लहानपणीपासून आपण सर्वांनी सिध्द योग्यांच्या कथा ऐकल्या असतील. की अमुक हा सिध्दपुरूष हवेतून पैसे काढू शकतो (सत्यसाईबाबा* आठवू नका लगेच, तो एक मूर्ख माणूस आहे), हवेत उडू शकतो, मेलेला माणूस जीवंत करू शकतो इत्यादी इत्यादी. या सिध्दयोग्यांना जनरल पब्लिकमध्ये थोडा जास्त उच्चीचा दर्जा असतो; कारण सर्वसामान्य लोक जे करू शकत नाहीत ती गोष्ट ते सहजी करीत असतात. अर्थातच त्यांच्याबद्दल कुतूहल असते, ते गूढ वाटतात आणि त्यांच्यासारखंच आपल्यालाही करता आलं असतं तर किती बरं झालं असतं असे वाटून जाते. पण त्यांचे मार्ग भयानक असतात, त्यांनी कठोर साधना केलेली असते, तप केलेले असते असं आपण ऐकतो. थोडक्यात माणसांची ही जमात माणसांपासून वेगळी असते. पण अखिल पृथ्वीवर पसरलेल्या माणूस नावाच्या जातीत काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये आहेत. उदा. बुध्दी. वर उल्लेखिलेल्या योग्यांनी त्यांनी केलेल्या चमत्काराच्या बाबतीत उरलेल्या माणसांच्या बुध्दीला कुलूप लावलेले असते. जनरल पब्लिकला त्यातले सिक्रेट कळू शकत नाही. पण जनरल पब्लिकमध्ये सुद्धा असे अनेक
सिध्दयोगी असतात. उदा. इंजिनिअर्स, डॉक्टर्स, वकील, सुतार, लोहार, चांभार इ.
मानवी जीवनाची आध्यात्मिक आणि भौतिक अशी जी विभागणी केली जाते ती निखालस चुकीची आहे. पुण्यात कुठल्यातरी घरात यजमानाच्या वतीने मंत्रपठण करून घरात मांगल्याचे वातावरण निर्माण करीत असलेले गुरूजी आणि त्याच घरातून न्यूयॉर्कमध्ये जाऊन एखाद्या संगणकाच्या कंपनीमध्ये स्वत:ची बुध्दी वापरून यंत्राबळाच्या मदतीने गुरूजींचा आवाज रेकॉर्ड करू शकणारा इंजिनिअर यांच्यामध्ये कसला फरक आहे? फक्त गुरूजी जे करीत आहेत त्याबद्दल श्रध्दा (व्हेरी डेंजरस थिंग), त्यांच्या बडबडीतून कुठलातरी देव खूश होऊन आपले कोटकल्याण करील अशी खूळी आशा लोक का धरतात? हे इंजिनिअर लोक संगणक तयार करताना एवढी डोकेफोड करून प्रोग्रॅम लिहीतात, त्यातले अक्षर न अक्षर अचूक असले तरच ते आचरीत असलेल्या योगाचे फळ म्हणून तयार होणारा संगणक अचूकपणे काम करू शकतो ना? तो देखील विशेषप्रकारचा मंत्रपाठच आहे. माझ्यासारख्या काही लोकांना तो जमत नसला म्हणू आम्ही काही आमच्या घरचा संगणक दुरूस्त करायला येणार्या इंजिनिअरचा फोटो घरात लावत नाही. जुन्या पठडीतल्या योग्यांपेक्षा हे आजचे सिध्दयोगी लक्षावधीपटींनी जास्त प्रॉडक्टीव्ह आहेत, रिअलिस्टीक आहेत, ते करीत असलेली गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तरीही त्या बिचार्यांना कुठल्यातरी ज्योतिषाचे पाय धरावे वाटतात हे त्या ज्योतिषाचे भाग्य आहे आणि पाय धरणार्यांची बौध्दीक दिवाळखोरी ! या पाय धरण्यामागे माणसात असलेल्या भविष्यात डोकावण्याच्या औत्सुक्याने, त्याला वाटणार्या असुरक्षेने माणसात असलेल्या बुध्दीला टांग मारून ज्योतिषाच्या टांगांसमोर लोटांगण घेतलेले असते. मी पण असे लोटांगण घेण्याच्या तयारीत होतो. धोंडोपंत गवाह है. पण धोंडोपंतांनी त्यांच्या बॅंक खात्याचे तपशील दिले आणि मला सगळाच तपशील कळला ! (आता धोंडोपंतांनी मला कितीही शिव्या देवो मी आधीच सांगून ठेवतो की आय स्टील लाईक स्टोरी टेलींग स्टाईल, दी फर्मनेस इन स्टेटमेंटस ऑफ धोंडोपंत)
सत्यसाईबाबा*
सत्यसाईबाबा एकदा जाहीर कार्यक्रमात नेहमीप्रमाणे हवेतून स्वीस घड्याळ काढून दाखवत होते. पी.सी. सरकार हे विख्यात जादूगारही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तिकडे सत्यसाईबाबांनी हवेतून घड्याळ काढले आणि इकडे पी.सी. सरकार यांनी हवेतून कबूतर काढून दाखवले. बाबांचे भक्त सरकार यांना मारहाण करायला उठले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा