१६ ऑगस्ट, २०१०

वन्स अपॉन ए टाईंब इन मंबई !!

छ्या! छ्या! छ्या !! ह्यापरता कुनीबी एक ब्लॉगर धरून त्याला ड्वायलाग खरडायला लावले अस्ते तर जास्त बर झालं अस्त का न्हाई?  जुर्म के रास्ते कितने भी मखमली क्यूं ना हो सर, खतम तो जेल के कंबल में ही होते है - आता हा बोलून झाला तर लगीच दुसरा कशाला मारायचा? पन न्हाई -  गाडी चाहे कितनी भी तेज हो सर - उसे रोकने के लिये बस एक कील काफी है (रजत अरोरा (हा लेखक न संवादलेखक आहे) - तु फक्त काही दिवस मिसळपाव न मराठी ब्लॉगविश्वला भेट दे - हव्या तेवढ्या वस्ताद ड्वायलॉग रायटरकडून तुला शिकता येईल) (मराठी माणसा! जागा हो!! फक्त ब्लॉग लिहून गार होऊ नको )
मायला हितं बसल्या-बसल्या हाजी मस्तान न दाऊद ईब्राहिमची लागन ती खबर मिळती. आन हाजी मस्तानन दाऊदभाईवर बेतलेला हा शिणमा पार दोघाईंचीबी आबरू घालवतो. क्या दाऊदभाय, तुमारा लक्ष नाय आजकाल फिल्मिंडस्ट्रीपर. अल्कैदा के कैद में भौत बुरे फंसे तुम!
बरं झालं घरीच बसून पाह्यला. हिंदी शिणमात जान राह्यली नाय ये बच्चा-बच्चा जानता है. पन हे लोक अशा नामचीन (पक्षी:सर्कार इत्यादी, इत्यादी) लोकांयचे नावं घेऊन शिणमा तयार करतात मंग आमचा सुलेमानी किडा जागा व्हतो - की बुवा नवं काही दाखवलंय का? एक ते येडं अजय देवगण (दुवा में याद किया रे बाबा तेरेकू!! क्या यार, इतना शिनमा बनाया, तुझे एकबार भी मुस्सलमानी सलाम करते नही आया! सलाम ऐसे करताय जैसे खैरात मांग रहा हो! ) न दुसरा हा (पिसाट या शब्दा अदुगर आनी एक शब्द टाकावा वाटतुया, पन नगं - समजून घ्या ) पिसाट इम्रान हाश्मी. त्याबद्दल नाही हो - आसनं का पिसाट. पन या पिसाटाला पाह्यला दुसरे पिसाट व्हतात ते पाहुन आमाला हसावं का रडावं ते कळत न्हाय. आता तिकडं शिणमात हा बाबा कुण्या कळीला कुसकरत असंल तर इकडं त्याला पाहाणार्‍यांचा लगीच त्याच्या शरीरात परकाया प्रवेश हुतो आन हे बेणे एकमेकांना टाळ्या देऊ लागतात! काय अजब दुनियाय! च्यायला काही दिसानंतर हे पोट्टे नुस्ते बघे होऊन बसणार! श्या:!!! नकुच त्याच्याबद्दल ! र्‍हाता र्‍हायल्या हिरोन्या - त्यातली जी अजय देवगणसोबत असते ती (फफेद फमीज - तोतरी आहे ती! शिनमात नाही - खरी-खुरी तोतरीय! ) आन दुसरी तर पाक लालबत्तीतूनच आणल्यासारखी दिसतीय! (आमी काय हवं ते लिहू - या धंद्यात येण्यापूर्वी धा दा इच्यार करायचा हुता!)
"अ‍ॅगनेल के कान में भी उसी ने मूता होगा"
 "ये घोडों पे पैसे लगाते लगाते गधों पे कब से पैसे लगाने लगे" 
हे दोनच ड्वायलॉग आवडले आपल्याला (पैकी एकात नाना पाटेकर आठवला न दुसर्‍यात जानी राजकुमार!) - हे बी कुणातरी चंद्रू नावाच्या एक्स्ट्राच्या तोंडी आहेत !
मी पैज लावायला तयार आहे हे चंद्रू चे डायलॉग रजत अरोरानं लिहीले नाहीत!!
बास्स! कथा कशीय, नाट्य कसं आहे, प्रेक्षक बाहेर पडताना त्यांच्यावर काय परिणाम होतो (म्हणजे सुन्न होतो, मुका होतो की बहिरा होतो- हे एक सांगावं लागतं शिणमाबद्दल लिहीताना) - तर प्रेक्षकाला या शिणमात असं काहीही होत नाही - मला फक्त दर तीन पाणचट ड्वायलागला एक याप्रमाणं मोठ्ठ्या जांभया आल्या !
खरं म्हणजे बालाजी टेलीफिल्म्स आणि शोभा कपूर/एकता कपूर एवढं वाचुनच ग्रंथ बंद करायला पायजे होता - पण आमच्या एका मित्रानं टॉरंट डाऊनलोड नावाची नवी विद्या शिकवली. आता तिचं प्रात्यक्षिक करावं लागणार. कोणता डाऊनलोड करू म्हणून विचारलं तर तो म्हणे "वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई". मला काय - प्रात्यक्षिकच करायचं होत.  नव्या विद्येचा वापर करून बीयेशेनेलच्या मदतीनं हा शिणमा खेचला.
आमचा भोळाभाबडा मित्र मला "पायरसी करू नको बरं का, धाड पडेल बरं का, मी जबाबदार नाय हां" असं बजावत होता. च्यायला असला शिणमा आपण तर फुकटबी पाहाणार नाही - आन तुम्ही बी पाहू ने म्हनून हे खरडलं.

४ टिप्पण्या:

  1. >>>नव्या विद्येचा वापर करून बीयेशेनेलच्या मदतीनं हा शिणमा खेचला.>>>च्यायला असला शिणमा आपण तर फुकटबी पाहाणार नाही - आन तुम्ही बी पाहू ने म्हनून हे खरडलं. >>>>
    लई भारी खरडलं राव तुम्ही....असच खरडत राव्हा आणि ह्यांना चव्हाट्यावर नागडे करा.

    उत्तर द्याहटवा
  2. सही ........
    मी तर चित्रपटगृहात जाऊन पहिला .... पैसे फुकट .... जाम बोर केलं राव ह्या पिक्चर नि ........

    विनोद

    उत्तर द्याहटवा
  3. झंपूशेठ,
    आमी खरडतोच - तुमीबी येत र्‍हावा ब्लॉगवर. थॅंक्यू!

    विनोदकुमारजी,
    नमस्कार! बर्‍याच दिवसांनी दर्शन.
    बोर सिनेमा काढूनही हवा कसली करतात बघा ना...आणि वरून पुन्हा हा सिनेमा हिट झालाय असं आताच कुणीतरी सांगितलं...शिव..शिव..!

    उत्तर द्याहटवा
  4. त्या पिसाटच्या अदुगर त्यो शब्द लावा ओ.... त्या शिवाय मजा नाय सांगतो तुमाला!

    उत्तर द्याहटवा