१० एप्रिल, २०१०

राष्ट्रपित्याचे कामजीवन




गांधीचे व्हल्गरायझेशन: म.टा. आणि मिड डे चा हलकटपणा या ८ तारखेच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर लिहीत असताना ती लांबली आणि ही नवीन स्वतंत्र पोस्ट तयार झाली.
जेड अ‍ॅडम्सने नावाच्या इंग्लिश इतिहासकारानं नुकतच "गांधी, नेकेड एम्बिशन" नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. यात गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वत:चे कामजीवन असमाधानकारक असेल तेव्हाच इतरांच्या कामजीवनात डोकावून पाहाण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि यासाठी एखाद्या देशाचा राष्ट्रपिता मिळाला तर जेड अ‍ॅडम्स सारख्या इतिहासकाराचे खिसेही भरले जातात.
ज्ञात आहे त्या माहितीनुसार गांधीनी त्यांची कामवासना गेलीय की नाही ते फक्त तपासून पाहाण्यासाठी त्यांच्या मनु आणि आभा या दोन भाच्यांसोबत नग्न झोपायला सुरूवात केली होती. नग्न झोपायला सुरूवात केली होती म्हणजे त्या पुढच्याही गोष्टी केल्या असतील असे मानण्याचे कारण नाही (७७ वर्षे या त्यांच्या वयाचा जरा विचार करा).



हा जेड अ‍ॅडम्स नावाचा हरामखोर माणूस नाही त्या गोष्टी उकरून काढुन स्वत:चे खिसे भरतोय.
आजही सेक्स सारख्या विषयाबाबत खुलेपणा राखला जात नाही (रस्त्याच्या कडेला उभं राहून गर्लफ्रेंडचे चुंबन घेणे आणि टि.व्ही.वर अर्धनग्न पोरींचा सुकाळ होणे वेगळे). गांधी त्या काळात त्यावर प्रयोग करीत होते आणि त्याबाबत खुलेपणे चर्चा करायला तयार होते हे सिंहह्रदयी पुरूषाचे लक्षण आहे. याबाबतीत ते नक्कीच राष्ट्रपिता मानता येतील.
जेड अ‍ॅडम्सने महर्षी महेश योगी आणि ओशो यांच्याच तराजूत गांधींना तोलले आहे. जगावर छाप पाडून गेलेल्या भारतीयांनी नेहमीच कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला. ज्याला स्वत:ला जाणून घ्यायचे आहे, सत्यापर्यंत जायचे आहे त्याला नेहमीच कामवासनेच्या अभ्यासाची आणि स्वत:वरील प्रयोगाची पायरी चढावी लागलेली आहे.
गांधींची हत्या झाली नसती तर निश्चितच गांधींनी पुढे स्वत:च्या कामजीवनावर लेखन केलं असतं.
जेड अ‍ॅडम्सच्या या पुस्तकामुळे सर्वच भारतीयांकडे "सेक्स मेनीअ‍ॅक" म्हणून पाहाण्याच्या दृष्टीकोनाला बळ मिळणार आहे.

१० टिप्पण्या:

  1. "जगावर छाप पाडून गेलेल्या भारतीयांनी नेहमीच कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला."
    ----

    श्री कुलकर्णी : वाल्मिकी, कबीर, तुकाराम, टिळक, इन्दिरा गांधी यांच्या 'कामवासनेच्या खोलात शिरण्याच्या' प्रयत्नाबद्‌दल काही माहिती देऊ शकाल का?

    - डी एन

    उत्तर द्याहटवा
  2. मला गांधींबद्दल कणभरही आदर नाही. (पुरेसं वाचन करूनच हे विधान करण्याचं धाडस केलं आहे.).. असो पण मुद्दा तो नाही. स्वतःचा संयम तपासण्यासाठी लोकांच्या व्यक्तिगत कामजीवनाशी खेळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? कमलताई पाध्येंचं "बंध-अनुबंध" (नुकतंच वाचलंय म्हणून ते ठळक लक्षात आहे.) आणि जालावरही अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख सापडतील की गांधीजींनी त्यांच्या शिष्यांना जबरदस्तीने ब्रम्हचर्य स्विकारण्यास कसं भाग पाडलं होतं. आणि हे ही कामवासना, संयम तपासण्याच्या नावावर. एखाद्याच्या अत्यंत वैयक्तिक, नाजूक बाबीबर असा उघड घाला घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? की 'राष्ट्रपिता' आहे म्हणून काहीही करू शकतो?

    उत्तर द्याहटवा
  3. तुमचा आक्षेप नक्की कशाबद्दल आहे? राष्ट्रपित्याच्या कामजिवनाचे संशोधन करणेच चुकीचे आहे की केलेले संशोधन चुकीचे आहे?
    गांधींच्या कामजीवनाबद्दल आतापर्यंत माहित नसलेले तपशील दिल्याचा दावा करण्यात आला आहे.>>> केलेले दावे चुकीचे किंवा पुराव्या अभावी केले आहेत कां? तुम्ही वाचलय का हे पुस्तक? सेक्सबद्दल खुला दृष्टीकोण असायला हव असं पुढच्या वाक्यात तुम्हीच लिहिताय, गांधींनी त्यावर प्रयोग केले याबद्दल कौतुक करताय मग त्यावर एका परदेशी इतिहासकाराने काही खोलात जाउन लिहिलं असेल तर ते तुम्हाला चुकीच का वाटावं हे निटस समजल नाहीये.आणि केवळ अशा पुस्तकांमुळे सर्व भारतीय ’सेक्स मॅनिऍक’ कसे ठरु शकतील पाश्चात्यांच्या दृष्टीने? सर्व भारतीय ’अहिंसक’ आहेत असं कोणी आजवर मानत आलय कां इतकं गांधींबद्दल लिहून आल्यावरही? शिवाय कामजिवनाच्या संशोधनाबाबत या इतिहासकाराने गांधींचे नाव ओशोंसोबत जोदले तर तेही चुकीचे का व कसे ठरु शकते? ओशोंनीही त्यांच्या कुवतीनुसार कामजिवनाच्या खोलात शिरायचेच प्रयोग केले होते नां?
    आपण भारतीय नको इतके संवेदनशिलता दाखवतो राष्ट्रपिते किंवा इतर आयडॉल्स्टीक व्यक्तिंबद्दल आणि उगीच एक विषय देतो मिडियाला चघळायला. कोणीही कशावरही संशोधन करु देत. संशोधन हे शेवटी संशोधन असतं. ते महत्वाचंच असतं. फ़क्त ते चूक की बरोबर केलय यावर टीका करा. ते करणच चुकीच आहे असं म्हणू नका.
    माफ़ करा पण माझ्या मते ही ऍटीट्यूड चुकीची आहे म्हणून लिहिलं. Please do not take it personally.

    उत्तर द्याहटवा
  4. अनामित,
    तुम्ही उदधृत केलेल्या वाक्याच्या पुढचेही वाक्य वाचा. आणि वाल्मिकी, कबीर, तुकाराम, टिळक, इन्दिरा गांधी यांनी कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही !

    उत्तर द्याहटवा
  5. हेरंब,
    गांधींबद्दल आदर-अनादर हे मुद्दे बाजुला ठेऊन मी ही पोस्ट टाकलीय. गांधींना त्यांचे अनुयायी गुरूच्या भूमिकेतून पाहात असत. असा माणूस तुमच्यासमोर असतो तेव्हा तुम्ही कितीही टाळले तरी त्याच्या तत्वज्ञानाच्या आहारी जाताच-जाता, त्यामुळे त्यांना अधिकार देण्याचा प्रश्न नाही.

    उत्तर द्याहटवा
  6. शर्मिला,
    माझा आक्षेप पाश्चात्य लोकदेखील कामवासनेसारख्या विषयाला समजुन न घेता केवळ कामवासनेसारख्या विषयाबद्दलच्या उत्सुकतेचे भांडवल करून लिखाण करतात त्याबद्दल आहे. ते असे लिखाण करू शकतात कारण आपण आपली तोंडे बांधलेली ठेवतो आणि त्याबद्दल चर्चा करायचे टाळतो. सेक्सबद्दल खुला दृष्टीकोन असायला हवा, भांडवल करण्याचा नव्हे. जेड अ‍ॅडम्सच्या लिखाणाला संशोधन कशाला मानायला हवे? कुणी काहीही तपशील गोळा करून त्याचा हवा तसा अर्थ लावत असेल ते चुकीचेच नाही का?
    ओशोंनी कामजीवनाच्या खोलात शिरायचे प्रयत्न केले होते - पण गांधींचे खोलात शिरणे आणि ओशोंचे खोलात शिरणे यात जमीन आसमानचा फरक आहे. गांधींचा दृष्टीकोन दमनाचा आहे - म्हणजे तरूण मुलींसोबत नग्न झोपायला ते तयार आहेत पण पुढच्या गोष्टी ते निषिध्द मानतात. ओशोंचा दॄष्टीकोन तर जगजाहीर आहे.
    तुमचे म्हणणे पर्सनली घेण्याचा संबंध नाही, उलट मी तुमचेच आभार मानतो.

    उत्तर द्याहटवा
  7. श्री कुलकर्णी : ब्लॉगलेखक त्यांच्यावरली टीका पहिले थोडी सहन करतीलही, पण नन्तर काही वेळानी जास्त टीका बाहेरच येऊ देत नाहीत, असा अनुभव आहे. तुम्ही काय करता, हे आता दिसेलच. 'कबीर ... टिळक ... यांनी कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही' हा तुमचा इथे न शोभणारा मूर्खासारखा विनोदाचा प्रयत्न आहे. या जगावर छाप पाडलेल्यांनी तसा प्रयत्न केला आहे, असा तुमचाच दावा आहे. तेव्हा तो प्रयत्न कसा केला हे सांगण्याची तुमची ज़बाबदारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. श्री. नानीवडेकर,
    जगावर छाप पाडून गेलेल्या भारतीयांनी कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला हे माझे विधान आहे, ते मला मान्य आहे.
    वाल्मिकी, कबीर, तुकाराम, टिळक, इन्दिरा गांधी यांनी जगावर छाप पाडली असली तरी कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला नसेल/नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, जगाला माहिती आहे. असे असूनही फक्त मला शब्दात पकडण्यासाठी हा फालतू युक्तीवाद करण्याची कळ तुम्हाला आली आणि वर पुन्हा " ब्लॉगलेखक त्यांच्यावरली टीका पहिले थोडी सहन करतीलही, पण नन्तर काही वेळानी जास्त टीका बाहेरच येऊ देत नाहीत, असा अनुभव आहे" म्हणताय ! म्हणजे असल्या फालतू टीकेला ब्लॉगलेखक डिलीट या बटणाच्या एका फटक्यात उत्तर देऊ शकेल, याची भीतीही तुम्हाला वाटतेय!
    वाल्मिकी, कबीर, तुकाराम, टिळक, इन्दिरा गांधी यांनी कामवासनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्यांचा अपवादही ठरू शकतो, तर असल्या युक्तीवादाचे ओझे किंबहुना जबाबदारी प्रस्तुत ब्लॉगलेखकावर न टाकलेले बरे हे सामान्य ज्ञान टीका करण्याची जबरदस्त कळ उठल्याने तुम्हाला वापरावे वाटले नाही. या अर्थाने मी त्याची जबाबदारी माझ्यावर येत नाही असे म्हणालो तर तुम्हाला त्यात विनोद (तोही मूर्खासारखा) कसला दिसतोय?
    मला माझ्यावर झालेली टीका आवडते पण तिच्यात काही दम असायला हवा !

    उत्तर द्याहटवा
  9. "ब्लॉगलेखक डिलीट या बटणाच्या एका फटक्यात उत्तर देऊ शकेल, याची भीतीही तुम्हाला वाटतेय!"
    ----

    त्यात भीतीचा काहीही भाग नाही; माझी इथली वाक्ये काढली तरी मला काही फरक पडायचा नाही.


    "मला माझ्यावर झालेली टीका आवडते पण तिच्यात काही दम असायला हवा !"
    ------

    तुम्हाला नियम कधी सिद्‌ध होतो, मग त्याला अपवाद कसा ठरू शकतो, याबद्‌दल काडीचाही विवेक नाही. दम नसलेल्या लेखनावर टीका करण्यात दम नाही. पण जेड अ‍ॅडॅम्सवर वृथा टीका करण्याचा तुम्ही आव आणला, म्हणून मी दोन शब्द लिहिले. एरवी हा अ‍ॅडॅम्स कोण, कुठला याची मला कल्पना नव्हती. आणि त्याचं लेखन चांगलं की वाईट याचीही मला माहिती नाही, त्याविषयी विशेष उत्सुकताही नाही.

    बाकी तुमचं चालू द्‌या.

    - नानिवडेकर

    उत्तर द्याहटवा
  10. नियम सिद्ध करणे, विवेक, ज्ञान यापासून मी चार हात लांब राहातो आणि अशा गोष्टी बोलणा‍‌‍‌‌‍र्‍यांचा माझ्या वरील पध्दतीने समाचार घेतो. तुम्ही ही बडबड सुरू करणार हे तुमच्या पहिल्याच पोस्टमध्ये दिसले होते, म्हणून मी तपशीलवार प्रत्युत्तर देणे टाळत होतो. पण तुम्हाला मारच खायचा होता त्याला मात्र मी टाळू शकत नव्हतो.
    माझ्या लेखनात दम आहे असा मी कधीही दावा केलेला नाही. कशात दम आहे नि कशात नाही हे वर दिसलंच आहे !
    मी वृथा आव आणत आहे हे दिसत असतानाही, ज्या विषयात तुम्हाला उत्सुकता नाही त्यातही तीनदा तुमचे ज्ञानकण इथे टाकल्याबद्दल आभार !
    बाकी चालु राहू देण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही.

    उत्तर द्याहटवा