बा हेरंबा, तुझी पोस्ट फळली रे!! आणि सगळ्यांनी तुझ्या या पोस्टवर पोटतिडकीने दिलेल्या प्रतिक्रियादेखील फळल्या. कारण बातमी तशी आहे. भारताचे अॅटर्नी जनरल जी.एम. वहाणवटी यांनी भोपाळ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले असून "क्यूरेटिव्ह पिटीशन" दाखल केले जाऊ शकते असे विधीमंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत सांगितले आहे. वीरप्पा हा माणूस चांगला वाटतो. फक्त आता क्यूरेटिव्ह पिटीशनवर निकाल द्यायला आणखी पंचवीस वर्षे लावू नयेत म्हणजे मिळवली ! जे विषारी वायूने गेले, त्यांना या क्यूरेटिव्हचे आता काय म्हणा. पण असो. आणि हो, काल सन्माननीय केतकर साहेबही याच मुद्यावरून माणूसकीचा संदर्भ सोडून आणि अतिशय जास्त प्रमाणात संपादकी होऊन उखडले होते. राजीव गांधीना लक्ष्य केले जात आहे, मिडीयाने भलतीच राळ उठविली आहे, पंचवीस वर्षे मिडीयाने काय केले (केतकरजींनी काय केले लेख लिहीण्याशिवाय?) इ.इ. एकीकडे " न्यायालयाने आणि भारतीय प्रशासकीय व्यवस्थेने युनियन कार्बाईड कंपनीच्या निर्घृणतेवर पांघरूण घातले आहे" असे म्हणायचे आणि याच व्यवस्थेची त्याकाळी धुरा सांभाळणार्या राजीव गांधी (आणि राहूल व सोनिया गांधी हे लक्ष आहे हे ध्वनित करून) ना पाठीशी घालायचे. चलता है!
आयला.. आत्ता झोपायला जात होतो तर चक्क माझ्या नावाची पोस्ट दिसली म्हणून लगबगीने उघडली तर तो म्हणजे मीच हे बघून गंमत वाटली.. असो. जोक्स अपार्ट..
उत्तर द्याहटवातो निकाल इतका फालतू होता की सद्सदविवेकबुद्धी अगदी किमान पातळीवर असणार्या माणसालाही त्यातला भोंदूपणा जाणवला असता.
अर्थातच क्यूरेटिव्ह पिटीशनला अजून किती महिने लावतात ते परमेश्वरच जाणे !!!
बाकी कुमार केतकरांची माझ्या लेखी व्याख्या म्हणजे अतिशय हुशार, व्यासंगी, ज्ञानी, बुद्धिमान परंतु हे सर्व गुण गांधी घराण्याच्या पायी वाहिलेला आणि त्यांचे तळवे चाटणारा एक इसम यापेक्षा जास्त नाही. त्यांच्या लिखाणाला "शब्द बापुडे केवळ वारा" च्या पलीकडे किंमत देण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या अनुभवाच्या १/१० अनुभव असणारे पण नि:पक्षपातीपणे लिहिणारे अनेक उदयोन्मुख पत्रकार आहेत ज्यांचं लिखाण मला केतकरांच्या लिखाणापेक्षा भावतं.. !!
अब बात निकली है तो हो ही जाये ! मागे या ब्लॉगवर लिहीलेल्या राज ठाकरेंच्या किश्श्यात राज ठाकरेंना लिहीलेले पत्र लोकसत्तामधे छापा अशी विनंती करण्यासाठी मी (औरंगाबादला आले असताना) केतकरांनाही भेटलो होतो. पण विद्वान संपादकांचे मत असे पडले की "तुमच्या विनंतीला सामाजिक आशय नाही, म्हणून आम्ही ते पत्र छापू शकत नाही!" म्हणजे पाहा - राज ठाकरे यांची सामाजिक आशयाच्या बाता मारणारी (आणि तरूण रक्ताला उगाच बेजार करणारी) पत्रे ते लोकसत्तात छापतात. त्याच राज ठाकरेंना प्रॅक्टीकली काही करून दाखवा हे सांगणारे पत्र छापण्याची धमक हे दाखवू शकत नाहीत.
उत्तर द्याहटवा"शब्द बापुडे केवळ वारा" हे त्यांनी चालवलेल्या त्रिकालवेध या सदराला चपखल लागू होते (अर्थात माझ्या मते!).
एवढ्या त्वरीत प्रतिसाद दिल्याबद्दल अर्थातच आभार कृत्रिम असला तरी, आभार असे म्हणतो.