला टू..." ती
"हाऊ मच दे चार्ज फॉर हुक्का??" मी
"डोण्ट नो. बट मे बी फाईव्ह हंड्रेड..." ती
"व्हॉट? ए ब्रॅण्ड न्यू हुक्का विथ टोबॅको इज वर्थ सेव्हन हंड्रेड रूपीज...आय हॅव सीन इट समव्हेअर.." मी
"बट आय वॉण्ट टू टेस्ट इट..हाऊ डज इट टेस्ट लाईक?" ती
"जस्ट वेट, वी वील गो आऊट. व्हाईल आय स्मोक, आय वील गीव्ह यु माय सिगारेट..इट टेस्ट्स जस्ट लाईक ए सिगारेट...नीड नॉट टू बरी फाईव्ह हंड्रेड रूपीज.." मी
"लूक, वी कान्ट गो एनीव्हेअर बिकॉज ऑफ माय इन्जुरी..बट आय वील शो यू दि बे वॉटर, इट इज निअरबाय..वील इट डु?" ती
"आय अॅम हिअर टू बी विथ यू फॉर समटाईम, टू सी अॅन इन्जुअर्ड पर्सन...डोण्ट मेक इट ए बीग थींग..वी वील गो व्हेरेव्हर यू वॉण्ट.. " मी
मग जवळच्याच खाडीकडे गेलो. खाडीच्या कडेने बांधलेल्या फ्लोअरवर अनेक जोडप्यांचे गुटर्गुं चालले होते आणि रिकामी पोरंही तिथे घिरट्या घालत होती.
मग अनंत विषयांवर आम्ही तिथं बोलत बसलो. मध्येच सिगारेट पिली. तिलाही सिगारेट पिऊन बघायची होती. पिऊ नको म्हणण्यापेक्षा पिऊन बघ आणि प्यायची की नाही ती तिचे ठरवेलच म्हणून सिगारेट कशी प्यायची ते तिला शिकवू लागलो.
"बघ, आधी नुसती हलक्या ओठाने पकडायची..ओली होऊ द्यायची नाही.. मग पेटलेली काडी सिगरेट समोर येताच तोंडाने हळूच हवा आत ओढायची... मग हळूच धूर आतपर्यंत जाऊ द्यायचा, फुफ्फुसांत गेलेला धूर नाकातून बाहेर पडतो.. सुरू झाले स्मोकींग.. "
"हं.. दे माझ्याकडे.." असं म्हणून तिने घेतलेल्या पहिल्याच झुरक्यात जो ठसका लागला की तिला काय झाले कुणाला माहीत पण तिने पटकन सिगारेट माझ्याकडे दिली.
"डोण्ट स्मोक बिफोर मी एव्हर..इट इज डिस्गस्टींग..आय थॉट इट इज सम्थिंग फनी.."
"ओके. बट यू हॅव बिकम अॅक्टीव्हली पॅसिव्ह स्मोकर ऑलरेडी सीटींग विथ मी.. डोण्ट शाऊट नाऊ..लेट मी स्मोक.. "
तिने माझ्या खिशातून दुसरी सिगारेट काढून खाडीच्या पाण्यात फेकून दिली.
"हेऽऽऽ एव्हरीथिंग गोईंग ऑन बिट्वीन अस सीम्स टू बी पर्फेक्टली फीटींग फॉर ए लव्ह स्टोरी..आय अॅम गोईंग टू राईट धीस अॅज इट इज फॉर माय ब्लॉग.."
"व्हाय डू यू फील ऑल दी टाईम दॅट आय लव्ह यू? आय डोण्ट लव्ह यू! डू व्हाटेव्हर यू वॉण्ट अॅण्ड राईट एनिथींग..इट डझन्ट मॅटर..इफ यू पेण्ट मी अॅज बॅड, आय वील कीक यू.."
"आय नो दॅट. आय नो वी डोण्ट लव्ह इच अदर. आय अॅम नॉट गोईंग टू पेंट एनिथिंग बॅड ऑर गुड..आय वील जस्ट राईट व्हाटेव्हर इज गोईंग ऑन.."
"टेक धीस फाईव्ह हंड्रेड रूपीज.. यू वील नीड इट फॉर यूवर रिटर्न टिकेट.. "
"व्हाट इज हरी? वी वील सी लेटर.. आय नीड ओन्ली वन हंड्रेड अॅण्ड ट्वेंटी रूपीज..."
"इडियट.. व्हाट यू वील डू इन अर्जन्सी?.. यू हॅव नॉट एट मच.. यू वील नीड टू इट समथिंग.."
"ओके. थॅंक यू " मी ते पाचशे रूपये पाकीटात ठेऊन दिले.
"हे कम हिअर.. आय वॉण्ट टू शो यू समथिंग.."
