भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे.
मूळ नाव बालाजी जनार्दन भानू असलेले नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे. ब्रिटीश राजमध्ये मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे नानासाहेब फडणविसांच्या मुत्सद्देगिरीचे यश मानता येईल. नाना फडणवीस १३ मार्च १८०० रोजी वारले.
त्यांच्या मृत्युनंतर भारताचा तत्कालीन गवर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने नानाबद्दल ""the able minister of Peshwa state, whose upright principles and honourable views and whose zeal for the welfare and prosperity, both of the dominions of his own immediate superiors and of other powers, were so justly celebrated" हे उद्गार काढले होते.
सोथबीने विकायला काढलेले चित्र त्यांच्या संकेतस्थळावरून: http://www.sothebys.com
चित्राची किंमत ७०,००० पौंड अपेक्षित आहे.
बातमी सौजन्य : ईटी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा