२८ जुलै, २०१०

सवाल-जवाब

मी पुढे ब्लॉग लिहीणार नाही कारण असलं काहीतरी माझ्या ऐकण्या-वाचण्यात येतं आणि मग आपण काही वेगळं लिहीण्याची गरजच राहात नाही. मी कविता करायचो, पण रामजोशींच्या लावण्या ऐकल्या आणि मी लेखणी खाली ठेवली. हटातटाने बटा, रंगवून जटा धरीशी का शिरी..मठाची उठाठेव का तरी...अबाबा.!! छे..छे..! आपण फक्त हे लोकांना दाखवू शकतो...त्या तोडीचं लिहू शकत नाही. हे सवाल-जवाब वाचून झाल्यानंतर ते युट्यूबवरही पहा. आणखी मजा येईल. हे सवाल-जवाब मात्र ग.दि. माडगूळकरांनी लिहीले असल्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जाणकार सांगतीलच.

सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती
जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग..

************

सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी..
जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं....

***************

सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अविरत परक्यासी...खारट त्याचे चुंबन घेई....एका मुखाने शिवा दोन्हीसी...
जवाब: पतीत पावन त्रिभूवन जीवन मुनीजन बोलती स्वर्गधुनी...निंदू नको जरी सिंधूस मिळली...गंगा गंगाधर त्यजुनी...

*****************

सवाल: तुझीच दौलत परंतू दैवे भाळी तुझ्या नाही.. गं...तुझीच असूनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते पाही गं.... तुझ्याच पाशी जन्मभरी ते रम्य दोन पेले गं...सुधा, हलाहल आणि मदिरा यानी भरलेले गं....
जवाब: कवडी पांढरी, लोलक काळा- लाल जरा कोने गं...जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने..गं....शुभ्र पांढरे असते अमृत...हलाहलाचा रंगच काळा....सांग गुलाबी नेत्रकडांहून मद्याचा का रंग निराळा...जगवी अमृत, मारी हलाहल, मद्य झिंगवी कैफात...काढून बघ हे गुण तिनही असती तुझीया डोळ्यात...

***************

सवाल: सूर्य उगवता गगनामाजी जळी कमलिनी का फुलती, पूर्ण चंद्रमा नभात दिसता, सागरास का ये भरती...?
जबाब: सूर्य उगवता...कमल उमलते...सिंधू उसळतो चंद्रा बघुनी...शुध्द प्रिती हे एकच कारण ज्ञात्यांनो घ्या ह्रदयी भरूनी

*********************




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा