प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान म्हणजे एक सुखद अनुभव असतो. काळा कोट (टाय शिवाय), पांढरी प्यांट आणि पायात बाटाच्या साध्या चपला अशा पोषाखात प्राचार्य माईकसमोर उभे राहतात आणि "बंधुभगीनींनो" या संबोधनाने किंवा अगदी थेट ते विषयाला हात घालतात. व्याख्यानापुर्वी केले जाणारे यांना हार घालणे, त्यांची ओळख करुन देणे, यांनी थोडे बोलावे असले सोपस्कार त्यांना आवडत नाहीत. एकदा पैठणला त्यांचे व्याख्यान होते. कुठ्ल्याही सोपस्काराशिवाय त्यांचे व्याख्यान सुरु झाले. ते त्यांना फ़ार आवडले. "पाहुण्यांनी उठावे, आणि दीपप्रज्वलन करावे, आता पाहुण्यांनी आसन ग्रहण करावे, आता पुन्हा एकदा उठुन थोडे हलावे" असे सांगुन सुत्रसंचालक व्याख्याता म्हणुन आणलेल्या पाहुण्याला काही कळतच नाही असे समजत असतो असा शेरा मारुन त्यांनी टाळया घेतल्या होत्या. व्याख्यानाचा विषय असावा अशीही त्यांना गरज वाटत नाही. उठुन सरळ माईक समोर उभे राहावे आणि आपल्या विचारांना मोकळे होऊ द्यावे, एकापाठोपाठ विचार येत राहातात, व्याख्यान फ़ुलत राहाते अशी त्यांची धारणा.
त्यांच्या व्याख्यानात एक प्रवाहीपणा आहे. प्राचार्य बोलत राहातात, कधी ते श्रोत्यांना मधुनच एखादा बोलण्याच्या ओघात आलेला किस्सा सांगुन हसवतात. बहुतांशी वेळा "व्याख्यान" याच विषयापासुनच ते बोलायला सुरुवात करतात. त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांनी कुणा-कुणाची व्याख्याने ऐकली, त्यांची वैशिष्ट्ये आणि अभ्यासविषय ते नमुद करतात.
प्राचार्यांची शैली एवढी मोहक की त्यांची व्याख्याने ऐकुन त्याच शैलीत भाषण करणारे अनेक हौशी "भाषण बहाद्दर" पहाता येतील. एकदा मी त्यांचे भाषण ऐकुन भारावलेल्या अवस्थेत त्यांना एक पत्र पाठवले होते. हे पत्र मी टाईप केले होते. पत्रोत्तर येईल अशी मला निश्चित आशा होती. पण ते आले नाही. फ़ोनवरुन बोलताना त्यांनी सांगितले की, "पत्र स्वत:च्या हाताने लिहावे (क्रमश:) ."
६ मार्च, २०१०
प्राचार्य शिवाजीराव भोसले
लेखन सूत्रे:
प्राचार्य शिवाजीराव भोसले,
शिवाजीराव भोसले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
jabardast re mitra....khupch chhan lihile aahes. nuktech siranche Deepstambh he pustak mi vachle aani tyanchya lekhan shaili aani shabd fulani bahrun gelo. ji vyakti itki changli lihu shakte tyache vakrutv kharech khup bahardar asel yachi khatri patte.
उत्तर द्याहटवाPrachary shivajirav bhosle yana vinamr abhivadan.
-Naresh Jadhav.
धन्यवाद नरेश!
उत्तर द्याहटवाआपल्या करंट्या राज्यकर्त्यांनी प्राचार्यांचे ऋण कधीच मान्य केले नसले आणि त्यांचा यथोचित सन्मान केला नसला तरी, त्यांचे वक्तृत्व आणि लेखन वाचलेल्या प्रत्येक मराठी तरूणाच्या मनात प्राचार्यांची चिरंतन छबी उमटते.
कळसूत्रांतील प्राचार्य, शिवाजीराव भोसले या शब्दावर क्लिक केल्यास मी केलेले आणखी थोडेसे लिखाण आणि प्राचार्यांच्या व्याख्यानाची लिंक तुम्हाला या ब्लॉगवर मिळू शकेल.
Mala Shivajirao bhosale yanche sahiyta far far aavadate
उत्तर द्याहटवा