खाडीवर एक लहानशी जेट्टी बांधलेली होती आणि तिथे मासेमारी करणार्या अनेक होड्या उभ्या होत्या. दुपार झालेली असल्याने सापडलेले मासे घेऊन ते लोक परतत होते.
"आस्क हीम इफ ही कॅन गिव्ह ए राईड इन दॅट बोट.." ती
"धीस इज मुंबई डिअर, नॉट कश्मिर.. ही वील नॉट गिव्ह... दे आर नॉट ए बोटींग क्लब.. दे आर फिशरमेन.. इट इज डेंजरस.." मी
"यू जस्ट गो अॅण्ड आस्क इडियट" ती
"इफ वी सीट इन्टू दॅट बोट, वी वील स्टार्ट शीव्हरींग..बोट वील सींक इन्टू बे वॉटर.. लाईक टायटॅनिक मुव्ही.. अॅण्ड दॅट विल बी एण्ड ऑफ अवर स्टोरी..फिनीश!!" मी
"आय नो, यू आर नॉट गोईंग टू सेव्ह मी व्हेन बोट इज सिंकींग.." ती
"आय वील सेव्ह यू मॅडम, बट फर्स्ट आय हॅव टू सर्व्हाईव्ह ना?? " मी
"यू नो, वी यूज्ड टू गो टू एलिफंटा केव्हज बाय धीस बोट्स.."
"दे स्टॉप्ड गोईंग देअर बिकॉज ऑफ रिसंट टेररिस्ट अटॅक्स ऑन मुंबई..दॅट्स व्हाय ही इज सेईंग नो.."
"व्हाट टू डू नाऊ? कम, वी वील गो टू कॅफे कॉफी डे अगेन.. "
"येस, आय हॅव टू फाईण्ड ए वॉशरूम समव्हेअर... दॅट एक्स्प्रेसो इज डान्सींग इन माय स्टमक नाऊ.. हेऽऽ शूड आय गो इन धीस मॅंग्रुव्हज..?"
"इफ यू गो टू पी इन ओपन, आय वील नॉट गिव्ह यू एनी पहचान.. इडियट.."
"देन कम, वी हॅव टू गो इन कॅफे कॉफी डे... इफ माय ब्लॅडर रीचेस इट्स लिमीट ऑफ ३५० एमएल...इट वील नॉट आस्क माय परमिशन.. "
"हा:हा: हा:..कम क्वीक्ली..."
पोटात गेलेल्या एक्स्प्रेसोला पुढच्या मुक्कामी पाठवावे लागणार होते. पण सीसीडी मध्ये गेलो तर नेमकी त्यांची वॉशरूम बंद..आऊट ऑफ ऑर्डर..
"डू यू वॉण्ट एनिथींग? ए सेकंड एक्स्प्रेसो ऑर समथिंग?"
"आय अॅम नॉट इन कंडीशन टू कंन्ज्युम ए ड्रॉप ऑफ एनिथींग...नो एक्स्प्रेसो फॉर वर्ल्ड्स... जस्ट वी हॅव टू फाईंड अनादर बाथरूम.."
"प्लीज गो आऊट समव्हेअर अॅण्ड बी फ्रेश.."
"ओके.."
बाहेर आलो तर खाडीच्या पूर्ण भागात इकडे तिकडे लोक बसलेले, उंचच उंच इमारती. या लोकांना एवढ्या चांगल्या भागात मुतार्या बांधायला काय लाज वाटते की काय? रस्त्याच्या त्या टोकापर्यंत गेलो तरी जागा सापडेना. आमच्या शेजारच्याच टेबलावर बसलेली दोन पोरे बाहेर येऊन खाडीशेजारी टाकलेल्या पाईप्सवर कार्यक्रम उरकून घेत होती. पण ती मुंबईची होती. मी मुंबईचा नव्हतो. मला तसे करावे वाटेना. मी परत आलो.
"व्हाट हॅपन्ड? आर यू ओके?"
"नो. देअर इज नो प्लेस टू गो. आय फील ऑकवर्ड. डोण्ड वरी आय कॅन कंट्रोल.."
"ओह माय गॉड, लेट मी फिनीश धीस केक..वी वील गो इन डॉमीनोज.. यू फिनीश इट देअर.."
"ओके... बट प्लीज हरी अप.."
"हंम्म.. स्पीक समथिंग.."
"नॉट ए वर्ड प्लीज.."
अशा वेळी अडचणी पण अगदी ठरवून आल्यासारख्या येतात. सीसीडीच्या काऊंटरवर बील देताना नेमकी त्यांच्याकडे पाचशेची चिल्लर नव्हती. त्यात अजून दहा-पंधरा मिनीटे गेली.
