८ एप्रिल, २०१०

गांधीचे व्हल्गरायझेशन: म.टा. आणि मिड डे चा हलकटपणा

जेड एडम्स नावाच्या इंग्लिश इतिहासकारानं नुकतच "गांधी, नेकेड एम्बिशन" नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही झाली सर्वसामान्य बातमी.
म.टा. आणि मिड डे या वर्तमानपत्रांनी हीच बातमी अर्धनग्न महिलांच्या फोटोजच्या शेजारी गांधीचं चित्र दाखवून प्रकाशीत केली आहे. महाराष्ट्र टाईम्स आणि मिड डे च्या ई-आव्रुत्तीच्या संपादकांनी सनसनी निर्माण करण्यासाठी मस्तवालपणाचा कळस गाठला आहे.
राष्ट्रपिता गांधी यांना "झणझणीत वेब मसाल्याचा" विषय करून म.टा. ने पुन्हा एकदा आपली लायकी सिध्द केली. म.टा. च्या दररोज चालणा-या नागव्या प्रदर्शनाबद्दल नुकतीच हेरंबच्या "वटवट सत्यवान" या ब्लॊगवर त्याने म.टा. ला लिहीलेले अनाव्रुत्त पत्र वाचनात आले होते. पत्रकारीतेच्या नावाखाली स्वत:च्या मलीन मनाचे प्रदर्शन करणा-या या दोन्ही वर्तमानपत्रांचा धिक्कार असो!!

७ टिप्पण्या:

  1. आणि हे लोक नुसत्या नागव्याच बातम्या देतात असंही नाही. चक्क हेतुपुरस्सर खोट्या आणि लोकांना चुकीचं मत बनवायला भाग पाडणार्‍याही देतात. मागे त्या संबंधीही लिहिलं होतं. जमल्यास वाचा.

    http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_16.html

    उत्तर द्याहटवा
  2. यशवंत महोदय,एक सामान्य नागरीक म्हणून काय करू शकतो आपण? पेपर वाचणं बंद करायचं? अहो एकदा मी एका पेपरच्या संपादकाना लिहिलं कि ज्यामुळे समाजात विध्वंस वाढीस लागणार नाही अशा--जसे जाळपोळ,लुटालूट,बलात्कार, खून ,दरोडे-- बातम्याना पहिल्या पानावर स्थान देऊ नका.त्याऐवजी विकास कामे,शोध,संतसज्जनाची बोध-वचने,समाजातील हयात उत्तुंग व्यक्तिमत्वे आणि त्यांचे काम,अशा गोष्टीनाच पहिल्या पानावर स्थान द्यावे.पण हे ऐकणार कोण ?
    आमच्या श्रद्धा स्थानावर शिंतोडे उडवण्याचा याना काय अधिकार?
    http://savadhan.wordpress.com

    उत्तर द्याहटवा
  3. अनामित महोदय,
    गांधी हे माझे श्रध्दास्थान आहे म्हणून वरचा खटाटोप केलाय असे नाही तर हे लोक संधी मिळाली तर राष्ट्रपिताच काय पण स्वत:च्याही बापाला सोडणार नाहीत हे दिसले. आणि श्रद्धास्थानं वगैरे बाळगायचा हा जमाना आहे का राव? रोज तुमच्या श्रद्धास्थानावर पडलेले शिंतोडे साफ करीत बसावं लागेल :)

    उत्तर द्याहटवा
  4. सगळे मिडीया वाले टुकार झाले आहेत. म.टा. तर पूर्णतः बाष्कळ पेपर झालाय. सध्या पेपर वाचायचाच कशाला??? हा प्रश्न पडतो. वाचण्यायोग्य काहीच नसत.

    उत्तर द्याहटवा
  5. फक्त एक निरर्थक सवय ! तुम्ही पहा ना जरा, एकदा वाचुन झालेला पेपर लोक पुन्हा-पुन्हा, पार ब्रम्हदेवानंच पेपर छापल्यासारखा वाचत असतात.

    उत्तर द्याहटवा
  6. माझं गांधींबद्दल काही चांगला मत नाही आणि त्यांच्या अनेक गोष्टींविषयी माझे आक्षेप आहेत, पण कुठल्या पातळीला जावे ह्याला काही मर्यादा असतात, ज्या मटाने केव्हाच सोडल्यात.

    उत्तर द्याहटवा
  7. गांधीजी समजण्यासाठी आधी त्यांना अभ्यासायला हवं ना? पुर्वग्रहदुषित मनानं कशाला लिहावं? सारं जग त्यांना आदराचं स्थान देतंय,जेव्हा तसं आपल्याला मिळेल तेव्हाच आपण त्यांच्यावर टीका करू शकू अन्यथा नाही असं मला वाटतं.

    उत्तर द्याहटवा