"कम, डॉमीनोज इज निअरबाय... वी वील गो देअर.. "
शेवटी डॉमिनोजमध्ये पोहोचलो. पटकन जर्कीन खुर्चीवर फेकून मी वॉशरूम मध्ये शिरलो. वॉव!! व्हाट ए रिलीफ~!!!!!
"आर यू ओके नाऊ?" ती
"येस. कंप्लीटली रिलीव्हड.." मी
"डू यू वॉण्ट एनिथींग? मे बी पिझ्झा?" ती
"नो थॅंक्स. आय वॉण्ट नथिंग मच.." मी
"टेस्ट धीस चोको लाव्हा... आय हॅड डू ऑर्डर समथिंग हिअर टू... बिकॉज ऑफ यू ओन्ली.. " ती
"टेस्ट्स गुड.. " मी
"स्पीक समथिंग..." ती
"व्हाट टू स्पीक? एव्हरीथींग इज सेड. अनसेड इज सेड अॅण्ड अनडन इज डन..." मी
"आय फील आय शूड कीक यू नाऊ...स्पीक समथिंग.." ती
"व्हाय यूवर मूड इज सडन्ली चेंज्ड? बिकॉज वी हॅव टू डीपार्ट?" मी
"नो रे.. नथिंग लाईक दॅट... बट से समथिंग.." ती
"आय लव्ह यू.." मी
"आय नो दॅट... बट आय डोण्ट लव्ह यू.." ती
"डझण्ट मॅटर.." मी
आता उन्हं कलली होती. परत निघायचे की थांबायचे ते ठरवावे लागणार होते. पुन्हा रात्रभर मित्राकडे थांबलो तर मॅडमला पुन्हा एक दिवस लेक्चर्स बंक करावी लागणार होती.
"सो..हाऊ वॉज यूवर डे?" ती
"बियॉण्ड एक्सप्रेशन..मेमरीज लाईक धीस वन गेट्स फेड विथ टाईम..आय वॉण्ट टू फ्रेम देम इन्टू वर्ड्स..अॅज इट इज... आय वील राईट इट ऑन माय ब्लॉग..डोण्ट नो इफ इट वील रिफ्लेक्ट हाऊ आय अॅम फीलींग वील ऑर नॉट.. " मी
"व्हेअर इज बेलापूर स्टेशन?" मी
"इट्स निअरबाय.. कम वी वील गो.." ती
"आय अॅम सॉरी, यू हॅव टू वॉक विथ यूवर इन्ज्युअर्ड टो.. शूड वी फाईण्ड ए रिक्षा? "
"सो, आर यू गोईंग टू टेक मी ऑन यूवर बॅक? इट इज निअरबाय ऑन वॉकींग डिस्टन्स"
"आय नीड वन मोअर सिगारेट.." मी
"नॉट इन फ्रंट ऑफ मी.. इट इज डिस्गस्टींग.." ती
"ओके..ओके.. सॉरी.." मी
"गेट रीड ऑफ इट कंप्लीट्ली प्लीज.." ती
"आय वील स्टॉप.." मी
बेलापूर सीबीडी आले. पुन्हा तीच गर्दी. तीच धावपळ. तिकीट काऊंटरवर भली मोठी रांग लागली होती. तिनेच जाऊन तिकीटे आणली.
"व्हाट आर यू डुईंग?" मी
"धीस इज पंचींग मशीन.. वी नीड टू पंच ब्लॅंक टिकेट्स फॉर ट्रॅव्हलींग डिस्टन्स.. "ती
"वेट्ऽऽऽ आय वॉण्ट टू नो हाऊ इट इज डन.." मी
"लुक, फ्रॉम हिअर सीएसटी टिकेट इज ट्वेल्व्ह रूपीज.. वी वील पंच थ्री टिकेट्स ऑफ फाईव्ह, फाईव्ह अॅण्ड टू.. " ती
"अॅमेझींग.." मी
"हरी अप.. इट्स यूवर ट्रेन... ऑन दी प्लॅटफॉर्म..शूड आय कम अप विथ यू " ती
"येस यू हॅव टू कम..यू हॅव टू गिव्ह मी ए डीपार्टींग कीस.."
"नो.. आय अॅम नॉट..."
"ओके देन..बाय बाय.."
"बाय...लेट मी नो इफ यू आर गोईंग ऑर स्टेईंग.."
"ओके..आय वील कॉल यू.."
"बायऽऽऽऽऽ"
"बायऽऽऽऽऽ"
पुन्हा एकदा त्या अजस्त्र लोकल्सचा खडखडाट, पुन्हा एकदा ती मानखुर्द, गोवंडी, मस्जिद, सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन्स आणि शेवटी सीएसटी!
पुन्हा तेच पुन्हा तेच!
अफेअर विथ मुंबई!